Today Rashi Bhavishya in Marathi file photo
ज्योतिष आणि धार्मिक

Horoscope 1 April 2026: 'या' राशीच्या व्यक्तींनी घाई टाळा, आज मोठी संधी मिळेल; पाहा आजचे राशिभविष्य

Today Rashi Bhavishya in Marathi: आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

पुढारी वृत्तसेवा

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

मेष

मेष : डोक्यात कल्पनांचा ट्रॅफिक जॅम असेल. पण त्यातूनच भन्नाट आयडिया जन्म घेईल. घाई कमी करा. छोट्या गोष्टीत गोंधळ होईल.

वृषभ

वृषभ

वृषभ : मन म्हणेल थोडं रिलॅक्स; पण जबाबदाऱ्या ओढतील. संतुलन साधलं तर दिवस समाधानी जाईल. आर्थिक लाभ होईल. जोडीदाराची साथ लाभेल.

मिथुन

मिथुन

मिथुन : गप्पांचा ओघ आज नदीसारखा वाहेल. नवीन ओळखी आणि मजेशीर चर्चा होतील. जास्त बोलून काही उघड करू नका.

कर्क

कर्क

कर्क : दिवस भावनांचा छोटा रोलरकोस्टर ठरेल. जुनी आठवण मनात येईल. कुटुंबासोबत वेळ घालवला तर मन हलकं होईल.

सिंह

सिंह

सिंह : आज तुम्ही जिथे जाल, तिथे लाईट तुमच्यावरच राहील. लोक कौतुक करतील. फक्त अहंकार थोडा कंट्रोलमध्ये ठेवा.

कन्या

कन्या

कन्या : आज कामे पूर्ण करण्याचा मूड असेल. छोट्या गोष्टीतही परफेक्शन शोधाल. पण स्वतःवर जास्त ताण घेऊ नका.

तूळ

तूळ

तूळ : संतुलन साधण्याची खरी परीक्षा असेल. मनाचा आवाज ऐकला तर योग्य निर्णय होईल. दोन पर्यायांमध्ये अडकण्याची शक्यता.

वृश्चिक

वृश्चिक

वृश्चिक : गूढ विचार आणि शांत निरीक्षणात दिवस जाईल. कोणाचं खरं रूप आज दिसू शकतं. भावना मनात ठेवण्यापेक्षा व्यक्त करा.

धनु

धनु

धनु : भटकंतीची किंवा नवीन काहीतरी शिकण्याची इच्छा होईल. नवीन अनुभव मिळतील. आजचा दिवस अॅडव्हेंचर मोडमध्ये ठेवा.

मकर

मकर

मकर : कामावर फोकस आणि थोडी चिंता असा दिवस असेल. एखादे प्रलंबित काम पूर्ण होईल. संध्याकाळी स्वतःसाठी वेळ काढा.

कुंभ

कुंभ

कुंभ : विचार वेगळ्या लेव्हलचे असतील. एखादी हटके कल्पना लोकांना आश्चर्यचकित करेल. मित्रांसोबत चर्चा फायदेशीर ठरेल.

मीन

मीन

मीन : स्वप्नाळू मूड आणि कल्पनारम्यता राहील. कला, संगीत किंवा लेखनात मन रमू शकतं. जमिनीवर राहून निर्णय घेतले तर उत्तम.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT