Palmistry Signs file photo
ज्योतिष आणि धार्मिक

Palmistry Signs: तुमच्या हातावर 'V' चिन्ह आहे का? ३५ व्या वर्षानंतर पालटू शकते नशीब; काय सांगते हस्तरेखा शास्त्र!

hand V sign meaning: हस्तरेखा शास्त्रामध्ये हातावरील रेषांपासून बनणाऱ्या विविध चिन्हांना विशेष महत्त्व दिले जाते. यातीलच एक अत्यंत शुभ मानले जाणारे चिन्ह म्हणजे तळहातावरील ‘V’ आकाराचे चिन्ह.

मोहन कारंडे

Palmistry Signs: हस्तरेखा शास्त्रामध्ये हातावरील रेषांपासून बनणाऱ्या विविध चिन्हांना विशेष महत्त्व दिले जाते. यातीलच एक अत्यंत शुभ मानले जाणारे चिन्ह म्हणजे तळहातावर दिसणारे ‘V’ आकाराचे चिन्ह. जर तुमच्या हातावर हे चिन्ह स्पष्टपणे दिसत असेल, तर ते तुमच्या जीवनात अनेक सकारात्मक बदलांचे संकेत देते. मात्र, या चिन्हाचे फळ ते हातावर नेमके कोणत्या ठिकाणी आहे, यावर अवलंबून असते. त्यामुळे त्याची जागा समजून घेणेही तितकेच महत्त्वाचे मानले जाते.

'V' चिन्हाचा नेमका अर्थ काय?

हस्तरेखाशास्त्रानुसार तर्जनी आणि मधले बोट यांच्या मधील भागात ‘V’ आकाराचे चिन्ह दिसत असेल, तर ते अत्यंत शुभ मानले जाते. या ठिकाणी असलेले ‘V’ चिन्ह जीवनातील प्रगती आणि यशाचे प्रतीक समजले जाते. अनेक लोकांच्या तळहातावर हे चिन्ह याच ठिकाणी दिसून येते, त्यामुळे ही स्थिती सर्वात प्रभावी मानली जाते.

३५ नंतर नशिबाची साथ

ज्या लोकांच्या हातावर हे चिन्ह असते, त्यांना नशिबाची साथ मिळते असे मानले जाते. असे लोक जीवनातील अनुभवांमधून बरेच काही शिकतात आणि वेळेनुसार सातत्याने पुढे जात राहतात. विशेषतः वयाची ३५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या आयुष्यात चांगली प्रगती आणि मोठ्या यशाची शक्यता वाढते, असे हस्तरेखाशास्त्रात सांगितले जाते.

स्वभाव आणि व्यक्तिमत्व

कौटुंबिक आयुष्याच्या दृष्टीनेही असे लोक जबाबदार मानले जातात. कठीण परिस्थितीतही ते कुटुंबाची साथ सोडत नाहीत आणि नातेसंबंध जपण्यावर विश्वास ठेवतात. त्यामुळे ते अनेकदा चांगले जीवनसाथी आणि विश्वासू मित्र म्हणून ओळखले जातात.

हातावर ‘V’ चे चिन्ह व्यक्तीला मेहनती आणि विश्वासार्ह बनवते, असे मानले जाते. असे लोक आपल्या कामाबाबत गंभीर असतात आणि सातत्याने मेहनत घेतात. त्यामुळे आयुष्यात चांगले स्थान मिळवण्याची त्यांची शक्यता अधिक असते. मात्र त्यांना वाईट संगतीपासून दूर राहण्याचा सल्लाही दिला जातो, कारण चुकीच्या लोकांच्या सहवासामुळे त्यांच्या आयुष्यात अडचणी निर्माण होऊ शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT