Hand Fingers Astrology file photo
ज्योतिष आणि धार्मिक

Hand Fingers Astrology: हाताच्या बोटांवरून समजतं आपलं भविष्य; सामुद्रिक शास्त्रानुसार जाणून घ्या तुमच्या नशीबात काय आहे?

samudrik shastra finger shape meaning: तुमच्या हाताच्या बोटांवरून तुमचा स्वभाव कसा आहे आणि भविष्य कसे असेल जाणून घ्या.

मोहन कारंडे

Hand Fingers Astrology:

हस्तरेषा शास्त्रामध्ये केवळ हातावरील रेषांनाच नव्हे, तर हाताच्या बोटांच्या रचनेलाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. सामुद्रिक शास्त्रानुसार, आपल्या बोटांची रचना आपल्या गुण-दोषांचा आरसा असते. हस्तरेषांचे विश्लेषण करताना फक्त तळहाताकडे पाहणे पुरेसे नसते. त्याचबरोबर बोटांचा आकार, हाताची रचना आणि व्यक्तीच्या जन्मकुंडलीतील ग्रह-नक्षत्रांची स्थिती यांचाही अभ्यास आवश्यक मानला जातो. तेव्हाच एखाद्या व्यक्तीबाबत अचूक भविष्य सांगता येते. तुमच्या हाताच्या बोटांवरून तुमचा स्वभाव कसा आहे आणि भविष्य कसे असेल जाणून घ्या.

बोटांच्या आकारानुसार व्यक्तीची वैशिष्ट्ये :

चौकोनी बोटे

ज्यांच्या हाताची बोटे चौकोनी किंवा वर्गाकार असतात, त्या व्यक्ती सहसा दूरदृष्टी असलेल्या आणि शिस्तप्रिय असतात. अशा लोकांना प्रत्येक काम ठराविक नियमांनुसार करण्याची सवय असते. बहुतांश वेळा अशा बोटांच्या व्यक्तींना व्यापार किंवा व्यवसाय क्षेत्रात अधिक रस असतो. कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी ते नीट विचार करतात. हे लोक स्वतः कष्टाळू असतात आणि आपल्या सहकाऱ्यांकडूनही तेवढ्याच मेहनतीची अपेक्षा ठेवतात.

अणकुचीदार बोटे

ज्यांची बोटे पुढच्या बाजूला अणकुचीदार असतात, त्या व्यक्तींना प्रत्येक काम व्यवस्थित आणि पद्धतशीर करायला आवडते. शा व्यक्तींना सुंदर विचार आणि कलात्मक गोष्टींची विशेष आवड असते. त्यांच्या प्रत्येक कामात नेहमीच शिस्त आणि टापटीप पाहायला मिळते.

चपटी बोटे

बोटांचा आकार चपटा असलेल्या व्यक्ती शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अत्यंत चपळ असतात. एकदा एखादे काम हाती घेतले की ते पूर्ण केल्याशिवाय या व्यक्ती गप्प बसत नाहीत. कारागिरी, विद्वत्ता, कला, संगीत किंवा क्रीडा क्षेत्रात हे लोक आपले कसब दाखवतात. जर कुंडलीतील ग्रह-नक्षत्र अनुकूल असतील, तर हे लोक आत्मविश्वासाने आपले ध्येय गाठतात.

लांब बोटे

लांब आणि देखणी बोटे असलेल्या व्यक्ती समाजात प्रतिष्ठित मानल्या जातात. अशा व्यक्तींची रुची तत्त्वज्ञान, संगीत, कला किंवा संशोधनामध्ये असते. जर पत्रिकेत चंद्राची स्थिती कमकुवत असेल, तर अशा व्यक्ती काही वेळा भावनेच्या भरात वाहून जाण्याची शक्यता असते. अनेकदा हे लोक स्वतःच्या विचारांमध्येच हरवून जातात.

सामुद्रिक शास्त्र म्हणजे काय?

सामुद्रिक शास्त्र हे भारतीय ज्योतिषशास्त्राचा एक प्राचीन भाग आहे, ज्यामध्ये व्यक्तीच्या शरीराच्या अवयवांची रचना, आकार आणि रेषांवरून त्यांचा स्वभाव, चारित्र्य आणि भविष्य वर्तवले जाते. हे गरुड पुराणाचा भाग असून, हस्तरेषा शास्त्र आणि शरीर लक्षण शास्त्राचा एक व्यापक अभ्यास आहे, ज्याला ऋषी समुद्र यांनी विकसित केले आहे. यामध्ये समुद्र आणि हवामानाच्या आधारे विविध प्रकारचे अंदाज आणि ज्योतिषीय गणनांचा अभ्यास केला जातो.

SCROLL FOR NEXT