Diwali 2026 : साजरी होणार दिवाळी की निघणार दिवाळं? साडेसाती सुरू असलेल्या राशींवर कसा होणार परिणाम? जाणून घ्या... file photo
ज्योतिष आणि धार्मिक

Diwali 2026 : साजरी होणार दिवाळी की निघणार दिवाळं? साडेसाती सुरू असलेल्या राशींवर कसा होणार परिणाम? जाणून घ्या...

जाणून घेऊया, सणासुदीच्या काळात साडेसातीचा प्रभाव असलेल्या राशींवर कसा परिणाम होणार आहे.

पुढारी वृत्तसेवा

diwali 2026 shani sade sati mesh kumbh meen rashi unlucky lucky zodiac signs prediction

पुढारी ऑनलाईन : सध्या शनी ग्रह मीन राशीत विराजमान असून मेष, कुंभ आणि मीन या तीन राशींवर शनीच्या साडेसातीचे तीन वेगवेगळे टप्पे सुरू आहेत. जाणून घेऊया, सणासुदीच्या काळात साडेसातीचा प्रभाव असलेल्या राशींवर कसा परिणाम होणार आहे.

सध्या सणांचा हंगाम सुरू आहे. ८ नोव्हेंबरला दिवाळी आहे. सर्वत्र लोक घरातील सुख-समृद्धी आणि मंगलकामनेसाठी प्रार्थना करत आहेत. ज्या राशींवर शनीची साडेसाती सुरू आहे, त्यांच्यासाठी आतापर्यंतचा काळ फारसा चांगला राहिलेला नाही. अशा परिस्थितीत या राशींचे जातकही आयुष्यात एखाद्या चांगल्या आश्चर्याची अपेक्षा करत आहेत. मात्र, साडेसातीचा प्रभाव सर्व राशींवर (मेष, कुंभ आणि मीन) सारखाच परिणाम देणार नाही. काहींच्या पदरात आनंदाचे क्षण येतील, तर काहींना चिंतांनी घेरलेले असेल. जाणून घेऊया, दीपोत्सवाच्या काळात साडेसातीचा या तीनही प्रभावित राशींवर कसा परिणाम होणार आहे.

मेष रास

मेष राशीवर शनीच्या साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे. पैशांशी संबंधित बाबींमध्ये कोणताही विचार न करता उचललेले पाऊल नुकसानदायक ठरू शकते. जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर त्यासंबंधित जोखीम आणि संभाव्य परिणाम आधी चांगल्या प्रकारे समजून घ्या. कोणाच्या सांगण्यावरून किंवा झटपट नफा मिळवण्याच्या अपेक्षेने पैसे गुंतवणे टाळा. परिस्थितीचे योग्य आकलन करूनच निर्णय घ्या. हे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. या काळात संयम राखणे आणि व्यावहारिक दृष्टिकोन स्वीकारणे आवश्यक राहील. संयमाने वागणाऱ्या लोकांना या काळात कोणत्याही मोठ्या अडचणीचा सामना करावा लागणार नाही.

कुंभ रास

कुंभ राशीचे जातक सध्या शनीच्या साडेसातीच्या अंतिम टप्प्यातून जात आहेत. यालाच उतरती साडेसाती असेही म्हटले जाते. सणासुदीच्या काळात कुंभ राशीच्या जातकांना आर्थिक आघाडीवर काही सकारात्मक बदल पाहायला मिळू शकतात. दीर्घकाळापासून अडकलेले पैसे मिळण्याची किंवा जुन्या आर्थिक व्यवहारांमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळू शकते. तर व्यवसायाशी संबंधित लोकांना नव्या संपर्कांच्या माध्यमातून लाभदायक संधी मिळू शकतात.

मीन रास

मीन राशीवर साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू आहे. हा सर्वात त्रासदायक टप्पा मानला जातो. अशा परिस्थितीत ज्योतिषतज्ज्ञांdiwali 2026 shani sade sati mesh kumbh meen rashi unlucky lucky zodiac signs prediction नी या राशीच्या जातकांना संयमाने पुढे जाण्याचा सल्ला दिला आहे. कुटुंबात किंवा वैयक्तिक नात्यांमध्ये एखाद्या गोष्टीवरून मतभेद झाल्यास रागाच्या भरात प्रतिक्रिया देणे टाळा. संवादाच्या माध्यमातून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. कोणतीही जोखीम घेऊ नका. मोठी गुंतवणूक करू नका आणि उत्पन्न व खर्च यांच्यात संतुलन राखून पुढे जा. महत्त्वाचे निर्णय घेताना भावनांऐवजी परिस्थिती आणि त्यातून उद्भवणारे संभाव्य परिणाम लक्षात घ्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT