Today Rashi Bhavishya in Marathi file photo
ज्योतिष आणि धार्मिक

Rashi Bhavishya Today: आज या राशीच्या लोकांनी भावना स्पष्ट व्यक्त केल्यास दुरावा कमी होईल; छोटे पाऊल बदल घडवेल

Horoscope 19 September 2026: आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

Anirudha Sankpal

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

मेष

मेष : वेगापेक्षा दिशा महत्त्वाची ठरेल. कामातील एखादी जबाबदारी तुमचे लक्ष वेधून घेईल. घाईत निर्णय घेण्यापेक्षा माहिती तपासून पुढे जा.

वृषभ

वृषभ

वृषभ : पैशांशी संबंधित कल्पना प्रत्यक्षात आणाल. जवळच्या व्यक्तीशी चर्चा नवा दृष्टिकोन देईल. मतभेद झाले, तरी लगेच प्रतिक्रिया देऊ नका.

मिथुन

मिथुन

मिथुन : कामातील बारकावे लक्षात घेतल्याने तुमची बाजू मजबूत होईल. अपूर्ण माहितीवर निर्णय घेणे टाळा. प्रश्न संवादातून सुटण्याची शक्यता.

कर्क

कर्क

कर्क : घर आणि काम यांच्यात समतोल साधा. प्रलंबित कामासाठी दिवस चांगला. भावनेच्या भरातील निर्णय त्रासदायक ठरू शकतो.

सिंह

सिंह

सिंह : स्वतःला सिद्ध करण्यापेक्षा योग्य वेळी योग्य पाऊल उचलणे फायदेशीर, कार्यक्षेत्रात तुमच्या नियोजनाची दखल घेतली जाईल.

कन्या

कन्या

कन्या : निरीक्षणशक्तीचा चांगला उपयोग होईल. कामातील चूक वेळेत लक्षात आल्याने नुकसान टळेल. नवीन कल्पनेला आकार द्याल.

तूळ

तूळ

तूळ : परिस्थिती तुमच्या बाजूने वळू शकते. घरासाठी किंवा स्वतःसाठी केलेली एखादी खरेदी समाधान देईल. गैरसमज दूर होतील.

वृश्चिक

वृश्चिक

वृश्चिक : मनातील ॐ गोष्ट योग्य शब्दांत व्यक्त करणे चांगले. कामात तुमच्यावर विश्वास दाखवला जाईल. आर्थिक निर्णय सावधपणे घ्या.

धनु

धनु

धनू : नेहमीपेक्षा थोडे शांत राहून परिस्थिती हाताळा. कागदपत्रे, व्यवहार पुन्हा तपासा. अतिआत्मविश्वासामुळे झालेली चूक टाळता येईल.

मकर

मकर

मकर : जुन्या योजनेला सुरुवात कराल. भावना स्पष्ट व्यक्त केल्यास नात्यातील अंतर कमी होईल. छोटे पाऊल बदलाची सुरुवात ठरेल.

कुंभ

कुंभ

कुंभ : थोडा एकांत आज तुम्हाला आवश्यक वाटू शकतो. गोंधळापासून दूर राहिल्यास एखाद्या प्रश्नाचे उत्तर सापडेल. ताण कमी होईल.

मीन

मीन

मीन : आज कल्पनेपेक्ष प्रत्यक्ष कृतीला महत्त्व द्या. अडकलेले प्रकरण पुढे सरकेल. दिवसाच्या शेवटी केलेली छोटी प्रगतीही समाधान देईल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT