Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
- ज्यो. मंगेश महाडिक
मेष : आजचा दिवस उत्साहाचा राहील. रखडलेली कामे मार्गी लागतील; मात्र आरोग्याची काळजी घ्या.
वृषभ : आर्थिक लाभाचे योग आहेत. कुटुंबासोबत आनंदात वेळ जाईल. नवीन गुंतवणुकीसाठी चांगला दिवस.
मिथुन : विचारांमध्ये स्पष्टता ठेवा. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. जोडीदाराशी संवाद वाढवा.
कर्क : मानसिक शांतता लाभेल. धार्मिक कार्यात रुची वाढेल. प्रवासाचे बेत आखले जाण्याची शक्यता आहे.
सिंह : आत्मविश्वासात वाढ होईल. रखडलेली सरकारी कामे पूर्ण होतील. रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
कन्या : नवीन योजनांवर काम करण्यासाठी शुभ दिवस. धनलाभाचे योग आहेत. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.
तूळ : आरोग्यात सुधारणा होईलर मित्रमैत्रिणींच्या भेटीमुळे मन प्रसन्न राहील. खर्चावर मर्यादा ठेवा.
वृश्चिक : कामाचा ताण जाणवेल; पण यश तुमचेच असेल. घरातील मोठ्यांचा सल्ला मोलाचा ठरेल.
धनु : नशिबाची साथ मिळेल. लांबच्या प्रवासाचे योग आहेत. मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल.
मकर : वादाचे प्रसंग टाळा. कामात थोडा विलंब होऊ शकतो, संयम ठेवा. खाण्यापिण्यावर लक्ष द्या.
कुंभ : वैवाहिक जीवन सुखमय राहील. भागीदारीच्या व्यवसायात फायदा होईल. नवीन संधी उपलब्ध होतील.
मीन : गुप्त शत्रूपासून सावध राहा. मेहनतीचे फळ आज नक्की मिळेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.