Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
- ज्यो. मंगेश महाडिक
मेष : आज कामात गती येईल, पण उतावीळपणा टाळा. वरिष्ठांशी संवाद जपून ठेवा. आर्थिक व्यवहारात सावध निर्णय घ्या. थोडा ताण जाणवू शकतो.
वृषभ : कौटुंबिक वातावरण समाधानकारक राहील. कामे मार्गी लागतील. खर्चावर नियंत्रण ठेवल्यास फायदा होईल. मित्रांकडून मदत मिळेल.
मिथुन: नवे विचार आणि योजना मनात येतील. कामाच्या ठिकाणी कौतुक होण्याची शक्यता. मन प्रसन्न राहील. आरोग्याची काळजी घ्या.
कर्क : कामात बारकावे महत्त्वाचे ठरतील, आरोग्य सुधारण्याकडे लक्ष द्या. जुने वाद मिटण्याची शक्यता. दिवस शांत आणि स्थिर राहील.
सिंह : मन संवेदनशील राहील. सर्जनशील कामात यश मिळेल. खर्च वाढण्याची शक्यता. शांतता राखल्यास दिवस सुखकर जाईल.
कन्या: भावनिक निर्णय टाळणे हितावह ठरेल. घरातील जबाबदाऱ्या वातू शकतात. आर्थिक बाबतीत संयम ठेवा. ध्यान-प्राणायाम उपयुक्त ठरेल.
तूळ : सहकार्य आणि भागीदारी लाभदायक ठरेल. नवीन ओळखी उपयोगी पडतील. कलात्मक गोष्टींमध्ये रस वाढेल.
वृश्चिक : गुप्त योजना यशस्वी होऊ शकतात. कामाचा ताण थोडा वाढेल. अनावश्यक वाद टाळा. संध्याकाळी विश्रांती आवश्यक.
धनुः प्रवासाचे योग संभवतात. विद्या आणि ज्ञानवृद्धीचा दिवस. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. आशावादी दृष्टिकोन ठेवा.
मकर: नवीन कल्पनांना वाव मिळेल. सामाजिक कार्यात सहभाग वाढेल. मित्रमैत्रिणींशी संवाद वाढेल. दिवस उत्साही राहील.
कुंभ : जबाबदाच्या बाढतील. यश मिळेल. कामात शिस्त महत्त्वाची ठरेल. कुटुंबाकडून पाठिंबा मिळेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
मीन : आत्मविश्वास वाढेल. नेतृत्वाची संधी मिळू शकते. सन्मानात वाढ होईल. अहंकार टाळल्यास दिवस उत्तम जाईल