मेष : आजचा दिवस उत्साहाचा असेल. प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी दिवस उत्तम आहे. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवाल. मात्र, घाईघाईत मोठा निर्णय घेऊ नका.
वृषभ : आर्थिक दृष्टिकोनातून दिवस मध्यम आहे. गुंतवणुकीचे विचार करत असाल तर तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. घरात पाहुण्यांच्या आगमनाने वातावरण प्रसन्न राहील.
मिथुन : नवीन ओळख भविष्यात फायदेशीर ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पकतेला वाव मिळेल. प्रवासाचे योग असून तो सुखद होईल.
कर्क : मनावर थोडा ताण राहण्याची शक्यता आहे. अनावश्यक वादात पडणे टाळा. जोडीदारासोबत वेळ घालवल्याने मन हलके होईल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
सिंह : तुमचा आत्मविश्वास आज शिखरावर असेल. नोकरीत बढती किंवा नव्या संधी मिळण्याची शक्यता आहे. रखडलेली सरकारी कामे आज मार्गी लागू शकतात.
कन्या : खर्चाचे प्रमाण वाढू शकते, त्यामुळे बजेटवर लक्ष द्या. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी जुळवून घ्यावे लागेल. मुलांच्या प्रगतीमुळे मन समाधानी राहील.
तूळ : दिवस लाभाचा, जुनी येणी वसूल आहेत.घरात मंगलकार्य घडण्याची चिन्हे आहेत. जोडीदाराशी असलेले संबंध अधिक दृढ होतील. जोडीदाराकडून भेटवस्तू मिळू शकते.
वृश्चिक : व्यावसायिकांसाठी आजचादिवस प्रगतीचा आहे. नवीन प्रकल्प हाती घेण्यास हरकत नाही. प्रकृती उत्तम राहील. मात्र, रागावर नियंत्रण ठेवणे हितकारक ठरेल.
धनु : नशिबाची पूर्ण साथ आज तुम्हाला मिळेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. परदेश गमनाचे प्रयत्न यशस्वी होऊ शकतात. वडिलांचे मार्गदर्शन लाभेल.
मकर : धावपळीचा दिवस असू शकतो. वाहने जपून चालवा. हितशत्रूपासून सावध राहा. संयम बाळगल्यास कठीण प्रसंगातून सहज बाहेर पडाल. आर्थिक व्यवहार जपून करा.
कुंभ : कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहील. भागीदारीच्या व्यवसायात धनलाभहोईल. अविवाहितांसाठी विवाहाचे प्रस्ताव येतील. तुमची प्रतिमा समाजात उंचावेल.
मीन : नोकरदारांसाठी अनुकूल दिवस. तुमच्या कामाचे कौतुक होईल. आरोग्यात सुधारणा होईल. जुन्या मित्रांच्या भेटीमुळे बालपणीच्या आठवणींना उजाळा मिळेल.