Today Rashi Bhavishya in Marathi file photo
ज्योतिष आणि धार्मिक

Horoscope 2 April 2026: या राशींसाठी आज धाडस केलं तर चांगले परिणाम... जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Today Rashi Bhavishya in Marathi: आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

Anirudha Sankpal

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

मेष

मेष : आज काही नवीन सुरू करण्याची इच्छा होईल. धाडस केलंत तर चांगले परिणाम दिसतील. पण निर्णय घेताना घाई टाळा.

वृषभ

वृषभ

वृषभ : आर्थिक बाबतीत सावध राहण्याचा दिवस, अनावश्यक खर्च टाळा. नियोजन महत्त्वाचे. जवळच्या व्यक्तीकडून मदत मिळेल.

मिथुन

मिथुन

मिथुन : संवादातून कामे मार्गी लागतील, मित्र किंवा सहकाऱ्यांशी चांगली चर्चा होईल. एखादी नवीन संधी मिळू शकते.

कर्क

कर्क

कर्क : मन थोडं संवेदनशील राहील. कुटुंबाकडून भावनिक आधार मिळेल. शांत राहून निर्णय घेतले तर फायदा.

सिंह

सिंह

सिंह : आज तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल. कामात नेतृत्व करण्याची संधी मिळेल. लोक तुमच्या मतांना महत्त्व देतील.

कन्या

कन्या

कन्या: लहानसहान गोष्टीमध्ये अडकण्याची शक्यता. थोडं रिलॅक्स राहिलात तर दिवस चांगला जाईल. आरोग्याकडे लक्ष द्या.

तूळ

तूळ

तूळ : नातेसंबंधात गोडवा वाढेल. एखादे जुने गैरसमज दूर होऊ शकते. मन प्रसन्न राहील. प्रलंबित कामे पूर्ण होतील.

वृश्चिक

वृश्चिक

वृश्चिक : कामात थोडा ताण जाणवेल. पण मेहनतीचा परिणाम नक्की मिळेल. स्वतः वर विश्वास ठेवा. कुटुंबात आनंद राहील.

धनु

धनु

धनू: प्रवास किंवा बदलाची शक्यता. नवीन अनुभव मिळतील. उत्साहात निर्णय घेताना विचार करा. कीर्ती वाढेल.

मकर

मकर

मकर : कामात प्रगतीची चिन्हे दिसतील. वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकते. संधीचा योग्य उपयोग करा. आरोग्य सांभाळा.

कुंभ

कुंभ

कुंभ : विचारांमध्ये नावीन्य दिसेल. क्रिएटिव्ह कामांसाठी उत्तम दिवस, मित्रांसोबत वेळ छान जाईल. आर्थिक लाभ होईल.

मीन

मीन

मीन : स्वप्न आणि वास्तव यामध्ये संतुलन ठेवा. एखादी चांगली बातमी मिळू शकते. मन शांत ठेवले तर निर्णय योग्य होतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT