Today Rashi Bhavishya in Marathi file photo
ज्योतिष आणि धार्मिक

Horoscope 19 February 2026: या राशीच्या लोकांसाठी आज 'आर्थिक' यशाचा दिवस; मात्र यांचा वाढणार खर्च

Today Rashi Bhavishya in Marathi : आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

Anirudha Sankpal

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

मेष

मेष : आज कामात गती येईल; पण घाईगडबड टाळा. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीशी संवाद साधल्याने गैरसमज दूर होतील. अपत्ये आनंद देतील.

वृषभ

वृषभ

वृषभ : नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा. आरोग्याकडे थोडे लक्ष देणे गरजेचे आहे. दिवस आनंदी जाईल.

मिथुन

मिथुन

मिथुन : दिवस व्यस्त जाईल; पण मेहनतीचे फळ मिळेल. मित्रांकडून सहकार्य मिळेल. निर्णय घेताना शांतपणे विचार करा. जोडीदाराची साथ लाभेल.

कर्क

कर्क

कर्क : भावनिक गोष्टींमध्ये स्थिर राहा. घरगुती वातावरण आनंदी राहील. कामात वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभेल. मित्र, नातेवाईक भेटतील.

सिंह

सिंह

सिंह : आत्मविश्वास वाढेल. एखादे महत्त्वाचे काम पूर्ण होईल. आर्थिक व्यवहार करताना दक्षता घ्या. नेतृत्वावर शिक्कामोर्तब होईल.

कन्या

कन्या

कन्या : योजना आखण्यासाठी योग्य दिवस आहे. गुप्त गोष्टी उघड करू नका. नोकरीत प्रगतीची शक्यता आहे. आरोग्य चांगले राहील.

तूळ

तूळ

तूळ : नवीन ओळखी लाभदायक ठरतील. जोडीदारासोबत वेळ घालवण्यासाठी चांगला दिवस खर्च वाढू शकतो.

वृश्चिक

वृश्चिक

वृश्चिक : कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. काही गोष्टींमध्ये संयम बाळगा. गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. आर्थिक यश येईल.

धनु

धनु

धनु : प्रवासाचा योग. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती दिसेल. कुटुंबातील वातावरण सकारात्मक राहील. आर्थिक बाबतीत संयम ठेवा.

मकर

मकर

मकर : आर्थिक स्थिती स्थिर राहील. आरोग्याची काळजी घ्या. जबाबदाऱ्या वाढतील; पण तुम्ही त्या समर्थपणे पार पाडाल.

कुंभ

कुंभ

कुंभ : नवीन कल्पना यशस्वी ठरतील. मित्रमंडळींसोबत आनंदी वेळ जाईल. कामात ताण जाणवू शकतो. अपत्ये आनंद देतील.

मीन

मीन

मीन : मनःशांतीसाठी ध्यान-प्रार्थना उपयोगी ठरेल. एखादी जुनी समस्या सुटण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT