सूर्य-बुध मिळून 'बुधादित्य योग', मंगळासोबत 'मंगलादित्य योग'
शुक्रासोबत 'शुक्रादित्य योग' देखील तयार होणार
वर्षाची सुरुवात तीन राशींना अत्यंत शुभ संकेत मिळतील
Chaturgrahi Yog 2026 : नवीन वर्ष २०२६ ची सुरुवात एका मोठ्या आणि दुर्मिळ चतुर्ग्रही योगात होणार आहे. १ जानेवारी २०२६ रोजी धनु राशीमध्ये सूर्य, मंगळ, बुध आणि शुक्र या चार ग्रहांचा हा योग तयार होईल. सध्या मंगळ ग्रह धनु राशीत आहे, तर १६ डिसेंबरला सूर्य, २० डिसेंबरला शुक्र आणि २९ डिसेंबरला बुध ग्रह देखील धनु राशीत प्रवेश करतील. ज्योतिषशास्त्रानुसार, वर्षाच्या सुरुवातीचा हा दुर्मिळ योग पुढील तीन राशींसाठी अत्यंत शुभ संकेत देत आहे. जाणून घेवूया या तीन राशींविषयी...
नववर्षातील ग्रहांच्या परिवर्तनाचा वृषभ राशीच्या जातकांना शुभ लाभ होणार आहे. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. यश आणि प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील. नोकरी आणि व्यापार या दोन्ही क्षेत्रांत उन्नतीची प्रबळ शक्यता आहे. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. प्रेम जीवनात सामंजस्य आणि नात्यात गोडवा येईल.मोठे निर्णय आणि गुंतवणुकीसाठी काळ अनुकूल आहे. बऱ्याच काळापासून अडलेली कामे पूर्ण होतील. भागीदारीच्या कामांमध्ये लाभ होण्याची अधिक शक्यता राहील. संयम आणि धैर्याने केलेल्या कामात यश मिळेल.
तूळ राशीच्या जातकांचा त्मविश्वास आणि प्रतिष्ठा वाढेल. करिअर आणि व्यवसायात प्रगती होईल.धनवृद्धीचे योग दिसून येत आहेत. कुटुंबात आनंदी वातावरण राहील आणि सामाजिक वर्तुळात तुमचा प्रभाव वाढेल.तुमच्या सर्जनशील क्षमता आणि नेतृत्वाच्या गुणांमुळे तुम्हाला मोठा लाभ मिळेल.नोकरी किंवा व्यवसायात मिळालेली नवी जबाबदारी फायदेशीर ठरेल. मित्र आणि सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य लाभेल.
धनू राशीच्या जातकांना आर्थिक आघाडीवर लाभ होईल. शिक्षण, करिअर आणि व्यवसायात प्रगतीची शक्यता आहे. प्रेम संबंध आणि वैवाहिक जीवनात सुसंवाद वाढेल. घरात सुखद आणि आनंदी वातावरण कायम राहील.आपल्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि नवीन योजना सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे.नवीन गुंतवणूक फायदेशीर ठरेल. कोणत्याही कामात यश मिळण्याची प्रबळ शक्यता आहे. आरोग्यात सुधारणा होईल.
टीप: वरील माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे. प्रत्येक व्यक्तीची पत्रिका वेगळी असल्यामुळे, त्याचा परिणामही वेगवेगळा असू शकतो. कोणत्याही महत्त्वपूर्ण निर्णयासाठी किंवा महत्त्वाच्या कामासाठी कृपया तज्ज्ञांचा सल्ला घ्या.