Thumb  File Photo
ज्योतिष आणि धार्मिक

Palmistry Thumb Astrology: तुमचा अंगठाही मागे वाकतो का? हस्तरेषाशास्त्रानुसार त्याचा अर्थ जाणून घ्या

काही लोकांच्या हाताचा अंगठा मागे सहज झुकतो, तर काही लोकांचा अंगठा अगदी ताठ आणि सरळ असतो. हस्तरेषा शास्त्रानुसार यावरून व्यक्तीचे महत्त्वाचे संकेत मिळतात.

पुढारी वृत्तसेवा

Palmistry Thumb Astrology

नवी दिल्ली: काही लोकांच्या हाताचा अंगठा मागे सहज वाकतो, तर काही लोकांचा अंगठा अगदी ताठ आणि सरळ असतो. हा फरक केवळ शरीराच्या रचनेपुरता मर्यादित नसून, हस्तरेषाशास्त्रानुसार यावरून व्यक्तीचा स्वभाव, निर्णयक्षमता आणि आर्थिक नियोजन यांबद्दल महत्त्वाचे संकेत मिळतात.

१. मागे झुकणारा (लवचिक) अंगठा

हस्तरेषाशास्त्रानुसार, ज्यांचा अंगठा सहज मागे झुकतो, त्या व्यक्ती खुल्या विचारांच्या आणि दिलखुलास असतात. अशा व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्वात काही वैशिष्ट्ये आढळतात. या व्यक्ती जिथे जातात तिथे पटकन मित्र बनवतात. नवीन जागांना भेटी देणे, प्रवास करणे आणि लोकांमध्ये मिसळणे त्यांना आवडते. भविष्याची अनावश्यक चिंता करण्यापेक्षा हे लोक वर्तमानकाळ आनंदाने जगण्यावर भर देतात. पैशाच्या बाबतीत हे लोक अजिबात कंजूष नसतात.

दानधर्म आणि इतरांना मदत करण्यात हे लोक पुढे असतात. विशेष म्हणजे, यांना दीर्घकाळ पैशांची चणचण भासत नाही; अडचणीच्या वेळी कुठून ना कुठून मार्ग निघतोच. यांच्या याच सरळ स्वभावाचा फायदा इतर लोक घेतात. भावनावश होऊन घेतलेल्या निर्णयामांमुळे अनेकदा यांची फसवणूक किंवा नुकसान होते. मात्र, परिस्थिती कितीही कठीण असली तरी हे लोक हार मानत नाहीत.

२. अगदी ताठ (सरळ) राहणारा अंगठा

ज्यांचा अंगठा मागे न झुकता अगदी सरळ आणि ताठ असतो, त्यांचा स्वभाव लवचिक अंगठा असणाऱ्यांपेक्षा पूर्णपणे वेगळा असतो. या व्यक्ती एकदा ठरवलेली गोष्ट पूर्ण केल्याशिवाय थांबत नाहीत. स्वतःची तत्त्वे आणि शब्दांशी तडजोड करणे यांना आवडत नाही.

हे लोक हृदयापेक्षा डोक्याने जास्त विचार करतात. भावनांच्या भरात वाहून न जाता, कोणत्याही प्रसंगाचे नफा-तोटा तपासूनच ते योग्य तो निर्णय घेतात. पैशांचे नियोजन करण्यात या व्यक्ती अत्यंत हुशार असतात. बजेट सांभाळणे, नको असलेले खर्च टाळणे आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे हे यांचे प्रमुख वैशिष्ट्य मानले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT