आपल्या कूलशिलाबद्दल, परंपरेबद्दल, आपल्या पूर्वजांबद्दल आपणाला विशेष अभिमान असतो. घरातील, परिवारातील व सभोवतालच्या लोकांनी आपल्याला खास वागणूक द्यावी अशी आपली कल्पना असते. सिंह हा वनाचा राजा असतो. कितीही अडचण आली, तरी सिंह हा कधी गवत खाणार नाही. माझे जीवन व व्यक्तिमत्त्व स्वयंभू आहे, हे जसे त्या सिंहाचे असते तसेच आपल्या व्यक्तिमत्त्वाबद्दल असते.
स्थूलमानाने आरोग्य दि. 01/01/2025 ते दि. 18/10/2025 पर्यंत चांगले राहणार आहे. तसेच दि. 05/12/2025 ते दि. 31/12/2025 पर्यंत आरोग्य चांगले राहणार आहे.
आरोग्य द़ृष्टीने चांगले कालखंड
दि. 13/04/2025 ते दि. 16/07/2025
दि. 16/08/2025 ते दि. 16/09/2025
व्यवसाय, उद्योग, आर्थिक स्थिती
सामान्यत: दि. 01/01/2025 ते दि. 18/10/2025 व दि. 05/12/2025 ते दि. 31/12/2025 हे कालखंड व्यवसायाला व आर्थिक लाभाला चांगले आहेत. त्यामुळे सामान्यत: सिंह राशीच्या व्यक्तींना हे वर्ष चांगले जाणार आहे. दि. 01/01/2025 ते दि. 14/05/2025 या कालखंडात आपण नवीन व्यवसाय सुरू करू शकता किंवा व्यवसायाची शाखा सुरू करू शकता. हे वर्ष प्रॉपर्टी, जागा, जमिनी, वाहने, बिल्डर्स, डेव्हलपर्स व कॉन्ट्रॅक्टर्स तसेच शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींना तसेच ट्रान्स्पोर्ट, टुरिस्ट, सर्व्हिस सेंटर, ऑटोमोबाईल्स, लेखन, प्रकाशन, प्रिंटिंग प्रेस, वृत्तपत्र, कायदा, न्याय, कला, संगीत, नाट्य या क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यशदायक जाणार आहे. यावर्षी गडी, नोकर, कर्मचारी यांचे सहकार्य लाभेल. शत्रुपिडा नाही.
आर्थिक लाभाच्या द़ृष्टीने चांगला कालखंड
दि. 01/01/2025 ते दि. 27/01/2025
दि. 13/04/2025 ते दि. 28/08/2025
दि. 15/09/2025 ते दि. 20/12/2025
नोकरीतील सिंह राशीच्या व्यक्तींना हे वर्ष यशदायक व लाभदायक आहे. दि. 01/01/2025 ते दि. 14/05/2025 या कालखंडात नोकरीत बढतीचे योग आहेत. या कालखंडात तुमच्या प्रगतीच्या आड कोणी येऊ शकणार नाही. हितशत्रूंच्या कारवायांचे काही चालणार नाही. तुम्ही मुळातच अधिकारावर असाल, तर हाताखालील व्यक्तींचे चांगले सहकार्य मिळणार आहे. हे वर्ष सिंह राशीच्या व्यक्तींना अत्यंत यशदायक व लाभदायक आहे. तुम्ही आजपर्यंत केलेल्या कामाचे, कर्तृत्वाचे चीज होईल तुमच्या कार्याची दखल घेतली जाईल. हे वर्ष इतके चांगले आहे, की तुम्हाला बढती मिळाल्याशिवाय राहणार नाही. पगारवाढीचीही शक्यता आहे. तुम्हाला बदली हवी असेल, तर ती बदली दि. 01/04/2025 नंतर घ्यावी. तुम्हाला हव्या त्या ठिकाणी बदली मिळेल.
नोकरीत अधिक चांगला कालखंड
दि. 01/01/2025 ते दि. 28/01/2025
दि. 01/06/2025 ते दि. 28/07/2025
दि. 27/10/2025 ते दि. 20/12/2025
प्रॉपर्टी
प्रॉपर्टी, जागा, जमिनी, गुंतवणूक, घर, बंगला, फ्लॅट, प्लॉट, वाहन खरेदीसाठी हे वर्ष खूपच चांगले आहे. विशेषत: दि. 01/01/2025 ते दि. 14/05/2025 हा कालखंड अगदी चांगला आहे.
संततिसौख्य, मुलामुलींची प्रगती, त्यांचे नोकरी, व्यवसायातील प्रश्न व त्यांच्या सर्व क्षेत्रातील प्रगतीच्या द़ृष्टीने सिंह राशीच्या व्यक्तींना हे वर्ष अनुकूल आहे. विशेषत: दि. 01/01/2025 ते दि. 01/04/2025 हा कालखंड पूर्णपणे चांगला आहे. दि. 02/04/2025 ते दि. 31/12/2025 हा कालखंड अनुकूल आहे; परंतु या कालखंडात संततिसौख्याच्या द़ृष्टीने शनी प्रतिकूल असल्यामुळे हा कालखंड काहीसा संमिश्र जाण्याची शक्यता आहे, तरीही दि. 01/01/2025 ते दि. 18/10/2025 हा कालखंड संततिसौख्याला चांगला आहे.
संततिसौख्यासाठी चांगला कालखंड.
दि. 14/05/2025 ते दि. 20/08/2025
दि. 02/10/2025 ते दि. 24/10/2025
दि. 02/11/2025 ते दि. 26/11/2025
दि. 21/12/2025 ते दि. 31/12/2025
वैवाहिक सौख्य व विवाहेच्छुंचे विवाह या द़ृष्टीने सिंह राशीच्या व्यक्तींना हे वर्ष समाधानकारक आहे. सिंह राशीच्या विवाहेच्छू मुला-मुलींना दि. 01/01/2025 ते दि. 17/10/2025 व दि. 05/12/2025 ते दि. 31/12/2025 हे संपूर्ण कालखंड विवाहासाठी, साखरपुड्यासाठी व शुभ कार्यासाठी चांगले आहेत. या कालखंडात सिंह राशीच्या मुलामुलींचे विवाह होऊ शकतात.
वैवाहिक सौख्याच्या द़ृष्टीने अनुकूल कालखंड
दि. 07/06/2025 ते दि. 26/07/2025
दि. 15/09/2025 ते दि. 09/10/2025
दि. 02/11/2025 ते दि. 31/12/2025
प्रवास, तीर्थयात्रा, परदेश प्रवास या द़ृष्टीने सिंह राशीच्या व्यक्तींना हे वर्ष समाधानकारक आहे. शिक्षण, व्यापार, उद्योग व सहली यानिमित्ताने यावर्षी प्रवासाचे योग येणार आहेत. प्रवास सुखकारक होतील. विशेषत: शिक्षण व व्यापार या द़ृष्टीने होणारे प्रवास विशेष लाभदायक होणार आहेत.
प्रवासाच्या द़ृष्टीने चांगला कालखंड
दि. 01/01/2025 ते दि. 20/01/2025
दि. 07/06/2025 ते दि. 19/08/2025
दि. 18/10/2025 ते दि. 31/12/2025
सुसंधी, प्रसिद्धी, अंगीकृत कार्यात यश या द़ृष्टीनेे सिंह राशीच्या व्यक्तींना हे वर्ष मोठ्या प्रमाणावर अनुकूल आहे. दि. 01/01/2025 ते दि. 18/10/2025 हा संपूर्ण कालखंड लेखन, प्रकाशन, कला, संगीत, नाट्य, चित्रपट, रंगभूमी, अभिनय, प्रसारमाध्यमे, वृत्तपत्र, कलेचे क्षेत्र या सर्व द़ृष्टीने विशेष अनुकूल आहे. विशेष म्हणजे, आपणाला आपल्या क्षेत्रात संधी मिळेल; परंतु त्याबरोबरच आर्थिक लाभ होतील. काही व्यक्तींना आपापल्या क्षेत्रात पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे. सिंह राशीच्या व्यक्ती या वर्षी आपल्या क्षेत्रामध्ये विशेष उंची गाठू शकतील.
सुसंधी, प्र्रसिद्धीसाठी अनुकूल कालखंड
दि. 01/06/2025 ते दि. 19/08/2025
दि. 15/09/2025 ते दि. 18/10/2025
दि. 02/11/2025 ते दि. 20/12/2025
प्रतिष्ठा, अधिकारपद, मानमान्यता
प्रतिष्ठा, मानसन्मान या द़ृष्टीने समाजकारण, सार्वजनिक जीवन, राजकारण, शिक्षण, साहित्य, सहकार, बँकिंग, सांस्कृतिक क्षेत्र या सर्व क्षेत्रांत आपणाला मानसन्मानाचे योग येतील. प्रतिष्ठा लाभेल. काहींना अधिकारपद लाभेल. सिंह रास ही मुळात सत्येची अभिलाषा असणारी रास आहे. त्यामुळे सिंह राशीच्या व्यक्ती नैसर्गिकरीत्या आघाडीवर येतात. त्यामुळे या वर्षी आपल्या आशा-आकांक्षा पूर्ण होणार आहेत. आपल्या कष्टाचे, कार्याचे, अनुभवाचे चीज होईल.
मान, प्रतिष्ठेसाठी चांगला कालखंड
दि. 01/06/2025 ते दि. 26/07/2025
दि. 16/08/2025 ते दि. 16/09/2025
दि. 18/10/2025 ते दि. 26/11/2025
सारांश : सिंह राशीच्या व्यक्तींना सामान्यत: पहिले साडेनऊ महिने हे अनेक द़ृष्टीने चांगले जाणार आहेत. म्हणजेच दि. 01/01/2025 ते दि. 18/10/2025 हा सर्व कालखंड अनेक द़ृष्टीने लाभदायक आहे. आरोग्य चांगले राहणार आहे. आर्थिक लाभाच्या द़ृष्टीने दि. 01/01/2025 ते दि. 18/10/2025 या संपूर्ण कालखंडात गुरू अनुकूल आहे.