आपल्याकडे सात्विकता आहे. प्रेमळपणा आहे. विशुद्ध मन ही परमेश्वराने आपणाला दिलेली देणगी आहे. एखाद्या व्यक्तीची, नेत्याची, साधू-संताची, परमेश्वराची भक्तिभावाने पूजा करणे आपल्याला विशेष आवडते. आपण ज्या संस्थेत, ज्या पक्षात व ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी जीव ओतून काम करण्याचा आपला स्वभाव आहे. कोणताही विषय आपण शीघ्रतेने ग्रहण करू शकता. आपली ग्रहणशक्ती व कल्पनाशक्ती चांगली असते.
दि. 14/05/2025 ते दि. 28/10/2025 हा कालखंड वगळून आरोग्य चांगले राहणार आहे. याचा अर्थ दि. 15/05/2025 ते दि. 18/10/2025 व दि. 05/12/2025 ते दि. 31/12/2025 पर्यंत गुरू बाराव्या स्थानात असणार आहे.
आरोग्याच्या द़ृष्टीने चांगले कालखंड.
दि. 28/01/2025 ते दि. 26/07/2025
दि. 20/08/2025 ते दि. 14/09/2025
दि. 02/11/2025 ते दि. 20/12/2025
व्यवसाय, आर्थिक स्थिती, आर्थिक लाभ, उद्योगाच्या द़ृष्टीने कर्क राशीच्या व्यक्तींना हे वर्ष मोठ्या प्रमाणावर अनुकूल आहे, यशदायक आहे व लाभदायक आहे. हे वर्ष आर्थिक लाभाला चांगले आहे. अनेकांचे सहकार्य लाभेल. तुमचे निर्णय अचूक ठरतील. दि. 29/03/2025 पासून शनी भाग्यस्थानी जाणार आहे. हा शनी भागीदारी व्यवसायासाठी चांगला आहे. यावर्षी अनेकांचे सहकार्य लाभेल. दि. 29/05/2025 पर्यंत राहू भाग्यस्थानी आहे, त्याचाही फायदा होईल. स्थूलमानाने खालील कालखंड व्यवसाय व आर्थिक लाभाच्या द़ृष्टीने चांगले जातील.
आर्थिक लाभाच्या द़ृष्टीने चांगला कालखंड.
दि. 01/01/2025 ते दि. 14/05/2025
दि. 18/10/2025 ते दि. 05/12/2025
कर्क राशीच्या व्यक्तींना नोकरीसंदर्भात हे वर्ष प्रगतीचे आहे, यशदायक आहे. पदोन्नतीचे आहे, पगारवाढीचे आहे. वर्षाच्या पूर्वार्धात तुम्हाला जर बदली हवी असेल, तर ही बदली योग्य ठिकाणी मिळेल. नोकरीमध्ये अनेकांचे सहकार्य लाभेल.
नोकरीत अधिक चांगला कालखंड.
दि. 01/01/2025 ते दि. 20/01/2025
दि. 13/04/2025 ते दि. 14/05/2025
दि. 06/06/2025 ते दि. 28/07/2025
दि. 26/11/2025 ते दि. 05/12/2025
प्रॉपर्टी, गुंतवणूक, जागा, जमिनी, बंगला, फ्लॅट, प्लॉट, वाहन खरेदी या द़ृष्टीने खालील कालखंड चांगला.
संततिसौख्य
कर्क राशीच्या व्यक्तींना संततिसौख्य, मुला-मुलींची प्रगती, त्यांचे शाळा, कॉलेजचे प्रश्न या द़ृष्टीने दि. 01/01/2025 ते दि. 14/05/2025 व दि. 18/10/2025 ते दि. 05/12/2025 वरील कालखंड संततिसौख्यासाठी स्थूलमानाने चांगले आहेत.
संततिसौख्यासाठी चांगला कालखंड.
दि. 28/01/2025 ते दि. 26/07/2025
दि. 27/10/2025 ते दि. 05/12/2025
विवाहेच्छुकांचे विवाह, वैवाहिक सौख्य द़ृष्टीने कर्क राशीच्या व्यक्तींना स्थूलमानाने दि. 01/01/2025 ते दि. 14/05/2025 व दि. 18/10/2025 ते दि. 05/12/2025 हे कालखंड कर्क राशीच्या विवाहेच्छु मुला-मुलींचे विवाह होण्यासाठी अनुकूल आहेत. या कालखंडात कोणतेही शुभ कार्य आपण करू शकता.
वैवाहिक सौख्याच्या द़ृष्टीने अनुकूल कालखंड
दि. 28/01/2025 ते दि. 26/07/2025
दि. 20/08/2025 ते दि. 09/10/2025
दि. 02/11/2025 ते दि. 20/12/2025
प्रवास, तीर्थयात्रा, परदेश प्रवास या द़ृष्टीने कर्क राशीच्या व्यक्तींना हे वर्ष चांगले आहे.
प्रवासाच्या द़ृष्टीने चांगला कालखंड.
दि. 28/01/2025 ते दि. 26/07/2025
दि. 27/10/2025 ते दि. 07/12/2025
सुसंधी, प्रसिद्धी, अंगिकृत कार्यात यश या द़ृष्टीने कर्क राशीच्या व्यक्तींना हे वर्ष चांगले आहे. तुमच्या आशाआकांक्षा, मनोरथ पूर्ण होतील. कला, संगीत, नाट्य, लेखन, प्रकाशन, वृत्तपत्र, कायदा, पर्यटन, अभिनय, प्रसारमाध्यमे अशा अनेक क्षेत्रांतील व्यक्तींना यावर्षी संधी लाभणार आहे. गुरूचे भ्रमण आपणाला विशेष लाभदायक ठरणार आहे. तुम्हाला नवनवीन संधी लाभतील. तुम्ही आपल्या कर्तृत्वाचा व प्रतिभेचा, आपल्या सुप्त शक्तींचा ठसा उमटविण्यात यशस्वी व्हाल. तुमचे अनुभवाचे क्षितीज व्यापक होणार आहे. अनेकांना परदेशात जाण्याची संधी मिळेल. चित्रकारांनाही संधी मिळेल. अभिनय, कला व संगीताच्या क्षेत्रांत एक नवीन उंची गाठू शकाल.
खालील कालखंड सुसंधी, प्रसिद्धीसाठी अनुकूल
दि. 28/01/2025 ते दि. 06/07/2025
दि. 27/10/2025 ते दि. 07/12/2025
प्रतिष्ठा, मानसन्मान, सार्वजनिक कार्यात यश, समाजकारण, राजकारण, सहकार, शिक्षण इ. अनेक क्षेत्रांत आपणाला प्रतिष्ठा लाभेल. मानमान्यता मिळेल. तुम्हाला पद लाभेल. तुमच्या कार्याचे, तुमच्या अनुभवाचे चीज होईल. एखाद्या महत्त्वाच्या अधिकारपदी आपली नेमणूक होईल.
मान, प्रतिष्ठेसाठी चांगला कालखंड.
दि. 13/04/2025 ते दि. 14/05/2025
दि. 16/08/2025 ते दि. 16/09/2025
दि. 27/10/2025 ते दि. 07/12/2025
सारांश : सारांश, कर्क राशीच्या व्यक्तींना दि. 29/03/2025 पासून शनी अनुकूल आहे. दि. 29/05/2025 पर्यंत राहू अनुकूल आहे व दि. 14/05/2025 ते दि. 18/10/2025 व दि. 05/12/2025 ते दि. 31/12/2025 हा कालखंड वगळता उरलेला कालखंड चांगला आहे. म्हणजे दि. 01/01/2025 ते दि. 14/05/2025 व दि. 18/10/2025 ते दि. 05/12/2025 हा सर्व कालखंड आरोग्य, आर्थिक लाभ, संततिसौख्य, विद्यार्थ्यांना परीक्षेत यश, विवाहेच्छुकांचे विवाह होणे, घरात शुभ कार्य, मंगलकार्य होणे, वैवाहिक सौख्य लाभणे, प्रवास, तीर्थयात्रा, अनेकांचे सहकार्य, एखादी भाग्यकारक घटना घडणे अशा अनेक गोष्टींसाठी हा कालखंड चांगला आहे. मोठ्या प्रमाणावर शनी, राहू व गुरू हे अनुकूल आहेत. यामुळे कौटुंबिक सौख्य लाभेल. विशेषत:, मुला-मुलींचे प्रश्न मार्गी लागतील. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.
भागीदारी व्यवसायात वातावरण चांगले राहील. विशेषत:, तुमच्या कार्यक्षेत्रात कर्क राशीच्या व्यक्तींना चांगली संधी लाभणार आहे. नवीन व्यक्तींबरोबर परिचय होतील. मित्रांचे सहकार्य लाभेल, तीर्थयात्रेचे योग येतील. अनेक चांगल्या गोष्टी घडणे, भाग्यकारक घटना घडणे, अनेकांची मदत लाभणे व कौटुंबिक जीवनात सौख्य लाभणे हे या वर्षाचे महत्त्वाचे फलित आहे. आगामी वर्षाकडे आपण आशावादीपणाने पाहू शकता.