Angarak Yog 2026 file photo
ज्योतिष आणि धार्मिक

Angarak Yog 2026: कुंभ राशीत 'अंगारक योग'; 'या' ३ राशींवर येणार संकट, जाणून घ्या उपाय

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, २०२६ सालातील ग्रहांची चाल अनेकांच्या जीवनावर खोलवर परिणाम करू शकते.

पुढारी वृत्तसेवा

Angarak Yog 2026:

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, २०२६ सालातील ग्रहांची चाल अनेकांच्या जीवनावर खोलवर परिणाम करू शकते. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी ग्रहांचा सेनापती 'मंगळ' कुंभ राशीत प्रवेश करेल. विशेष म्हणजे, या राशीत आधीच 'राहू' ग्रह विराजमान असेल. मंगळ आणि राहू एकाच राशीत आल्याने 'अंगारक योग' निर्माण होईल. ज्योतिषशास्त्रात हा योग अत्यंत अशुभ मानला जातो. या योगामुळे व्यक्तीच्या जीवनात तणाव, क्रोध, गोंधळ आणि अचानक येणाऱ्या अडचणी वाढू शकतात अशी मान्यता आहे.

काय असतो अंगारक योग?

ज्योतिषशास्त्रात मंगळ हा अग्नी तत्त्वाचा आणि राहू हा वायू तत्त्वाचा ग्रह मानला जातो. जेव्हा हे दोन ग्रह एकत्र येतात, तेव्हा 'अंगारक योग' तयार होतो. नावाप्रमाणेच हा योग उग्र स्वरूपाचा असून यामुळे समाजात आणि वैयक्तिक आयुष्यात क्रोध, हिंसा, अपघात आणि मानसिक तणाव वाढण्याची शक्यता असते.

'या' राशींना बसणार फटका

१. मेष रास

मेष राशीच्या लोकांसाठी अंगारक योग अडचणी वाढवणारा ठरू शकतो. २२ फेब्रुवारीपर्यंतचा काळ तुमच्यासाठी अनुकूल असेल, मात्र २३ फेब्रुवारीनंतर परिस्थिती बदलू शकते. कामात अडथळे येऊ शकतात आणि करिअरबाबत मानसिक ताण वाढेल. आर्थिक परिस्थितीही डगमगू शकते आणि अचानक खर्च वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय, आरोग्याशी संबंधित तक्रारी उद्भवू शकतात, त्यामुळे निष्काळजीपणा टाळणे गरजेचे आहे.

२. मकर रास

मकर राशीच्या जातकांसाठी हा योग पैसा आणि करिअर या दोन्ही बाबतीत सतर्कतेचा इशारा देणारा आहे. या काळात आर्थिक नुकसान होण्याची भीती राहील. नोकरी किंवा व्यवसायात अडथळे येऊ शकतात. कामाचा ताण वाढल्यामुळे मानसिक अस्वस्थता जाणवेल. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज असून वैवाहिक जीवनातही मतभेद किंवा तणावाची स्थिती निर्माण होऊ शकते.

३. मीन रास

अंगारक योगामुळे मीन राशीच्या लोकांच्या जीवनात मोठी उलथापालथ होऊ शकते. करिअरमध्ये अस्थिरता जाणवेल. नोकरी बदलण्याची किंवा सुटण्याची भीती वाटू शकते. व्यापार करणाऱ्यांना नुकसान होण्याची शक्यता आहे. या काळात कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवणे महागात पडू शकते. कोणताही निर्णय घेताना अत्यंत सावध राहा.

अंगारक योगापासून बचावासाठी उपाय

  • अंगारक योगाचे नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी काही उपाय केले जाऊ शकतात.

  • नियमितपणे हनुमान चालीसा पठण करा.

  • मंगळवारी उपवास करणे शुभ मानले जाते.

  • तांबे किंवा लाल रंगाच्या वस्तूंचे दान करा आणि गाईला गूळ खाऊ घाला.

  • या उपायांमुळे मानसिक शांती मिळेल आणि नकारात्मक प्रभाव कमी होऊ शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT