Predictions:
नवी दिल्ली: वर्ष २०२० मधील ती भयावह कोरोना महामारी, लॉकडाऊन, जागतिक मंदी आणि भारत-चीन सीमावाद आजही कोणाच्या विस्मरणात गेलेला नाही. मात्र, ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. ज्या प्रकारची ग्रहांची आणि ग्रहणांची स्फोटक स्थिती २०२० मध्ये होती, तशीच काहीशी परिस्थिती आगामी २०२९ मध्ये पुन्हा निर्माण होताना दिसत आहे. एकाच वर्षात ६ ग्रहणे होणे हे मोठ्या नैसर्गिक आणि राजकीय उलथापालथीचे संकेत मानले जात आहेत. या वर्षातही ५ पेक्षा जास्त ग्रहणे आहेत आणि ग्रहांची स्थिती जरी तंतोतंत सारखी नसली, तरी त्यांची तीव्रता नाकारता येत नाही.
१. शनीचा मकर प्रवेश: २४ जानेवारी २०२० रोजी शनीने स्वतःच्या मकर राशीत प्रवेश केला. ही वर्षातील सर्वात मोठी घटना होती. शनीने येथे 'न्याय' आणि 'कठोर शिस्तीचा' दंड चालवला, ज्यामुळे जुन्या व्यवस्था कोलमडल्या.
२. गुरु-शनी युती: मार्च २०२० मध्ये गुरु देखील मकर राशीत गेला. गुरु आणि शनीचे पृथ्वी तत्त्वाच्या राशीत एकत्र येणे मोठ्या आपत्तींचे लक्षण मानले गेले. जेव्हा गुरु कमकुवत स्थितीत होता, तेव्हा श्वसनाचे आजार आणि ऑक्सिजनचे संकट आले होते.
३. राहू-केतू गोचर: २३ सप्टेंबर २०२० रोजी राहूने वृषभ आणि केतूने वृश्चिक राशीत प्रवेश केला. यामुळे शेअर बाजारात अस्थिरता आली, पण वैद्यकीय आणि अंतराळ तंत्रज्ञानात एका नवीन युगाची सुरुवात झाली.
४. २०२० मध्ये एकूण ६ ग्रहणे (२ सूर्यग्रहणे आणि ४ चंद्रग्रहणे) झाल्याने परिस्थिती आणखी गुंतागुंतीची झाली होती.
१० जानेवारी – चंद्रग्रहण
५ जून – चंद्रग्रहण
२१ जून – सूर्यग्रहण
५ जुलै – चंद्रग्रहण
३० नोव्हेंबर – चंद्रग्रहण
१४ डिसेंबर – सूर्यग्रहण
२०२० मध्ये ग्रहणांसोबत शनि, गुरू, राहू आणि केतू यांचा प्रभाव इतका प्रबळ होता की त्याने संपूर्ण जगाला 'रीसेट' मोडवर आणले. शनीने कर्माचे फळ दिले तर, गुरूने मानवतेला कठीण परिस्थितीत जगण्याचा एक नवीन मार्ग शिकवला.
२०२९ मध्ये जेव्हा शनी मेष राशीत, गुरु तूळ राशीत आणि राहू-केतू धनु-मिथुन अक्षावर असतील, तेव्हा एक अत्यंत गंभीर ज्योतिषीय परिस्थिती निर्माण होईल.
शिस्तीची परीक्षा: शनी मेष राशीत असताना 'नीच' मानला जातो. येथे तो सर्वांच्या शिस्तीची परीक्षा घेईल. ज्यांनी २०२० मधून काहीही धडा घेतला नाही, त्यांना या काळात मोठ्या संकटांना सामोरे जावे लागेल.
सत्ता संघर्ष आणि युद्ध: जगातील शासन प्रणालींविरुद्ध असंतोष वाढेल. शनीचा मंगळाच्या राशीशी संबंध आल्यावर मोठ्या युद्धाचा जन्म होतो (उदा. १९९९ चे कारगिल युद्ध). २०२९ मध्येही भौगोलिक सीमा बदलण्याची आणि युद्धाची दाट शक्यता आहे.
गुरु ऑगस्ट २०२९ मध्ये तूळ राशीत प्रवेश करेल. हे स्थान व्यापार आणि आंतरराष्ट्रीय संबंधांसाठी वरदान ठरू शकते. नवीन व्यापारी करार होतील आणि महिलांच्या हक्कांबाबत जागतिक स्तरावर मोठे बदल होतील. गुरु येथे शनीची उग्रता संतुलित करण्याचा प्रयत्न करेल.
वैचारिक क्रांती: धर्माच्या क्षेत्रात अतिवाद किंवा भ्रम निर्माण होऊ शकतो. दळणवळणाच्या साधनांमध्ये मोठा अडथळा येऊ शकतो किंवा नवीन तंत्रज्ञान उदयाला येईल.
१४ जानेवारी २०२९ – खंडग्रास सूर्यग्रहण
१२ जून २०२९ – खंडग्रास सूर्यग्रहण
२५-२६ जून २०२९ – खग्रास चंद्रग्रहण
११ जुलै २०२९ – खंडग्रास सूर्यग्रहण
५ डिसेंबर २०२९ – खंडग्रास सूर्यग्रहण
२०-२१ डिसेंबर २०२९ – खग्रास चंद्रग्रहण
१. दोन्ही वर्षांत ग्रहांची स्थिती जगाला 'रिसेट' मोडवर आणणारी आहे.
२. २०२० मध्ये मकर राशीतील शनीने आणि २०२९ मध्ये मेष राशीतील शनीने मानवाच्या कर्मांचा हिशोब घेतला जाणार आहे.
३. दोन्ही वर्षांत जागतिक अर्थव्यवस्थेत मोठी उलथापालथ दिसून येते.
४. २०२० मध्ये सीमा संघर्ष झाले, तर २०२९ मध्ये मोठ्या युद्धाची शक्यता नाकारता येत नाही.
५. शनी मेष राशीत नीच असल्याने महामारीचा काळ पुन्हा परतण्याची भीती आहे.
६. २०२० मध्ये लसींचे तंत्रज्ञान आले, तर २०२९ मध्ये अंतराळ विज्ञान आणि मानवी मेंदूशी संबंधित तंत्रज्ञानात (चिप तंत्रज्ञान) क्रांती होईल.