अर्थभान

दर्जेदार गुंतवणुकीची संधी

Arun Patil

कोरोनानंतरच्या बाजारातील तेजीला अमेरिकेतील महागाईच्या आकड्यांनी आणि फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर वाढवण्याच्या घोषणेने पुन्हा लगाम घातला आणि जगभरचे शेअर बाजार पुन्हा एकदा मंदीच्या खाईत ढकलले गेले. ऑक्टोबर 21 मध्ये 18604 वर असलेला निफ्टी 50 इंडेक्स जून 22 मध्ये 15382 झाला. परंतु शेअर बाजाराच्या अलिखित नियमानुसार सर्व आशंका, सर्व नकारात्मक बाजू या Discount झाल्याने बाजाराने पुन्हा एकदा वरची दिशा धरली आहे, हे याच आठवड्यातील भारतीय बाजारातील अभूतपूर्व तेजीने दाखवून दिले आहे.

अशा प्रकारे बाजार जेव्हा मंदीतून सावरून Recovery Phase मध्ये येतो, तेव्हा Value Stocks उत्तम परतावा देतात. कारण मुळातच Value Stocks चे फंडामेंटल्स अतिशय चांगले असतात. अशाच Value Stocks मधील निवडक शेअर्सवर BSE नेo (Bombay Stock Exchange) एक स्ट्रॅटेजिक इंडेक्स बनवला आहे, त्याचे नाव आहे S&P BSE Enhanced Value Index! या इंडेक्समध्ये 30 कंपन्यांचा समावेश आहे. त्या 30 कंपन्या कुठल्या आहेत? तर त्या S&P BSE Largemid Cap या इंडेक्समधून निवडल्या आहेत. बुक व्हॅल्यू टू प्राईस रेशो अर्निंगज् टू प्राईस रेशो आणि सेल्स टू प्राईस रेशो या तीन फंडामेंटल अ‍ॅनालिसीसमधील फॅक्टर्सच्या आधारावर ज्या कंपन्यांचे त Valuation उच्च आहे, अशा 30 कंपन्यांचा समावेश या फंडात आहे. म्हणजेच फंडामेंटली स्ट्राँग अशा 30 व्हॅल्यू कंपन्यांचा मिळून हा इंडेक्स बनला आहे.

अशा 30 तर Value कंपन्यांमध्ये गुंतवणूक करायला तुम्हाला आवडेल काय? तर मग तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. मोतीलाल ओसवाल या भारतीतील प्रथितयश अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनीने त्यांचा एक अनोखा नवीन फंड बाजारात आणला आहे. मोतीलाल ओसवाल एस अँड पी एनहान्सड व्हॅल्यू इंडेक्स फंड (G) 29 जुलै 2022 ते 5 ऑगस्ट 2022 हा त्याचा प्राथमिक गुंतवणूक कालावधी आहे. हा एक Open ended इंडेक्स फंड आहे. कमीत कमी गुंतवणूक 500 रु. आहे. स्वप्नील मयेकर हे या फंडाचे फंड मॅनेजर आहेत. शिवाय त्यांच्या जोडीला अभिरूप मुखर्जी हेही या फंडाचे व्यवस्थापन पाहणार आहेत.

या फंडामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी दोन द‍ृष्टींनी या फंडाचा विचार करायला हवा. एक तर हा NFO म्हणजे नवीन फंड आहे आणि दुसरे म्हणजे हा इंडेक्स फंड आहे. नवीन फंडाऐवजी जे बाजारामध्ये बरीच वर्षे आहेत आणि ज्यांनी उत्तम कामगिरी करून दाखवली आहे, अशा फंडामध्ये गुंतवणूक करावी असे बरेच सल्लागार सांगतात. परंतु फंड मॅनेजर हे अनुभवी असतात आणि त्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केलेली असते. त्यामुळे या दाव्याला तसा अर्थ राहत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे इंडेक्स फंडाचे जे गुणदोष आहे, त्यापैकी गुणांचा विचार करता इंडेक्स फंड हे Passive फंड असल्यामुळे, त्याचा व्यवस्थापन खर्च अतिशय कमी असतो. शिवाय फंड मॅनेजरचा पूर्वग्रह अशा फंडांमद्ये हस्तक्षेप करत नाही. इंडेक्स फंडाचा दोष म्हणाल, तर असे फंड इंडेक्सला Outperform करण्याची शक्यता क्वचितच असते. कारण फंड मॅनेजरच्या कौशल्याला शेअर्स निवडीला इथे फारसा वाव नसतो.

S&P BSE Enhanced Value Index हा वर सांगितल्याप्रमाणे लार्ज आणि मिड कॅप कॅटॅगरीमधील उत्कृष्ट 30 कंपन्यांचा मिळून बनलेला आहे. या कंपन्यांचे सेक्टरवाईज प्रमाण खालीलप्रमाणे आहे.

1) Oil & Gas – 30.17 टक्के
2) फाईनान्स – 30.12 टक्के
3) मेटल्स, माइनिंग – 27.94 टक्के
4) पॉवर – 9.96 टक्के
5) कंझ्युमर ड्युरेबल्स् – 2.14 टक्के

या इंडेक्सचे एक वैशिष्ट्य म्हणजे वर्षातून दोन वेळा या इंडेक्सचे Rebalancing होते. म्हणजे या इंडेक्समधील कंपन्यांची ज्या तीन रेशोंच्या आधारावर निवड केली जाते, ती सहा महिन्यांच्या कालावधीने Revaluation केले जाते आणि त्या आधारावर गरज असल्यास काही कंपन्यांना वगळले जाते, तर काही कंपन्यांचा नव्याने समावेश केला जातो.

एकूण काय, तर जे सावध गुंतवणूकदार आहेत, ज्यांच्या बाजारातील गुंतवणुकीपासून परताव्याच्या अपेक्षा अवास्तव नाहीत आणि उच्च दर्जाच्या कंपन्यांमध्ये ज्यांना आपली गुंतवणूक करायची आहे, त्यांनी या नवीन फंडामध्ये गुंतवणूक करावी. परंतु हा इंडेक्स फंड असल्याने आणि शिवाय Value फंड असल्याने आपला गुंतवणूक कालावधीही दीर्घ ठेवावा. या इंडेक्समधील Top 10 कंपन्या खालीलप्रमाणे आहेत.

1) NTPC Ltd.
2) India Oil Corporation
3) Bharat Petrolium Corporation
4) Oil India
5) Vedanta Ltd.
6) ONGC Ltd.
7) Tata Steel
8) God India
9) Hindalco
10) Bank of Baroda

भरत साळोखे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT