अर्थभान

एक्स्चेंज ट्रेडेड फंडस्-इटीएफ

Arun Patil

8 जानेवारी 2002 रोजी भारतातील पहिला इटीएफ नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट झाला. तो हाता निपॉन इंडिया निफ्टी 50 इंडेक्स इटीएफ! पहिल्याच दिवशी या इटीएफमध्ये 1 कोटी 30 लाख रुपयांचे ट्रेडिंग या फंडामध्ये झाले. आज 100 हून अधिक इटीएस एनएसईवर रोज ट्रेड होतात. 10 वर्षांमध्ये ही शंभर पटीपेक्षा अधिक वाढ एक्स्चेंज ट्रेडेड फंडस् यामध्ये भारतामध्ये झालेली आहे. तिच्यामागे इटीएफमध्ये गुंतवणूक करण्याचे जे विविध फायदे आहेत, त्यांचा हात आहे. ते फायदे खालीलप्रमाणे आहेत.

1) Trading Facility : सर्व ETF हे NFE वर लिस्ट होतात व तेथे त्यांची शेअर्सप्रमाणे खरेदी-विक्री होते, त्यामुळे गुंतवणूकदारांना Trading Facility चा लाभ घेता येतो.

2) Transperency : Trading Facility मुळे ETF चे भाव हे red time परावर्तित होतात आणि त्याच भावाने त्यांची खरेदी-विक्री होते. त्यामुळे इतर इक्विटी, डेट किंवा लिक्विड फंडापेक्षा ETF मध्ये अधिक पारदर्शकता असते.

3) Liquidity : इतर फंडामध्ये गुंतवलेले पैसे आपल्याला काढायचे असतील तर ते आपल्या खात्यात जमा होण्यास किमान तीन दिवस लागतात. शिवाय ते त्यादिवशी मार्केट बंद झाल्यावर जी NAV ठरते, त्यानुसार मिळतात. परंतु ETF मधील पैसे आपण मार्केटच्या वेळेत तत्क्षणी विकून पैसे काढू शकतो.

4) Low Costs : एक्स्चेंज ट्रेडेड फंडस् हे Passive फंडस् असल्यामुळे त्यामध्ये Operating Costs ची बचत होते. त्यामुळे तुम्ही कोणताही ETF घेतला तर त्याचा Expense Ratio हा एक टक्क्यापेक्षाही कितीतरी कमी आढळतो.

5) Tax Efficiency : ETFS : ना भारतामध्ये इक्विटी फंडांचे टॅक्सेशन लागू होते. म्हणजे आपला Holding Period एक वर्षापेक्षा अधिक असेल तर त्याला Long Term Capotal gain चा लाभ मिळतो. म्हणजे आपल्याला 20 टक्के Indexation चा फायदा मिळतो. परंतु आपण 9 वर्षांच्या आत ETF मधील गुंतवणूक काढली, तर आपल्या Income Slab नुसार आयकर आकारणी होते.

त्याचबरोबर इटीएफएस हे Tax Efficient आहेत असे म्हटले जाते. ते आणखी एका अर्थाने इक्विटी मॅच्युअल फंडामध्ये इंडेक्सपेक्षा अधिक रिटर्नस् दाखविण्यासाठी फंडामधील शेअर्समध्ये अधिक वेळा profit Booking केले जाते. वारंवारच्या या Churining मुळे STT (Security Transaction Tax) वाढतो. शिवाय Trading Brokerage ही वाढते. या दोन कारणांमुळे ETF मध्ये Expense Ratio ही कमी असतो आणि अंतिमतः त्यावर करही कमी भरावा लागतो.

भारतामध्ये गेल्या वीस वर्षांमध्ये इटीएफची संख्या 9 वरून 900च्या पुढे गेली असली तरी एकूण म्युच्युअल फंडाची संख्या आणि त्यांचा Aum पाहता ही संख्या नगण्य आहे. 31 डिसेंबर 2021 च्या Trading AMF च्या आकडेवारीनुसार भारतामध्ये 22 अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपन्यांच्या 2500 पेक्षा अधिक म्युच्युअल फंड योजना आहेत आणि त्या सर्वांचा AUM चा आकडा 37 लाख कोटी रु. पेक्षा अधिक आहे. त्यामानाने ETF तिची संख्या आणि त्यांचा Daily Traded Volume हा कमीच आहे. शिवाय कित्येक इटीएफमध्ये Volume अतिशय कमी असल्यामुळे त्यामध्ये Ciquidity नसते.

इटीएफमध्ये गुंतवणुकीसाठी डिमॅट खात्याची अनिवार्यता असणे, ही बाब भारतामध्ये इटीएफची संख्या कमी असण्यामागे आहे. इटीएफचा एक दोष म्हणजे सर्व इटीएफ हे Index-Specific असल्यामुळे Diversification चा लाभ मर्यादित होतो. कारण ते इटीएफ ज्या इंडेक्सचे प्रतिनिधित्व करतात, त्या इंडेक्समधील साधनांमध्येच गुंतवणूक होते.

तिसरा दोष म्हणजे इक्विटी किंवा डेट फंडाप्रमाणे SIP Route इटीएफमध्ये फारसा सोईस्कर होत नाही आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला स्वतःवर नियंत्रण ठेवावे लागते. अन्यथा इतर शेअर्सप्रमाणे इटीएफमध्येसुद्धा आपल्याकडून Overtrading होऊ शकते.

इटीएफ पाच प्रकारचे असतात. हे पाच प्रकार खालीलप्रमाणे :

1) Index ETF
2) Gold ETF, Silver ETF
3) Sectoral or Thematic ETF
4) International ETF
5) Bond ETF

भरत साळोखे

SCROLL FOR NEXT