गत सप्ताहात निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांकामध्ये किरकोळ बदल झाला. निफ्टी सप्ताहात एकूण 2.45 अंक वधारून 17856.5 अंक पातळीवर बंद झाला. तर सेन्सेक्स 159.18 अंक घटून 60682.7 अंकांच्या पातळीवर बंद झाला. रिझर्व्ह बँकेची द्वैमासिक पतधोरण आढावा बैठक तसेच अदानी समूहावरील विविध कारवाईच्या/घडामोडीच्या बातम्यांचा परिणाम बाजारावर झाला. आठवड्याभरात सर्वाधिक वाढ दर्शवणार्या समभागांमध्ये अदानी पोर्टस (26.27 टक्के), बजाज फायनान्स (12.55 टक्के), इंडसिंड बँक (7.93 टक्के) यांचे समभाग, तर सर्वाधिक घटणार्या समभागांमध्ये टाटा स्टील (9.30 टक्के), हिंडाल्को (6.93 टक्के), वेदांता (5 टक्के) या कंपन्यांचे समभाग होते.
हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहातील कंपन्यांवर पतमानांकन घटवण्याची विविध आंतरराष्ट्रीय संस्थांकडून कारवाई. मुडीज या पतमानांकन संस्थेकडून अदानी समूहातील चार कंपन्यांचे पतमानांकन स्थिर (ीींरलश्रश) वरून नकारात्मक (छशसरींर्ळींश) असे घटवण्यात आले तसेच एमएससीआय या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय निर्देशांकानेदेखील अदानी समूहातील चार कंपन्यांचे निर्देशांकाती वजन/भारांकन घटवले. नुकत्याच अदानी समूहाच्या एफपीओमध्ये सहभाग नोंदवणार्या बड्या गुंतवणूकदारांवर बाजारनियामक संस्था सेबीची नजर वळली. मॉरिशसस्थित कंपन्यांकडून एफपीओमध्ये गुंतवणूक आणणार्यांच्या व्यवहारांची चौकशी सेबीमार्फत करण्यात येत आहे. ग्रेट इंटरनॅशनल टस्कर फंड आणि आयुषमत या दोन मॉरिशसस्थित कंपन्यांची नावे याप्रकरणी चर्चेत आहेत.
बुधवारी रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढावा बैठकीत देशातील रेपोरेट (व्याजदर) 0.25 टक्के वाढवून 6.5 टक्क्यांवर नेण्याचा निर्णय झाला. मागील वर्षाच्या मे पासून आतापर्यंत रेपो रेटचे दर 2.50 टक्क्यांनी वाढले आहेत. परंतु यापुढेदेखील महागाई दर आटोक्यात आणण्यासाठी व्याज दर वाढवण्याची तयारी असल्याचे रिझर्व्ह बँकेचे म्हणणे. आर्थिक वर्ष 2024 मध्ये देशातील किरकोळ महागाई दर (कन्झ्युमर प्रर्इास इन्फलेशन रेट) 5.3 टक्के राहण्याचा रिझर्व्ह बँकेचा अंदाज तसेच अर्थव्यवस्था वृद्धीदर 6.4 टक्क्यांपर्यंत जाण्याचे रिझर्व्ह बँकेचे भाकीत. वाढीव रेपो रेटची परिणिती पुन्हा कर्जे महाग होण्यात होणार असल्याचे अर्थविश्लेषकांचे मत. कोरोना काळामधील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी व्याज दर घटवण्याचे सत्र चालू झाले. परंतु यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये अधिकची तरलता (एुलशीी ङर्र्ळिींळवळीूं) निर्माण होऊन महागाई वाढली. यामुळे व्याजदर वाढीचे सत्र मागील वर्षी सुरू झाले. सध्या या चक्रव्यूहातून भारतीय बँकिंग क्षेत्र बाहेर पडल्याचे प्रतिपादन शक्तिकांत दास (रिझर्व्ह बँक गव्हर्नर) यांनी केले.
पाकिस्तानी अर्थव्यवस्था दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पाकिस्तानची परकीय चलन गंगाजळी 3 अब्ज डॉलर्सपेक्षा कमी. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ)कडून 1.1 अब्ज डॉलर्सची मदत मिळवण्यासाठी पाकिस्तानी मंत्री व आयएमएफचे अधिकार यांच्यात दहा दिवसांपासून बैठका सुरू आहेत. 2019 साली पाकिस्तानला एकूण आयएमएफ (आंतरराष्ट्रीय नाणेनिधी) कडून 6.5 अब्ज डॉलरचा मदतनिधी मिळण्याचे ठरले होते. यापैकी 1.1 अब्ज डॉलर्सची मदत खरे तर डिसेंबर 2022 पर्यंत पाकिस्तानला मिळणे अपेक्षित होते. आणि 1.4 अब्ज डॉलर्सचा उरलेला मदतनिधीचा हप्ता जून 2023 पर्यंत मिळणे अपेक्षित आहे. परंतु, पाकिस्तानमधील एकूण अराजकता तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील मंदीमुळे पाकिस्तानवर कडक आर्थिक निर्बंध आधीच लादण्यात आले आहेत. आयएमएफचे पथक कोणत्याही ठोस मदतीच्या आश्वासनाशिवाय पाकिस्तानातून निघून गेल्याचे समजते. सध्याच्या गंगाजळीमधून पाकिस्तान इतर देशांशी केवळ 16 ते 17 दिवस व्यवहार चालू ठेवू शकेल. परकीय गंगाजळी समाप्त झाल्यास पाकिस्तानात वस्तू आयात करणे अशक्य होऊन दिवाळखोर बनेल.
रशियाकडून निर्मिती होणार्या कच्च्या तेलाच्या (खनिज तेल) किमतीवर पाश्चिमात्य राष्ट्रांकडून निर्बंध लादण्यात आले. या निर्बंधांना प्रत्युत्तरादाखल रशियाने मार्चपासून दरदिवशी तेलाचे उत्पादन 5 लाख बॅरल्सनी कमी करण्याचे म्हणजेच 5 टक्के घटवण्याचे जाहीर केले. यामुळे ब्रेंट क्रुड (खनिज तेलाचा) भाव 3.89 डॉलर प्रती बॅरल (2.2 टक्के) तर अमेरिकेच्या डब्लूटीआय क्रूडचा भाव 1.66 डॉलर प्रती बॅरल (2.1 टक्के) वधारून 79.72 डॉलरवर पोहोचला. एकूण आठवड्याभरात ब्रेंट क्रूडचा भाव 8.1 टक्के, तर डब्लूटीआय क्रुडचा भाव 8.6 टक्के वधारला.
चीनचा गुंतवणूकदार उद्योग समूह अलिबाबा पेटीएम कंपनीमधील 3.4 टक्क्यांचा हिस्सा विकून भारतीय बाजारातून बाहेर पडला. यापूर्वी जानेवारीत पेटीएममधील 3.1 टक्के हिस्सा विकला होता. बातमी बाहेर येताच पेटीएमचा समभाग सुमारे 8 टक्क्यांनी कोसळला. याआधी अलिबाबाने झोमॅटो व बिग बास्केटमधील हिस्सा विकला आहे.
देशातील महत्त्वाची वाहन उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्राचा चालू आर्थिक वर्षाचा तिसर्या तिमाहीचा नफा मागील वर्षीच्या तुलनेत 14 टक्के वधारून 1528 कोटी झाला. कंपनीचा महसूल 41 टक्के वधारून 21654 कोटी झाला.
जानेवारी महिन्यात इक्विटी प्रकारच्या म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचा ओघ 72 टक्के वधारून 12546.5 कोटींवर पोहोचला. एसआयपी माध्यमातून होणार्या गुंतवणुकीचा आकडा विक्रमी 13856.18 कोटींवर गेला. एसआयपी खात्यांची संख्या 62.1 दशलक्ष झाली, तर एसआयपी व्यवस्थापन अंतर्गत भांडवलमूल्य (एयूएम) 6.73 लाख कोटींवर पोहोचले.
31 डिसेंबर 2022 रोजी संपलेल्या तिमाहीत टाटा स्टील कंपनीला 2223.84 कोटींचा तोटा झाला. कंपनीला मागील वर्षी याच तिमाहीत 9572.67 कोटींचा नफा झाला होता. कंपनीचा महसूल 60783 कोटींवरून 57084 कोटींपर्यंत खाली आला. युरोपमधील मंदी तसेच वाढलेल्या ऊर्जा किमतीमध्ये (एनर्जी प्रायसेस) कंपनीला तोटा झाला.
आदित्य बिर्ला समूहाची प्रमुख कंपनी हिंडाल्कोचा तिसर्या तिमाहीचा नफा 3675 कोटींवरून 1362 कोटींपर्यंत खाली आला. कंपनीचा महसूल 50272 कोटींवरून 53151 कोटी झाला. जगात वाढलेल्या कच्च्या मालाच्या किमतीमुळे नफ्यावर परिणाम झाल्याचे कंपनीचे म्हणणे.
3 फेब्रुवारी रोजी संपलेल्या तिमाहीत भारताची परकीय चलन गंगाजळी 1.494 अब्ज डॉलर्सनी घटून 575.267 अब्ज डॉलर्स झाली.