अर्थभान

पत्नीच्या नावे घर खरेदी करताय?

Pudhari News

सतीश जाधव

बहुतांशी मंडळी आपल्या पत्नीच्या नावाने घर, फ्लॅट, बंगला खरेदी करतात. कायदेशीररित्या ही कृती चुकीची नाही. पत्नीच्या नावाने घराची नोंदणी केल्यास नोंदणी शुल्कात काही प्रमाणात सवलत मिळते. जर आपण 30 लाखांहून अधिक किमतीचा फ्लॅट किंवा मालमत्ता पत्नीच्या नावाने खरेदी केल्यास सरकार आपल्याकडून हिशोबाची मागणी करू शकते. एवढा पैसा कोठून आला याची चाचपणी सरकार, प्राप्तिकर विभाग करू शकते. 

पॅनकार्ड आवश्यक

नवीन नियमांनुसार 30 लाखांहून अधिक किमतीच्या मालमत्तेची नोंदणी करायची झाल्यास पॅनकार्डचे विवरण देणे बंधनकारक आहे. अशा स्थितीत जर एखादा व्यक्‍ती आपल्या पत्नीच्या नावाने घर खरेदी करत असेल आणि त्याची पत्नी  आयटीआर भरत नसेल तर सरकार नोटीस पाठवून उत्पन्नाबाबतची विचारणा करू शकते. घर खरेदीसाठी पैसा कोठून आला आणि त्यावर प्राप्तिकर भरला का नाही, अशी चौकशी प्राप्तिकर विभाग करू शकतो. 

उत्पन्नाच्या स्त्रोतांची माहिती

जर आपल्या उत्पन्नाच्या जोरावर पत्नीच्या नावाने मालमत्ता खरेदी केल्यास प्राप्तिकर विभाग नोटीस बजावू शकतो. या संदर्भात आपली पत्नी हा पैसा पतीच्या उत्पन्नातील असल्याचे प्राप्तिकर विभागाला सांगू शकते. त्यानंतर प्राप्तिकर विभाग या पैशाचा हिशेब मागू शकतो. त्यानंतर हा पैसा आपल्या नियमित उत्पन्नाचा भाग आहे, हे आपल्याला सिद्ध करावे लागेल. जर काळ्या अथवा बेहिशेबी पैशातून घर खरेदी केली असेल तर पती अडचणीत येतो.  

SCROLL FOR NEXT