भरत साळोखे, संचालक, अक्षय प्रॉफिट अँड वेल्थ प्रा. लि.
ट्रम्पप्रणीत टॅरिफ वाढीच्या धसक्यातील मार्केटने कसाबसा ऑगस्ट महिना शुक्रवारी, 29 ऑगस्ट रोजी शेवटास नेला. निफ्टी आणि सेन्सेक्स दीड टक्क्याच्या आसपास घसरले. स्मॉल कॅप, मिड कॅप आणि बँकिंग शेअर्सनी गुंतवणूकदारांची धूळधाण केली. निफ्टी बँक साडेचार टक्के, निफ्टी स्मॉल कॅप पावणेपाच टक्के तर मिड कॅप इंडेक्स साडेतीन टक्के कोसळले. रिअॅल्टी, फार्मा, एनर्जी, फायनान्शिअल्स शेअर्सनी मंदीवाल्यांना चांगलेच बळ पुरविले. सरकारी बँका आणि फायनान्शिअल शेअर्स खूपच घसरले.
सर्व सरकारी आणि खासगी बँका मंदीत असताना स्टेट बँक आणि कोटक बँक यांनी पाय मजबूतपणे रोवलेले आहेत. रु. 802.40 वर घसरलेला SBI चा शेअर्स आणि रु. 1959.20 वर असलेला कोटक बँकेचा शेअर यांना अद्याप तरी मंदी स्पर्श करू शकलेली नाही. बाजार जेव्हा Bearish पीरियडमध्ये असतो तेव्हा बाजार संबंधित शेअर्स चांगलेच घसरतात. Angel One, BSE, CDSL, KFintech हे शेअर्स मागील महिन्यात चांगलेच घसरले. परंतु, या शेअर्समध्ये Momentum इतका असतो की मार्केट तेजीत आले की अवघ्या काही सेशन्समध्ये ते आपला तोटा (शेअर प्राईस) भरून काढतात. आतासारख्या निराशाजनक परिस्थितीतही काही कंपन्यांचे शेअर्स गुंतवणूकदारांचे आणि विशेषतः ट्रेडर्सचे उखळ चांगलेच पांढरे करून देतात.
अशा शेअर्समध्ये गुंतवणूक करून अथवा ट्रेडिंग करून महिना, दोन महिने अथवा वर्षभर थांबणे हे ज्यांना जमते, त्यांचे खरोखर कौतुक करण्यासारखे आहे. शेअरची किंमत जर वर जात असताना कधी एकदा नफा पदरात पाडून घेतो, ही मानसिकता असते. वरील कंपन्याबरोबरच खालील काही दर्जेदार कंपन्यांचे शेअर्स मागील महिन्यात चांगलेच वधारले.
Titan Biotech - Rs. 723.50 - 67 % Rise
Izmo - Rs. 674 - 80 % Rise
Apollo micro Systems - Rs. 262 - 53% Rise
Shaily Engineering - Rs. 2223 - 37% Rise
HBL Engineering - Rs. 808.50 -39% Rise
Trade Brains हे एक कंपन्यांचे फंडामेंटल अॅनालिसिस करणारे उत्कृष्ट वेबपोर्टल आहे. शेअर मार्केटचा अभ्यास करणार्यांनी त्याचा जरूर अभ्यास करावा. या पोर्टलवर चार उत्कृष्ट शेअर्स दिले आहेत. ज्यांनी पहिल्या तिमाहीच्या आर्थिक निकषांमध्ये ऑपरेटिंग प्रॉफिटमध्ये 500 टक्क्यांहून अधिक वाढ (YOY) दर्शवली आहे. हे शेअर्स आगामी काळात गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळवून देऊ शकतात. ते खालीलप्रमाणे :
1) BSE Ltd. Rs. 2099
2) Hitachi Energy India Rs. 19110
3) ICICI Pru Life Insurance Rs. 599.95
4) Bajaj Holding & Investment Rs. 12751
FII Selling आणि DII Buying हे द्वंद्वयुद्ध गेल्या कित्येक महिन्यांप्रमाणे ऑगस्ट महिन्यातही सुरूच राहिले. परंतु, ऑगस्टध्ये DIIS नी FIIS वर निर्णायकरीत्या विजय मिळवला. कारण, ऑगस्ट महिन्यातील FIIS च्या विक्रीचा आकडा आहे. रु. 46,903 कोटी तर DIIS च्या खरेदीचा आकडा आहे रु. 94,829 कोटी म्युच्युअल फंडामधील SIP चा वाढता मोठा हवाला कारणीभूत आहे. हे एव्हाना सर्वांना ठाऊकच आहे. तो नसता तर बाजार किती कोसळला असता, त्याची कल्पनाच केलेली बरी!
शुक्रवारी बाजार बंद झाल्यावर समस्त गुंतवणूकदारांसाठी आणि एकूणच भारतीय अर्थव्यवस्थेसाठी एक अतिशय विस्मयचकित करणारी बातमी आली. पहिल्या तिमाहीत भारताची GDP Growth 7.8 टक्के राहिली. जी गेल्या वर्षी याच तिमाहीत 7.4 टक्के होती. वैशिष्ट्य म्हणजे RBI ने वर्तवलेला अंदाज 6.5 टक्के होता तर स्टेट बँकेने वर्तवलेला अंदाज 6.8 ते 7 टक्के होता. आज तरी भारत ही जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. 27 ऑगस्टपासून ट्रम्पनी वाढविलेल्या टॅरिफची अंमलबजावणी सुरू होईल. त्यामुळे इथून पुढील उर्वरित तीन महिन्यांमधील GDP Growth वर त्याचा नकारात्मक परिणाम दिसेल.
सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच GST स्लॅबसची पुनर्रचना आणि कमी केलेले दर जाहीर होतील. चार टप्प्यांमधील कर संकलनाची रचना दोन टप्प्यांवर येईल. ज्या सेक्टर्सना त्याचा फायदा होईल ती सेक्टर्स म्हणजे फर्टिलायझर्स अँड अॅग्रो केमिकल्स, रिन्यूएबल एनर्जी, टेक्स्टाईल्स अँड अॅपारेल्स. या सेक्टर्समधील कोणत्या कंपन्या लाभार्थी ठरतील, याची यादी मागील लेखात दिली आहे. GST रेट करमुळे वस्तूंच्या किमती कमी झाल्या आणि Consumption वाढले तर वाढीव टॅरिफमुळे होणार्या नुकसानीवर तो Counter Attack ठरेल काय?.
Avenue Supermart (D mart) चा शेअर मागील महिन्यात चांगला तेजीत राहिला. (Rs. 4752) ऑगस्ट महिन्यात तो 11 टक्के वाढला. रु. 5484.85 हा उच्चांक आहे. जीएसटी पुनर्रचनेचा सर्वाधिक फायदा त्याला होऊन तो आपला पूर्वीचा उच्चांक मोडून नवीन विक्रम प्रस्थापित करेल, अशी चिन्हे आहेत.
Ultratech Cement चा शेअर पुन्हा हालचाल करू लागला आहे. शासनाची इन्फ्रामधील वाढीव गुंतवणूक पाहता सिमेंट सेक्टर चांगलेच बहरेल. अल्ट्राटेकची गुणवत्ता आणि बाजार हिस्सा पाहता या शेअरमध्ये चांगला परतावा मिळेल, असे वाटते.
रु. 12,635 हा त्याचा आजचा भाव आहे आणि 12,930 हा त्याचा उच्चांक आहे. रु. 15000 कडे त्याची वाटचाल सुरू आहे.
या सप्ताहासाठी काही शेअर्स
1) Goodluck India Rs. 1191.20
2) Sarda Energy Rs. 598.35
3) Syrma SGS Rs. 753.25
4) Tata Consymer Rs 1065.40
5) Crompton Rs. 330.00