World Consumer  Day : ऑनलाईन खरेदी करताय? मग ही काळजी घ्या…
World Consumer Day : ऑनलाईन खरेदी करताय? मग ही काळजी घ्या… file photo
अर्थभान

World Consumer Day : ऑनलाईन खरेदी करताय? मग ही काळजी घ्या…

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : आज जागतिक ग्राहक दिन. (World Consumer Day ) दरवर्षी १५ मार्च रोजी जगभरात ग्राहक दिन साजरा केला जातो. प्रत्येकाला ग्राहक म्हणून आपले हक्क माहीत असायला हवेत, तसेच ऑनलाईन खरेदी करताना कोणती काळजी घ्‍यावी हे जाणून घेवूया

आपण खरेदी केलेली वस्तू गुणवत्तापुर्ण आणि दर्जेदार असायला हवी असं प्रत्येकाला वाटतं असते. देवाण-घेवाण ते ऑनलाईन वस्तुंची खरेदी या दरम्यान आपण खूपच प्रगती केली आहे. हल्ली आपल्याला चटणी-मिठापासून इलेक्ट्रॉनिक वस्तु ऑनलाईन खरेदीसाठी उपलब्‍ध आहेत. एका क्लिकवर, कोणत्याही ठिकाणी आणि कमी वेळेत या वस्तु मिळत असल्यामुळे बरेच लोक ऑनलाईन खरेदीला प्राधान्य देतात. प्रत्येक विक्रेत्याला 'ग्राहक एवं राजा' असतो असं म्हणतो; पण काहीवेळा या ऑनलाईन खरेदीच्या नादात खिशाला कात्री लागते. ग्राहकाचा आर्थिक तोटा होतो. ताणतणाव वाढतो. खरेदीपूर्वीच आपण काळजी घेतली तर या अडचणींना सामोरे जावे लागणार नाही.

विविध ब्रॅन्ड्‌सच्‍या सौंदर्यप्रसाधने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, घरगुती वापराच्या वस्तू ऑनलाईन खरेदी केल्‍या जातात. अलिकडे ऑनलाईन खरेदीचा ट्रेंडच आला आहे; पण काहीवेळा ऑनलाईन फ्रॉड पाहता या ग्राहकांना 'रुको भाई थोडा सब्र करो. असे म्हणावे वाटते.

ऑनलाईन खरेदी करताय संबंधित संकेतस्थळ हे विश्वासार्ह आहे का हे पहावे. शंकास्पद संकेतस्थळ असेल तर ऑनलाईन खरेदी टाळा.

ज्या पोर्टलवरून खरेदी करताना दुसऱ्या एखाद्या पोर्टलवर जो पासवर्ड दिला असेल तर तो शक्यतो टाळा. जो पासवर्ड देताय तो वैयक्तिक माहिती देणारा किंवा त्याची कल्पना देणारा नसावा.

डेटा चोरी आणि फसवणूक टाळायची असेल तर हे लक्षात ठेवा. ऑनलाईन खरेदीसाठी तुम्ही डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरत आहात, दर तीन महिन्यांनी तुमचा पिन नंबर बदलतं राहा. डिजिटल वॉलेटचाही पिन बदलत राहा. वेगवेगळे यूजर आयडी वापरा.

ऑनलाइन खरेदी शक्यतो विश्‍वासार्ह संकेतस्थळांवरून करावी. ऑनलाईन गुन्हेगार हे तुमच्या इनबॉक्समध्ये एक लिंक पाठवुन, प्रलोभने देवून तुम्‍हाला बाेगस लिंकवर नेवु शकतात. वेबसाईट शॉपिंग पोर्टलसारखी असते. त्यालाच संगणकीय भाषेत फिशिंग म्हणतात. त्यामुळे एखाद्या लिंकवर क्लिक करताना काळजी घ्यावी.

आपल्याला सोशल मीडियावर वारंवार बऱ्याच लिंक येत असतात. विविध आमिषने दाखवून तुम्हाला ती लिंक ओपन करायला भाग पाडतात. आपली वैयक्तिक माहीती भरायला सांगितले जाते. या लिंकवर क्लिक करताना काळजी घ्यावी. ऑनलाईन फ्रॉडला बळी पडू नका. सुरक्षित अशा वेबसाईटवर जावून खरेदी करावी.

एखादी वस्तु प्रत्यक्ष पाहणे आणि ती ऑनलाईन पाहणे यात फरक पडतो. तुम्ही जी वस्तु मागितली ती तशीच असेल असे नाही. काहीवेळा ती खराबही निघु शकते. त्यासाठी वस्तु हातात मिळ्याल्यावर ती उघडताना त्याचा व्हिडीओ शूट करावा. जर खराब वस्तू मिळाली तर तो व्हिडीओ आपण विक्रेत्याला दाखवू शकतो.

अनेक वेबसाइटवर आपल्याला तक्रार करण्याची सोय असते. आपण खरेदी केलेली वस्तू काहीवेळा खराब येवु शकते. जर तक्रार करायची असेल तर तुम्ही त्या वेबसाईटच्या तक्रार निवारण केंद्राला संपर्क करु शकता.

SCROLL FOR NEXT