स्त्रीशक्ती आता केवळ घरातील आर्थिक व्यवस्थापनापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ती गुंतवणुकीच्या क्षेत्रातही आघाडी घेत आहे. योग्य गुंतवणुकीच्या पर्यायांची निवड केल्यास महिलांना खात्रीशीर आर्थिक स्थैर्य आणि सुरक्षितता मिळू शकते.
1) सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन : महिलांसाठी एसआयपी हा सर्वोत्तम पर्याय आहे. कारण, तो शिस्तबद्ध आणि दीर्घकालीन संपत्ती निर्मिती करण्यास मदत करतो.
* कमी भांडवलात सुरुवात करता येते.
* महिन्याकाठी 500 पासूनही गुंतवणूक शक्य.
* दीर्घकाळात चक्रवाढ परतावा मिळतो.
* छोट्या गुंतवणुकीतून मोठ्या रकमेची उभारणी करून आर्थिक सुरक्षा मिळवता येते.
* लार्जकॅप, स्मॉलकॅप, मिडकॅप, हायब्रीड फंड यांसारखे पर्याय उपलब्ध.
जर तुम्हाला मुलीच्या शिक्षण आणि विवाहासाठी गुंतवणूक करायची असेल, तर केंद्र सरकारची सुकन्या समृद्धी योजना हा खात्रीशीर पर्याय आहे.
* सरकारी योजना असल्याने सुरक्षिततेची हमी
* वार्षिक 7.6% पर्यंत व्याजदर.
* आयकर कलम 80 सी अंतर्गत करसवलत.
महिलांसाठी कमी जोखमीचा, दीर्घकालीन आणि कर-मुक्त परतावा देणारा गुंतवणूक पर्याय म्हणजे पीपीएफ.
* 15 वर्षांचा लॉक-इन कालावधी.
* 7.1% व्याजदर आणि चक्रवाढ परतावा.
* कलम 80 सी अंतर्गत करसवलत.
* इथेही कमीत कमी रकमेतून मोठी रक्कम उभी करता येते.
सोने महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय असला, तरी तो दमदार परतावा देणारा गुंतवणूक पर्यायही आहे. आज जेव्हा सोन्याच्या किमती एक लाखासमीप पोहोचल्या आहेत, तेव्हा याचे मोल सर्वांनाच कळून चुकले आहे. सोन्याच्या दागिन्यांबरोबरच डिजिटल सोने, गोल्ड ईटीएफ हे अधिक फायदेशीर ठरत आहेत. गोल्ड ईटीएफ आणि डिजिटल गोल्डमध्ये स्टोरेजचा प्रश्न नसल्याने ती अधिक सुरक्षित ठरते.
गुंतवणुकीइतकेच हेल्थ आणि लाईफ इन्शुरन्सही तितकेच महत्त्वाचे आहेत.
* कमी वयात घेतल्यास प्रीमियम स्वस्त पडतो.
* गर्भधारणेच्या काळात वैद्यकीय खर्चाची सुरक्षा.
* एकल महिला असल्यास किंवा कुटुंबाची जबाबदारी असल्यास टर्म इन्शुरन्समुळे कुटुंबाला आर्थिक आधार मिळतो.
नोकरी करणार्या आणि गृहिणी महिलांसाठी ही योजना स्थिर परतावा देणारा पर्याय आहे.
* 7.4% व्याजदर आणि मासिक उत्पन्न.
* सरकारी योजना असल्याने 100 टक्के सुरक्षित.
7) रिअल इस्टेट गुंतवणूक
महिलांसाठी घर किंवा व्यावसायिक मालमत्तेत गुंतवणूक करणे आर्थिक स्थैर्य मिळवण्याचा उत्तम मार्ग आहे.
* बँकांकडून गृहकर्जावर महिलांना विशेष सवलत मिळत असल्याने कमी व्याजदरामध्ये घराचे स्वप्न पूर्ण होते.
* भाडेतत्त्वावर मालमत्ता दिल्यास नियमित उत्पन्न मिळू शकते.
जोखीम घेण्याची तयारी असेल आणि अभ्यासपूर्णता असेल, तर महिलांनी शेअर मार्केट आणि इक्विटी गुंतवणूक आवर्जून करायला हवी. फक्तऑप्शन ट्रेडिंग, फ्युचर ट्रेडिंग यांच्या मोहात न पडता दीर्घकालीन द़ृष्टिकोन ठेवून गुंतवणूक करावी. बाजारातील मोठ्या घसरणीच्या काळात अचूकपणाने गुंतवणूक केल्यास यातून दमदार परतावा मिळवणे सहज शक्य आहे. यासाठी तज्ज्ञांचा सल्लाही उपयोगी ठरतो. महिला दिनाचा मुहूर्त साधून उपरोक्त पर्यायांपैकी कोणत्याही पर्यायाची निवड करा; पण गुंतवणूक करा आणि श्रीमंत बनण्याचे स्वप्न पूर्ण करा.