Budget 2024
निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात मोठ्या घोषणा केल्या  Twitter
केंद्रीय अर्थसंकल्प

Budget 2024 | .. तर पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्यांना EPFO ​​खात्यात मिळणार १५ हजार

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तरुणांसाठी अनेक खास घोषणा केल्या आहेत. रोजगार सृजन फोकस्डची घोषणा करत त्या म्हणाल्या की, पहिल्यांदा नोकरीत प्रवेश करमाऱ्यांना सरकार अतिरिक्त पीएफचा लाभ देईल. यासाठी सरकार त्या लोकांच्या पीएफ खात्यात १५ हजार रुपये जमा करेल. (Budget 2024)

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तरुणांसाठी एका मोठी घोषणा केली आहे. आपल्या भाषणात त्या म्हणाल्या की, सर्व औपचारिक क्षेत्रांमध्ये वर्क फोर्समध्ये एंट्रीवर पहिल्यांदा काम करणाऱ्यांना एक महिन्याचे वेतन मिळणार. हे एका महिन्याच्या वेतनाचा प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण (DBT) 15,000 रुपयांपर्यंत तीन हप्त्यांमध्ये दिले जाईल. पहिली नोकरी करणाऱ्यांसाठी १ लाख रुपयांहून कमी पगार असलेल्यांना याचा फायदा होईल. याचा फायदा २.१ लाख तरुणांना मिळण्याची अपेक्षा आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन काय म्हणाल्या?

, "...सर्व औपचारिक क्षेत्रातील कामाच्या ठिकाणी नव्याने प्रवेश करणाऱ्या सर्व व्यक्तींना एक महिन्याचे वेतन दिले जाईल. EPFO ​​मध्ये नोंदणीकृत प्रथमच कर्मचाऱ्यांना ३ हप्त्यांमध्ये एका महिन्याच्या पगाराचा थेट लाभ हस्तांतरण रु. 15,000 पर्यंत असेल.

SCROLL FOR NEXT