BSE Sensex
केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर होत असताना शेअर बाजारात चढ-उतार दिसून आला. file photo
अर्थभान

Union Budget 2024 Impact on Stock Market | बजेटदरम्यान शेअर बाजारात चढ-उतार

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज मंगळवारी (दि.२३) केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर करत असताना शेअर बाजारात चढ-उतार दिसून आला. (Union Budget 2024 Impact on Stock Market) सकाळी ११.१५ वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स (Sensex) १५० अंकांनी वाढून ८०,६५० वर पोहोचला. तर निफ्टी (Nifty) २९ अंकांच्या वाढीसह २४,५३० च्या वर होता. त्यानंतर दोन्ही निर्देशांक लगेच सपाट पातळीवर आले.

हे शेअर्स तेजीत

सेन्सेक्सवर अदानी पोर्ट्स, आयटीसी, एलटी, अल्ट्राटेक सिमेंट, टीसीएस, कोटक बँक, आयसीआयसीआय बँक हे शेअर्स तेजीत आहेत. तर रिलायन्स, पॉवर ग्रिड, टेक महिंद्रा, एशियन पेट्स, बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी बँक या शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे.

निफ्टीवर अदानी पोर्ट्स, आयटीसी, एलटी, अल्ट्राटेक सिमेंट, ग्रासीम हे शेअर्स १ ते २ टक्क्यांनी वाढले आहेत. तर ओएनजीसी, श्रीराम फायनान्स, बीपीसीएल, LTIMindtree, डिव्हिस लॅब हे शेअर्स १ ते २ टक्क्यांनी घसरले आहेत.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पातून ४.१ कोटी युवकांच्या नोकऱ्या आणि कौशल्याबाबत ५ योजनांसाठी दोन लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. रोजगार, कौशल्य, एसएमई आणि मध्यमवर्गावर भर देणार असल्याचे सीतारामन यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT