surya midha breaks zuckerberg record : आर्टिफिशल इंटेलिजन्सनं ३० वर्षाखालील ३५ लोकांना अब्जाधीश बनवलं आहे. हा आकडा रेकॉर्ड ब्रेक आकडा आहे. फोर्ब्सच्या वर्ल्ड बिलेनियर लिस्टमध्ये सूर्या मिधा यांचा देखील समावेश आहे. अवघ्या २२ वर्षाचे सूर्या हे आर्टिफिशल इंटेलिजन्सद्वारे भरती करणारी स्टार्टअप कंपनी मेरकोर (Mercor) चे सह संस्थापक आहेत. खासगी गुंतवणूकदारांनी या कंपनीचे वॅल्युएशन १० अब्ज डॉलर केलं होतं.
सूर्या मिधा आणि त्यांचे सह संस्थापक जगातील अब्जाधीशांच्या यादीत सामील होणारे आतापर्यंतचे सर्वात कमी वयाचे सेल्फ मेड अब्जाधीश आहेत. त्यांनी या बाबतीत मार्क झुकरबर्ग यांना देखील मागं टाकलं आहे. मेटाचे मालक झुकरबर्ग यांनी दशकभरापूर्वी २३ व्या वर्षी या यादीत प्रवेश केला होता.
२२ वर्षाच्या मिधा यांची एकूण संपत्ती ही २.२ बिलियन डॉलर इतकी आहे. ते मेरकोर या कंपनीतील आपल्या इतर दोन सह - संस्थापक ब्रँडन फूडी आणि आदर्श हिरेमठ यांच्यापेक्षा काही महिन्यांनीच लहान आहेत.
फोर्ब्सनुसार सूर्याचे आई वडील हे भारतीय अप्रवासी आहेत. सूर्या यांचा जन्म कॅलिफोर्नियातील सॅन जोस इथं झाला. ते हाय स्कूलमध्ये नॅशनल डिबेट चॅम्पियन देखील राहिले आहेत.
मिधाचे आई-वडील हे दिल्लीतून अमेरिकेत जात स्थायिक झाले होते. सूर्याने जॉर्जटाऊन विद्यापीठातून फॉरेन स्टडीजमधून ग्रॅज्युएशन केलं आहे. त्याचवेी हिरेमठ हे हार्वर्ड विद्यापीठात शिक्षण घेत होते. तर ब्रेंडन फूडे हे देखील जॉर्जटाऊनमधील इकॉनॉमिक्सचे शिक्षण घेत होते.
मेरकॉर हा एक रिक्रुटमेंट स्टार्टअप आहे. सिलिकॉन वॅलीमधील सर्वात मोठ्या एआय लॅबला त्यांच्या मॉडेलला प्रशिक्षण देण्यासाठी मदत करत आहे. फोर्ब्जच्या एका रिपोर्टनुसार हा एक असा प्लॅटफॉर्म आहे जिथं अर्जदाराची मुलाखत ही एका एआय बॉट द्वारे घेतली जाते. त्या टॅलेंटला कपंनीमध्ये अपॉईंट केलं जातं. ही कंपनी योग्य ठिकाणी योग्य संधी शोधणाऱ्यांसाठी एक आशादायी कंपनी म्हणून पुढं येत आहे.
फोर्ब्सच्या नव्या यादीत सर्वत कमी वयाच्या सेल्फ मेड महिला अब्जाधीशांचा देखील समावेश आहे. यात २९ वर्षाच्या लुआना लोपेज या आघाडीवर आहेत. त्या यापूर्वी बेले डान्सर देखील राहिल्या आहेत. त्यांनी एमआयटीमधून ग्रॅज्युएशन केलं आहे. त्या प्रेडिक्शन मार्केट फर्म Kalshi च्या सह संस्थापिका आहेत. मुळच्या ब्राझीलच्या असलेल्या लोपेज यांनी ३१ वर्षाच्या लुसी गुओ यांना मागं टाकलं. त्या स्केल एआयच्या सह संस्थापिका आहेत.