Stock Markets  
अर्थभान

Stock Markets | बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण, सेन्सेक्स ८८० अंकांनी घसरला

कोणत्या शेअर्सवर दबाव? जाणून घ्या बाजारात आज काय घडलं?

दीपक दि. भांदिगरे

Stock Markets

मुंबई : जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत असताना, भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या भू-राजकीय तणावाचा ( India Pakistan Conflict) परिणाम गुंतवणूकदारांच्या भावनेवर झाला. परिणामी, शुक्रवारी भारतीय बेंचमार्क निर्देशांक प्रत्येकी १ टक्के घसरले. विशेष म्हणजे सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात आज विक्रीचा दबाव राहिला. बीएसई सेन्सेक्स ८८० अंकांनी (-१.१ टक्के) घसरून ७९,४५४ वर बंद झाला. तर निफ्टी ५० निर्देशांक (-१.१ टक्के) २६५ अंकांच्या घसरणीसह २४,००८ वर बंद झाला.

गुंतवणूकदारांनी १.८९ लाख कोटी गमावले

बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल ९ मे रोजी १.८९ लाख कोटी रुपयांनी कमी होऊन ते ४१६.६१ लाख कोटी रुपयांवर आले. ८ मे रोजी बाजार भांडवल ४१८.५० लाख कोटी रुपये होते. त्यात आज घट झाली.

भयसूचकांक इंडिया VIX वाढला

बाजारातील भयसूचकांक इंडिया VIX निर्देशांक आज सुमारे ३ टक्के वाढला. जो गुंतवणूकदारांमधील वाढत्या सावधगिरीचे संकेत देतो. आजच्या सत्रात रियल्टी, बँकिंग, फायनान्सियल शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण दिसून आली. रियल्टी निर्देशांक २.३ टक्के आणि प्रायव्हेट बँक निर्देशांक १.३ टक्के खाली आला. तर कॅपिटल गुड्स शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. बीएसई मिडकॅप सपाट पातळीवर बंद झाला. तर स्मॉलकॅप ०.३ टक्के घसरला.

'हे' हेवीवेट शेअर्स घसरले

सेन्सेक्सवर आयसीआयसीआय बँकेचा शेअर्स ३ टक्के घसरून टॉप लूजर ठरला. त्याचबरोबर पॉवर ग्रिड, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फायनान्स, एचडीएफसी बँक, रिलायन्स हे हेवीवेट शेअर्स २ ते ३ टक्क्यांपर्यंत घसरले. बजाज फिनसर्व्ह, अदानी पोर्ट्स, एम अँड एम, एनटीपीसी, आयटीसी, ॲक्सिस बँक, सन फार्मा, भारती एअरटेल, इटर्नल हे शेअर्सही प्रत्येकी १ टक्के घसरले. तर दुसरीकडे टायटन, टाटा मोटर्स, एलटी, एसबीआय हे शेअर्स टॉप गेनर्स राहिले.

भारत-पाकिस्तान संघर्ष वाढला

गुरुवारी रात्री पाकिस्तानने केलेले अनेक ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले भारताने हाणून पाडले. यादरम्यान, जम्मूमध्ये अनेक स्फोट झाल्याची माहिती पुढे आली. या तणावाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांची भावना कमकुवत झाली. परिणामी आज बाजारात घसरणीचा ट्रेंड दिसून आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT