शेअर बाजारात सोमवारी (दि. १२) अदानी शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण दिसून येत आहे.  (File photo)
अर्थभान

हिंडेनबर्ग इफेक्ट; Adani Stocks मध्ये मोठी घसरण, ५३ हजार कोटींचा फटका

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

जागतिक कमकुवत संकेतांमुळे भारतीय शेअर बाजारात (Stock Market Updates) सोमवारी (दि. १२) आठवड्याच्या पहिला दिवशी घसरण झाली. सेन्सेक्स आज ४०० अंकांच्या घसरणीसह खुला झाला. पण त्यानंतर काही वेळातच ही घसरण काही प्रमाणात कमी झाली. सकाळी १० च्या सुमारास सेन्सेक्स ४०० अंकांच्या घसरणीसह ७९,३५० च्या खाली आला होता. तर निफ्टी १४३ अंकांनी घसरून २४,२२३ वर होता. आज अदानी समुहाच्या शेअर्समध्ये (Adani Stocks) अधिक घसरण झाली आहे. अदानी ग्रीन एनर्जीच्या शेअर्सला (Adani Green Energy shares) आज सुरुवातीला सर्वाधिक फटका बसला. बीएसईवर हा शेअर्स ७ टक्क्यांनी घसरला. पण नंतर काही प्रमाणात त्यात रिकव्हरी दिसून आली.

Nifty Today : अदानी एंटरप्रायजेसचा शेअर्स ३ टक्क्यांनी घसरला

निफ्टीवर अदानी एंटरप्रायजेसचा शेअर्स ३ टक्क्यांनी घसरून ३,०८९ रुपयांवर व्यवहार करत आहे. अदानी पोर्टसचा शेअर्स २ टक्क्यांनी घसरला आहे. तसेच एनटीपीसी, पॉ‍वर ग्रिड, बजाज ऑटो हे शेअर्स १ टक्क्यानी घसरले आहेत. तर ग्रासीम, जेएसडब्ल्यू स्टील, सिप्ला, एशियन पेंट्स हे शेअर्स हिरव्या रंगात व्यवहार करत आहेत.

Sensex Today : अदानी पोर्ट्स शेअर्समध्ये घसरण

सेन्सेक्सवर अदानी पोर्ट्स, एनटीपीसी, पॉवर ग्रिड, आयसीआयसीआय बँक, एसबीआय, एचसीएल टेक हे शेअर्स घसरले आहेत. तर एशियन पेंट्स, जेएसडब्ल्यू स्टील, टेक महिंद्रा हे शेअर्स तेजीत खुले झाले आहेत.

बाजारात पुन्हा हिंडेनबर्ग इफेक्ट

अदानी यांच्या साम्राज्यात विदेशातून करण्यात आलेल्या गुंतवणुकीत सेबीच्या अध्यक्षा माधुरी पुरी बूच यांचाही सहभाग असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट हिंडेनबर्ग रिसर्चने केला आहे. हिंडेनबर्गने (Hindenburg Research) आपल्या नव्या अहवालात अदानी समूहावर सेबीकडून कारवाई का झाली नाही याचा खुलासा केला आहे. याचे पडसाद आज बाजारात दिसून येत आहेत. विशेषतः अदानी समुहाचे शेअर्स घसरले आहेत.

Adani Stocks : अदानींचे शेअर्स ७ टक्क्यांपर्यंत घसरले, ५३ हजार कोटींचा फटका

द इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, हिंडेनबर्ग विरुद्ध अदानी वादात सेबीच्या अध्यक्षा माधुरी पुरी बूच यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर अनेक गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे. यामुळे आज सोमवारी सकाळी अदानी समूहाच्या कंपन्यांचे शेअर्स ७ टक्क्यांपर्यंत घसरले. परिणामी, १० अदानींच्या शेअर्सची एकत्रित बाजार भांडवल १६.७ लाख कोटी रुपयांपर्यंत घसरून गुंतवणूकदारांचे सुमारे ५३ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले.

बाजारातील घसरणीबद्दल तज्ज्ञ काय म्हणतात?

सेन्सेक्स घसरल्याबद्दल शेअर बाजार तज्ज्ञ सुनील शाह यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले की, "एका आंतरराष्ट्रीय रिसर्च कंपनीने काही नकारात्मक अहवाल दिले होते. पण सध्या बाजाराकडे पाहता, सेन्सेक्स जवळपास २०० अंकांनी खाली आला आहे. असे दिसते की बाजाराने सूट दिली आहे आणि संबंधित अहवाल फेटाळून लावला आहे..."

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT