Stock Market Today Pudhari
अर्थभान

Stock Market Today: शेअर बाजाराची दमदार सुरुवात; सेन्सेक्स 82 हजारांच्या वर, निफ्टी 25,200च्या पुढे, कोणते शेअर्स वाढले?

Stock Market Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी. सेन्सेक्स 566 अंकांनी वाढून 82,159 वर, तर निफ्टी 140 अंकांनी वाढून 25,284 वर उघडला.

Rahul Shelke

Stock Market Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. सोमवारी (16 नोव्हेंबर) सेन्सेक्स आणि निफ्टीने मोठ्या वाढीसह व्यवहाराची सुरुवात केली. सेन्सेक्स 82 हजारांचा टप्पा पार करून सुरु झाला, तर निफ्टीने 25,200 ची पातळी ओलांडली. जागतिक बाजारातील संमिश्र संकेत असतानाही भारतीय बाजारात खरेदीचा जोर दिसून आला.

शेअर बाजाराची दमदार सुरुवात

  • सेन्सेक्स 566.77 अंकांनी म्हणजेच 0.69 टक्क्यांनी वाढून 82,159.22 वर खुला झाला.

  • निफ्टी 50 मध्ये 140.30 अंकांची म्हणजेच 0.56 टक्क्यांची वाढ झाली. निफ्टी 25,284.60 वर पोहोचला.

  • बाजार सुरू होताना 1,438 शेअर्समध्ये तेजी होती, तर 1,069 शेअर्स घसरले. 267 शेअर्सच्या किमतीत कोणताही बदल झाला नाही.

  • निफ्टीमध्ये आयशर मोटर्स, श्रीराम फायनान्स, टीसीएस, हिंडाल्को आणि कोटक महिंद्रा बँक या शेअर्समध्ये चांगली वाढ झाली.

  • दुसरीकडे, अदानी एंटरप्रायझेस, टाटा स्टील, टाटा कन्झ्युमर आणि बजाज फायनान्सच्या शेअर्समध्ये घसरण झाली.

शेअर बाजारावर परिणाम करणारे महत्त्वाचे घटक

  • गोल्डमन सॅक्सने डिसेंबरपर्यंत निफ्टी 29,000 च्या पातळीवर पोहोचण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

  • अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव कायम असल्याने जागतिक बाजारावर दबाव आहे.

  • कच्च्या तेलाचे दर 96 डॉलरच्या खाली आले आहेत.

  • डॉलर निर्देशांक 103.30 वर पोहोचला असून, तो गेल्या 20 महिन्यांतील उच्चांकावर आहे.

  • अमेरिकेतील 10 वर्षांच्या सरकारी रोख्यांवरील व्याजदर 5.15 टक्क्यांवर पोहोचला आहे.

  • आशियाई बाजारात दक्षिण कोरिया आणि जपानच्या बाजारात घसरण झाली. गिफ्ट निफ्टी मात्र तेजीत होता.

  • अमेरिकेत डाऊ जोन्स 50 अंकांनी वाढून बंद झाला, तर नॅस्डॅक 230 अंकांनी घसरला. Nvidia चा शेअरही शुक्रवारी 2 टक्क्यांनी घसरला.

  • परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FIIs) 3,149 कोटी रुपयांची खरेदी केली. मात्र, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DIIs) विक्री केली.

निफ्टी 29,000 चा टप्पा गाठणार?

भारतीय शेअर बाजाराबाबत परदेशी ब्रोकरेज कंपन्यांचा विश्वास वाढताना दिसत आहे. गेल्या 10 दिवसांत सहा मोठ्या परदेशी वित्तीय संस्थांनी भारतीय बाजाराबाबत सकारात्मक अंदाज व्यक्त केला आहे.

  • गोल्डमन सॅक्सने डिसेंबरपर्यंत निफ्टी 29,000 वर जाण्याचा अंदाज दिला आहे.

  • मॉर्गन स्टॅनलीचे व्यवस्थापकीय संचालक रिधम देसाई यांनी 20 ते 30 टक्के वाढीची शक्यता व्यक्त केली आहे.

  • HSBC ने भारताला गुंतवणुकीसाठी प्राधान्य दिले असून चीनबाबत सावध भूमिका घेतली आहे.

  • जेफरीजने आपल्या गुंतवणूक पोर्टफोलिओमधील भारताचा वाटा 2 टक्क्यांवरून 14 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे.

  • बर्नस्टीनने निफ्टीसाठी 26,100 चे टार्गेट दिले आहे. CLSA चे तज्ज्ञ लॉरेन्स बॅलेंको यांनीही भारतीय बाजाराबाबत सकारात्मक भूमिका मांडली आहे.

परदेशी गुंतवणूकदारांचा वाढता विश्वास आणि सकारात्मक अंदाज यामुळे भारतीय बाजाराला आधार मिळत आहे. मात्र, जागतिक घडामोडी, कच्च्या तेलाचे दर आणि डॉलरमधील चढ-उतार यांचा बाजारावर परिणाम होऊ शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT