पुढारी ऑनलाईन डेस्क : देशांतर्गत शेअर बाजारात आजही गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सवर दबाव दिसला. रिअल्टी, ऑटो आणि एनर्जी शेअर्समध्ये विक्री झाली. पीएसई, एफएमसीजी समभागांमध्ये घसरण झाली. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स १०.३१ अंकांचया वाढीसह ७४,६१२.४३ वर बंद झाला. तर निफ्टी २.५० अंकांनी घसरून २२,५४५.०५ वर बंद झाला. ( Stock Market Closing Bell)
आज शेअर बाजाराची सुरुवात वाढीने झाली. सेन्सेक्स १२२.५६ अंकांनी किंवा ०.१६ टक्के वाढीसह ७४,७१९.५० वर निफ्टी ३२.५० अंकांनी किंवा ०.१४ टक्के वाढीसह २२,५८०.०५ वर व्यवहार करताना दिसला. मिडकॅप निर्देशांकात थोडीशी वाढ झाली. परंतु सर्वात मोठी वाढ एनबीएफसी स्टॉक्समध्ये दिसून आली. यानंतर मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सवर दबाव दिसला.
रिअल्टी, ऑटो आणि एनर्जी शेअर्समध्ये विक्री झाली. पीएसई, एफएमसीजी समभागांमध्ये घसरण झाली. मेटल, निफ्टी बँक निर्देशांक किंचित वाढीसह बंद झाले. केबल आणि वायर क्षेत्रात मोठी विक्री दिसून आली. निफ्टीमध्ये श्रीराम फायनान्स, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, सन फार्मा, हिंडाल्को इंडस्ट्रीज हे सर्वाधिक वाढणारे शेअर होते. तर अल्ट्राटेक सिमेंट, ट्रेंट, टाटा मोटर्स, बजाज ऑटो आणि हिरो मोटोकॉर्प हे निफ्टीचे सर्वाधिक नुकसान करणारे शेअर्स ठरले.
आज मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये विक्री दिसून आली. दुपारच्या सत्रात मिडकॅप निर्देशांकाने दिवसाच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. मिडकॅप निर्देशांक सुमारे ५५० अंकांनी घसरला. तर स्मॉलकॅप निर्देशांक १.५% पेक्षा जास्त घसरला. बँका आणि धातू वगळता सर्व क्षेत्रीय निर्देशांक लाल रंगात बंद झाले. वाहन, धातू, ऊर्जा, तेल आणि वायू, भांडवली वस्तू, रिअल्टी, वीज निर्देशांकात १-३ टक्क्यांची घसरण दिसून आली. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक १ टक्क्यांनी आणि स्मॉलकॅप निर्देशांक २ टक्क्यांनी घसरून बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स १०.३१ अंकांनी किंवा ०.०१ टक्क्यांनी वाढीसह ७४,६१२.४३ वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी २.५० अंकांनी किंवा ०.०१ टक्क्यांनी घसरून २२,५४५.०५ वर बंद झाला. ( Stock Market Closing Bell)
अमेरिकेच्या टॅरिफच्या भीतीमुळे आणि रिझर्व्ह बँकेच्या हस्तक्षेपामुळे आशियाई चलनांमध्ये कमकुवतपणा आणि केंद्रीय बँकेच्या आक्रमक हस्तक्षेपामुळे अडकलेल्या रुपयाच्या मूल्यात गुरुवारी फारसा बदल झाला नाही. मागील सत्रात रुपया ८७.२१ च्या तुलनेत ८७.२० वर बंद झाला.