Stock Market Today Pudhari
अर्थभान

Stock Market Today: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात; निफ्टी 14 अंकांनी घसरला, आज बाजारात नेमकं काय घडणार?

Stock Market Today: आज शेअर बाजाराची सुरुवात संमिश्र झाली. निफ्टी 14 अंकांनी घसरून 25,277 वर, तर सेन्सेक्स 45 अंकांच्या वाढीसह 82,150 वर उघडला.

Rahul Shelke

Stock Market Today: भारतीय शेअर बाजारात आज, मंगळवारी (17 नोव्हेंबर) विकली एक्सपायरीच्या दिवशी सावध सुरुवात झाली. निफ्टी घसरणीसह उघडला, तर सेन्सेक्समध्ये मात्र किरकोळ वाढ झाली. जागतिक बाजारातील घसरणीचा दबाव असतानाही कच्च्या तेलाच्या किमतीतील घट आणि परदेशी गुंतवणूकदारांची खरेदी यामुळे भारतीय बाजाराला आधार मिळत आहे.

बाजारातील सुरुवातीची स्थिती

  • मंगळवारी सकाळी निफ्टी 14 अंकांनी घसरून 25,277 वर उघडला.

  • सेन्सेक्स 45 अंकांच्या वाढीसह 82,150 वर उघडला.

  • सुरुवातीच्या व्यवहारात बाजारात किरकोळ सुधारणा दिसून आली.

  • निफ्टी पुन्हा 25,300 च्या वर टिकून राहण्याचा प्रयत्न करत आहे.

  • सोमवारी निफ्टी 147 अंकांच्या वाढीसह 25,291 वर बंद झाला होता.

  • आज निफ्टीची विकली एक्सपायरी असल्याने बाजारात चढ-उतार होण्याची शक्यता आहे.

कच्च्या तेलात घसरण

भारतीय शेअर बाजारासाठी सध्या दोन महत्त्वाच्या सकारात्मक गोष्टी आहेत. पहिली म्हणजे कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घट. कच्च्या तेलाचा दर 92 डॉलर प्रति बॅरलच्या खाली आला आहे. दुसरी म्हणजे परदेशी गुंतवणूकदारांकडून भारतीय शेअर बाजारात सुरू असलेली खरेदी. या दोन्ही गोष्टींमुळे भारतीय बाजाराची एकूण स्थिती सकारात्मक असल्याचे दिसत आहे.

अमेरिकी आणि आशियाई बाजारात मोठी घसरण

अमेरिकी शेअर बाजारात सोमवारी मोठी घसरण झाली. विशेषतः तंत्रज्ञान आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी संबंधित कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार विक्री झाली.

  • नॅस्डॅक 625 अंकांनी घसरला.

  • डाऊ जोन्समध्ये 740 अंकांची घसरण झाली.

  • जपानच्या निक्केई निर्देशांकात जवळपास दीड टक्क्यांची घसरण झाली.

  • दक्षिण कोरियाच्या कोस्पी निर्देशांकातही जवळपास दीड टक्क्यांची घसरण झाली.

अमेरिकी बाजारातील घसरणीचा परिणाम आशियाई बाजारांवरही झाला आहे.

परदेशी गुंतवणूकदारांची जोरदार खरेदी

परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार म्हणजेच FIIs ने भारतीय बाजारात खरेदी सुरू ठेवली आहे.

  • सोमवारी FIIs ने रोख बाजारात 5,736 कोटी रुपयांची खरेदी केली.

  • देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार म्हणजेच DIIs यांनी 2,253 कोटी रुपयांची विक्री केली.

  • DIIs कडून सलग 12 व्या दिवशी विक्री करण्यात आली.

आज बाजारासाठी सकारात्मक आणि नकारात्मक संकेत

बाजाराला आधार देणाऱ्या गोष्टी:

  • FIIs कडून सलग खरेदी सुरू आहे.

  • कच्च्या तेलाचे दर 92 डॉलरच्या खाली आहेत.

  • बँक निफ्टीमध्ये चांगली तेजी आणि पुढील वाढीची शक्यता आहे.

  • रुपया दोन दिवसांच्या घसरणीनंतर 32 पैशांनी मजबूत झाला.

  • बाजारातील वाढीनंतरही PCR पातळी समाधानकारक आहे.

  • VIX मधील मोठ्या वाढीला ब्रेक लागला आहे.

बाजारावर दबाव आणणाऱ्या गोष्टी:

  • अमेरिकी बाजारात मोठी घसरण झाली.

  • डॉलर निर्देशांक 19 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला.

  • सोने, चांदी आणि इतर धातूंच्या किमतीत मोठी घसरण झाली.

  • DIIs कडून सलग 12 दिवस विक्री सुरू आहे.

  • सोमवारी स्मॉलकॅप शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात विक्री झाली.

निफ्टीसाठी 25,400 ची पातळी महत्त्वाची

HDFC सिक्युरिटीजचे तांत्रिक संशोधन विश्लेषक नागराज शेट्टी यांच्या मते, सध्या निफ्टीमध्ये मर्यादित पातळीत चढ-उतार सुरू आहेत. त्यांच्या मते, बाजाराची एकूण स्थिती सकारात्मक आहे. त्यामुळे बाजारात घसरण झाल्यास ती खरेदीची संधी ठरू शकते.

  • 25,300 ते 25,400: निफ्टीसाठी महत्त्वाचा अडथळा.

  • 25,400 च्या वर: निफ्टीला पुढील तेजी मिळण्याची शक्यता.

  • 26,000: तेजी कायम राहिल्यास निफ्टीचे पुढील संभाव्य टार्गेट.

  • 25,000: बाजारात घसरण झाल्यास महत्त्वाची आधार पातळी.

त्यामुळे आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांचे लक्ष निफ्टीच्या 25,300 ते 25,400 या पातळ्यांवर असेल. यावर पुढील तेजी किंवा घसरण अवलंबून असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT