Stock Market Today: देशातील शेअर बाजारात बुधवारी जोरदार तेजी पाहायला मिळाली आहे. निफ्टी 139 अंकांनी वाढून 25,834 वर उघडला, तर सेन्सेक्स 367 अंकांच्या वाढीसह 84,238 च्या पातळीवर सुरू झाला. सुरुवातीच्या व्यापारात निफ्टीने 25,800 ची पातळी कायम ठेवली आहे. एफएमसीजी आणि मेटल इंडेक्स वगळता सर्व सेक्टोरल इंडेक्स हिरव्या रंगात व्यवहार करत आहेत.
आज गुंतवणूकदारांचे लक्ष अनेक महत्वाच्या घडामोडींवर आहे —
ऑक्टोबर महिन्याचा ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) म्हणजेच किरकोळ महागाईचा आकडा आज जाहीर होणार आहे.
लाल किल्ला स्फोटानंतर देशाच्या सुरक्षेशी संबंधित कॅबिनेटची महत्वाची बैठक आज होणार आहे.
तसेच Asian Paints, Tata Steel, Ashok Leyland, IRCTC आणि HAL या दिग्गज कंपन्यांचे तिमाही निकाल (Q2 Results) आज जाहीर होतील.
सेन्सेक्सवरील प्रमुख 30 स्टॉक्समध्ये टेक महिंद्रा, TCS, इन्फोसिस आणि भारती एअरटेल हे टॉप गेनर्स ठरले आहेत, तर HUL, भारत इलेक्ट्रॉनिक्स आणि मारुती सुजुकीचे शेअर्स घसरले आहेत.
विकली एक्सपायरीच्या दिवशी निफ्टी 120 अंकांच्या वाढीसह 25,694 वर बंद झाला होता. SGX Nifty मध्येही 150 अंकांपेक्षा जास्त वाढ दिसून आली, ज्यामुळे आज भारतीय बाजारातही गॅप-अप ओपनिंगची शक्यता होती आणि तसंच घडलं.
टेक्निकल चार्टनुसार, निफ्टीने 20-day DEMA (25,600) च्या वर क्लोजिंग दिली आहे, ज्यामुळे बाजारातील ट्रेंड सकारात्मक असल्याचे दिसते. 25,800 च्या वर नवीन तेजीचा टप्पा सुरू होऊ शकतो, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. निफ्टीसाठी इमीडिएट सपोर्ट 25,500 च्या आसपास, तर पुढील टार्गेट 26,000 ते 26,100 असू शकते.
बिहार एग्झिट पोल्समध्ये NDAच्या विजयाची शक्यता – राजकीय स्थैर्याचा मेसेज.
अमेरिकन बाजार लाइफ-हायवर बंद झाले, कारण शटडाउन संकट कमी होण्याची आशा.
FIIs (परदेशी गुंतवणूकदारांची) विक्री कमी झाली, तर DIIs (देशांतर्गत गुंतवणूकदारांची) खरेदी वाढली.
Q2 निकाल एकूणात सकारात्मक आले आहेत.
डॉलर इंडेक्स 99.50 च्या खाली घसरला, ज्यामुळे कमॉडिटी मार्केटमध्ये तेजी.
नॅचरल गॅसचे दर 5 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचले आहेत.