Stock Market Opening Updates
भारतीय शेअर बाजार बुधवारच्या सत्रातील पडझडीनंतर गुरुवारी (दि.२१) सावरला. सेन्सेक्स-निफ्टीने तेजीत सुरुवात केली. सुरुवातीच्या सकाळच्या व्यवहारात सेन्सेक्स ४५० अंकांनी वाढून ८१,६४० वर गेला. तर निफ्टी ५० निर्देशांक १०० हून अधिक अंकांच्या वाढीसह २४,८०० वर व्यवहार करत आहे. आयटी, बॅकिंग आणि आयटी शेअर्समध्ये वाढ दिसून येत आहे.
सेन्सेक्सवर सन फार्माचा शेअर्स २ टक्केहून अधिक वाढून खुला झाला आहे. एम अँड एम, मारुती, हिंदुस्तान युनिलिव्हर, एचडीएफसी बँक, अल्ट्राटेक सिमेंट, नेस्ले इंडिया, टाटा स्टील हे शेअर्सही तेजीत व्यवहार करत आहेत. तर दुसरीकडे इर्टनलचा शेअर्स १.५ टक्के घसरला. इंडसइंड बँक, कोटक बँक आणि अदानी पोर्ट्स हे शेअर्स लाल रंगात खुले झाले आहेत.
सेक्टरल फ्रंटवर निफ्टी ऑटो, बँक, एफएमसीजी, फार्मा आणि रियल्टी निर्देशांक १ टक्के वाढले आहेत. निफ्टी फार्मा १.७ टक्के १.७ टक्के वाढला आहे.
दरम्यान, मंगळवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) सलग दुसऱ्या सत्रात विक्री कायम ठेवली. एनएसईवरील आकडेवारीनुसार, परदेशी गुंतवणूकदारांनी १०,०१६ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली. ही गेल्या दोन महिन्यांतील एका दिवसातील सर्वात मोठी विक्री आहे. दरम्यान, दुसरीकडे देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या (DII) खरेदीमुळे बाजाराला मोठा आधार मिळाला. त्यांनी एका दिवसात ६,७३८ कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली.