आज सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक सपाट पातळीवर सुरु झाले. (Pudhari Photo)
अर्थभान

Opening Bell : सेन्‍सेक्‍स १११ अंकांनी वधारला, फार्मा आणि रिअल्टीमध्ये विक्रीचा दबाव

ऑटो शेअर्स टॉप गियरमध्ये, मिडकॅपसह स्‍मॉलकॅप संथ

पुढारी वृत्तसेवा

Opening Bell

शेअर बाजाराची आज (दि. ६ मे) सपाट सुरुवात झाली आहे. सेन्सेक्स १११ अंकांनी वाढून ८०,९०७ वर उघडला. निफ्टी ३९ अंकांनी मजबूत होऊन २४,५०० वर उघडला. रुपया ८४.२५ च्या तुलनेत ८४.२८/$ वर उघडला. मात्र सुरुवातीच्या व्यवहारात फार्मा आणि रिअल्टी क्षेत्रातील समभागांमध्ये विक्री दिसून आला. दुसरीकडे, निफ्टी ऑटो आणि मेटल इंडेक्स शेअर्समध्ये वाढ दिसून आली.

ऑटो शेअर्स सुसाट

सुरुवातीच्‍या व्‍यवहारातील विक्रीमुळे बाजारात दबाव दिसून येत आहे. निफ्टी सुमारे ५० अंकांनी घसरून २४४०० च्या जवळ पोहोचला. बँक निफ्टी सलग पाचव्या दिवशी सुमारे २५० अंकांनी घसरणीसह दबावाखाली आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही कमकुवतपणा दिसून येत आहे. ऑटो शेअर्स टॉप गियरमध्ये दिसत आहेत. निर्देशांक सुमारे १.५ टक्क्यांनी मजबूत झाला.

फार्मा क्षेत्रात विक्रीचे वर्चस्व

ट्रम्प यांनी परदेशी औषध कंपन्यांवर कडक कारवाईची घोषणा केल्यामुळे औषधांमध्ये विक्री दिसून येत आहे. निर्देशांक सुमारे दीड टक्क्यांनी कमकुवत झाला आहे. निफ्टीवरील टॉप-५ तोट्यात सिप्ला आणि डॉ. रेड्डीज होते. व्होइडामध्ये अरबिंदो फार्मा आणि ल्युपिन यांचे शेअर्सही सर्वात जास्त घसरले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT