अर्थभान

opening bell : ‘स्‍थिर’ सरकारच्‍या संकेतामुळे बाजारात तेजी, सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भाजप प्रणित एनडीएन सरकारच्‍या स्‍थापनेचे संकेत मिळाल्‍याने आज ( दि. ६ जून) भारतीय शेअर बाजाराची सुरुवात तेजीने झाली. सेन्सेक्स ४०० अंकांच्या वाढीसह उघडला. तर निफ्टीने १०० हून अधिक अंकांची वाढ नोंदवली. सुरुवातीच्या व्यवहारात सुमारे १५०० शेअर्समध्ये वाढ झाल्‍याचे दिसले.

बुधवारी ७४,३८२ अकांवर बंद झाल्यानंतर सेन्सेक्स आज ७५,०००च्या वर उघडला. निफ्टी २२,७९८ च्या पातळीवर उघडला. उघडल्यानंतर, निर्देशांक २२,७०० च्या श्रेणीत व्यवहार करत होता. मिडकॅप निर्देशांकात ८००अंकांची वाढ झाली. BHEL चे शेअर्स 8% ची वाढ नोंदवत आहेत. याशिवाय ओएनजीसी, अदानी पोर्ट्स, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, बीपीसीएलमध्ये नफा नोंदवला जात आहे. एचयूएल, ब्रिटानियाचे शेअर्सने घसरण अनुभवली.

SCROLL FOR NEXT