अर्थभान

Stock Market : ‘निफ्टी’ नव्या विक्रमी पातळीवर, प्रथमच गाठला २३,४१७ चा टप्‍पा

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क: देशांतर्गत शेअर बाजार आज किंचित वाढीसह खुले झाले. १०० हून अधिक अंकांच्या वाढीसह सेन्सेक्स ७६,६०० च्या वर उघडला तर निफ्टीही २३,४१७ चा नवा टप्‍पा गाठला.

बाजारात आज स्थिर सुरुवात दिसून आली. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक वाढीसह उघडताना दिसत आहेत. 12 जून रोजी मिश्र जागतिक संकेतांमुळे निफ्टी 23300 च्या वर उघडला. सेन्सेक्स 147.65 अंकांनी किंवा 0.19 टक्क्यांनी वाढून 76,604.24 वर व्यवहार करत होता. निफ्टी 48.70 अंकांनी किंवा 0.21 टक्क्यांनी वाढून 23,313.50 वर व्यवहार करत होता.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांनी नवीन विक्रमी उच्चांक गाठला. निफ्टी मिडकॅपने प्रथमच 54,000 चा टप्पा पार केला आहे. बीपीसीएल, एचपीसीएल, एचसीएल टेक, एलटीआयएम, इन्फोसिस, टेक महिंद्रा यासह अनेक तेल आणि आयटी समभागांमध्ये वाढ झाली आहे.

2001 शेअर्समध्ये वाढ झाली होती. तर 496 समभाग घसरले. 105 शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही. निफ्टीमध्ये एचसीएल टेक्नॉलॉजीज, टेक महिंद्रा, बीपीसीएल, विप्रो आणि एलटीआयमिंडट्री हे प्रमुख वधारले. तर एशियन पेंट्स, टायटन कंपनी, ग्रासिम, एनटीपीसी आणि एचयूएल हे समभाग घसरले.

शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, सोमवारी विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (एफआयआय) 111 कोटी रुपयांचे समभाग विकले तर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी 3193 कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले आहेत. गेल्या आठवड्यात कच्च्या तेलाचा साठा अपेक्षेपेक्षा जास्त घसरल्यानंतर ब्रेंट क्रूड फ्युचर्स 37 सेंट्स किंवा 0.45% वाढून प्रति बॅरल 82.29 वर पोहोचला आहे.

SCROLL FOR NEXT