प्रातिनिधिक छायाचित्र Pudhari Photo
अर्थभान

Stock Market | बाजारात संभ्रम कायम, मिडकॅप- स्मॉल कॅप स्टॉक्सची दाणादाण

मिडकॅप आणि स्मॉल कॅप स्टॉक्सची दाणादाण

पुढारी वृत्तसेवा
भरत साळोखे,
संचालक, अक्षय प्रॉफिट अँड वेल्थ प्रा. लि.

२२८०० चा स्तर निफ्टीसाठी एक मजबूत आधार आहे, हे पुन्हा एकदा मागील सप्ताहाने सिद्ध केले; परंतु एका अत्यंत Narrow Range मध्ये बाजार फसलेला आहे आणि तिथून तो कधी बाहेर पडणार याची कोणतीही शाश्वती नाही. फेब्रुवारी महिन्याचा पहिला आठवडा सोडला तर निफ्टी २२८०० ते २३००० याच पट्टयात प्रवास करीत आहे आणि तोही खालच्या दिशेने मिडकॅप आणि स्मॉल कॅप स्टॉक्सची दाणादाण उडाली आहे. आणि त्यामुळे सर्वांचे पोर्टफोलिओ विदीर्ण झाले आहेत. (Stock Market)

गॉड फ्रे फिलीप्स आणि ग्लॅक्सो या दोन कंपन्यांनी सप्ताह गाजवला गॉड फ्रे फिलीप्स ही मुखत्वे सिगारेट उत्पादक कंपनी कॅव्हेंडर्स, फोर स्क्वेअर, मार्लबरो, रेड & व्हाईट आदी लोकप्रिय सिगारेट ब्रँडसूची ती निर्माती कंपनीचा एकत्रित नफा अट्ठेचाळीस टक्क्यांनी वाढून ३१६ कोटी झाला. विक्रीही साडेसत्तावीस टक्क्यांनी वाढून १८९५ कोटी झाली. हा शेअर १४ आणि १७ फेब्रुवारी या दोन दिवसांत अड़तीस टक्के वाढून रु. ७००० च्या पार गेला होता; परंतु नफा वसुलीमुळे सप्ताहाच्या अखेरीस तो रु. ५७८६ वर आला. मागील एका वर्षात १२० टक्क्यांनी वाढून तो दुपटीपेक्षा अधिक झाला आहे.

Glaxosmith Kline ही मल्टिनॅशनल फार्मा कंपनी आहे. तिचा नफा तिसऱ्या तिमाहीमध्ये ४०० टक्क्यांनी वाढला. त्यामुळे सोमवारी या शेअरला २० टक्क्यांचे Upper Circuit लागले.

मागील दोन आठवड्यांमध्ये Bhel कडे २०००० कोटींच्या नवीन वर्क ऑर्डर्स आल्या. रु. १,६०,१५७ कोटी रु. इतकी प्रचंड मोठी ऑर्डर बुक सध्या Bhel ची आहे. Bhel (Bharat Heavy Engineering Ltd.) ही सरकारी Heavy electrilal equipment कंपनी आहे, हे आपल्याला माहीत असेलच.

Concord Biotech ही बायोफार्मा कंपनी आहे. भरघोस डिव्हीडंड देणारी, सातत्याने नफा कमविणारी, कर्जमुक्त अशी ही कंपनी आहे. FIIS देखील दर तिमाही गणिक या शेअर्समध्ये खरेदी वाढवत आहेत. दिवंगत राकेश झुनझुनवाला यांच्यापैकी या कंपनीचे २४ टक्के शेअर्स आहेत; परंतु केवळ दोन आठवड्यांत हा शेअर ३० टक्के कोसळला. त्यामुळे झुनझुनवालांचे रु. १६०० कोटी नुकसान झाले.

Gillette India या Shaving Foam. ru-zors, blades, tooth burshes बनविणाऱ्या कंपनीने तिसऱ्या तिमाहीमध्ये निव्वळ नफ्यात २१ टक्के वाढ दर्शवली आणि हा शेअर मंगळवारी १५ टक्के वाढला. कंपनीने २०२५ साठी प्रति शेअर ६५ रुपये अंतरिम लाभांशही जाहीर केला. ज्यांना Value Investing करायचे आहे. त्यांच्यासाठी ही अतिशय उच्च दर्जाची कंपनी आहे. प्रत्येक वर्षी वाढणारी विक्री, अतिशय स्टाँग ROE (Return on Equity) आणि ROCE आणि FIIS वाढणारी खरेदी ही या शेअरची बलस्थाने आहेत. मागील एका वर्षाचा परतावा २६ टक्के तर पाच वर्षांच्या ३९ टक्के आहे. बँकेतील FD ऐवजी ज्यांना अधिक परतावा देणारे परंतु काही प्रमाणात Safe Investing करायचे आहे, त्यांच्यासाठी हा शेअर एक संधी आहे.

Premji Invest ही अझीम प्रेमजींची कंपनीने मागील आठवड्यात ओपन मार्केटमधून ४४६ कोटी रु. चे शेअर्स कंपन्यांचा समावेश आहे Bharti, Airtal, Jindal Steel Power, Reliance Industries, Adani Ports, Ambuja Ce-ments, Hindalco, ICICI Bank, Infosys and SBI Life Insurance, Gamco Ltd ही एक NBFC आहे. शेअर्समध्ये ट्रेडींग आणि कर्जपुरवठा करणे हा तिचा व्यवसाय आहे. नुकतीच कंपनीने बोनस शेअर्सची घोषणा केली. प्रत्येकी ४ शेअर्समागे ५ शेअर्स ही कंपनी देणार आहे. शेअरचा शुक्रवारचा बंद भाव होता.

रु. ८४.६० या शेअरचा पाँ.ई. रेशो ६.८४ आहे. ROCE २९.३% तर ROE ४३.८% आहे. पाच वर्षांची सरासरी प्रॉफीट ग्रोथ १३२ टक्के आहे. IBM Auto ही ऑटो कॉपोनंटस् आणि बसेस बनविणारी कंपनी आहे. (CMP Rs. 605) या कंपनीचा शेअर १४ टक्के उसळला. कारण होते. या कंपनीची उपकंपनी JBM Ecolife Mobility Pvt.Ltd हीला PM -eBUS Sewa Scheme अंतर्गत रु. ५५०० कोटीची ऑर्डर मिळाली.

FIIS (परदेशी गुंतवणूक संस्था) हे शेअर बाजारातील केवढे मोठे प्रस्थ आहे. हे आपण सर्व जाणताच. त्यांच्या गुंतवणूकीच आकडे पाहिले तरी आपल्याला अचंबित व्हायला होते. एवढी प्रचंड गुंतवणूक करण्यापूर्वी या संस्था त्या शेअर्सचा किती सखोल अभ्यास करत असतील. गेली दोन वर्षे FIIS ची विक्री हा भारतीय शेअर मार्केटसमोरील खूप मोठा चिंतेचा विषय बनला आहे. केवळ फेब्रुवारी महिन्याचाच विचार केला तर मागील २० दिवसात रु. ३७०००० कोटींची विक्री FIIS नी केली आहे. इतके असूनही ज्या शेअर्समध्ये FIIS चा सहभाग पन्नास टक्क्यांहून अधिक आहे, त्या शेअर्सची थोरवी काय वर्णावी? असे काही शेअर्स खालीलप्रमाणे

1) CAMS - FII holding 57.76%

2) Five Star Business Finace - 57.76%

3) 360 ONE - 66.16%

Cartade-55.12 4)

5) Delhivery - 53.75%

6) Azad India - 67.84%

7) One 97-56.20%

8) Shriram Finace - 53.10%

9) Max Healthcare - 56.99%

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT