Stock market live updates today nifty sensex india bajaj auto trent q2 earnings
Stock Market Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजाराने जोरदार सुरुवात केली आहे. आजच्या व्यवहारात सेन्सेक्स तब्बल 250 अंकांनी वाढला तर निफ्टी 80 अंकांनी वाढला आहे. आज मेटल, आयटी आणि पीएसयू बँकांच्या शेअर्समध्ये चांगली वाढ झाली, तर सर्व सेक्टोरल निर्देशांक हिरव्या रंगात ट्रेड करत होते.
बाजारातील हा उत्साह ग्लोबल मार्केट्समधील सकारात्मक संकेत आणि चांगले देशांतर्गत आर्थिक आकडे यामुळे दिसून आला. आंतरराष्ट्रीय ब्रोकरेज फर्म गोल्डमॅन सॅक्सने भारताबद्दलचा दृष्टिकोन सुधारला असून, भारतीय बाजाराला “ओव्हरवेट” असे रेटिंग दिले आहे. त्यांनी निफ्टीसाठी 2026च्या अखेरीपर्यंत 29,000चं टार्गेट ठेवलं आहे. गोल्डमॅन सॅक्सच्या मते, “भारताची मजबूत अर्निंग ग्रोथ, देशांतर्गत गुंतवणुकीचा ओघ आणि सुधारणा-केंद्रित अर्थव्यवस्था ही येत्या काही वर्षांत मोठी ताकद ठरेल.”
गोल्डमॅन सॅक्सने निफ्टीसाठी 2026 पर्यंत 29,000चं टार्गेट ठेवलं आहे
अमेरिकेतील ‘शटडाउन’ संपण्याची शक्यता, त्यामुळे जागतिक बाजारात स्थिरता.
नायका, कल्याण ज्वेलर्सचे निकाल मजबूत; बजाज ऑटो आणि ट्रेंटचे निकाल मिश्र.
FII आणि DII दोघांचीही मोठ्या प्रमाणावर खरेदी.
सहा दिवसांच्या विक्रीनंतर FII (Foreign Institutional Investors) पुन्हा खरेदीच्या मूडमध्ये दिसले. शुक्रवारी त्यांनी कॅश मार्केटमध्ये ₹4,600 कोटींची खरेदी केली, तर DII (Domestic Institutional Investors) ने सलग 50व्या दिवशी ₹6,675 कोटींचा नेट इनफ्लो दाखवला.
यामध्ये भारती एअरटेलच्या ₹10,350 कोटींच्या ब्लॉक डीलचा समावेश आहे.
अमेरिकेत गेल्या 40 दिवसांपासून चालू असलेला ऐतिहासिक “शटडाउन” लवकरच संपेल, अशी अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारच्या सत्रात अमेरिकन बाजारात मोठी वाढ झाली. डाओ जोन्स 500 अंकांनी सावरून 75 अंकांनी वर बंद झाला. GIFT निफ्टी 25,575 च्या जवळ स्थिर, तर डाओ फ्युचर्स 100 अंकांनी वाढला.
चीनने अमेरिकेसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर Rare Earth Minerals च्या निर्यातीवरील बंदी एक वर्षासाठी पुढे ढकलली आहे. यामुळे अमेरिकेतील चिप आणि डिफेन्स कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला असून जागतिक बाजारात स्थैर्य वाढलं आहे.
मजबूत निकाल: Kalyan Jewellers, NALCO
मिश्र निकाल: Bajaj Auto, Trent, Nykaa, Torrent Pharma
कमकुवत निकाल: Petronet LNG
आज Bajaj Finance आणि ONGC या दोन दिग्गज कंपन्यांचे निकाल जाहीर होणार आहेत.
याशिवाय Vodafone Idea, KPIT Tech, HUDCO, Solar Industries यांच्यावरही बाजाराचे लक्ष आहे.
Lenskart IPO ला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून 28 पट सब्स्क्रिप्शन झालं. आज तो बाजारात ₹402 च्या इश्यू प्राइसवर लिस्ट झाला. Pine Labs IPO ला मात्र पहिल्या दिवशी फक्त 13% सब्स्क्रिप्शन मिळालं आहे. त्याचा प्राइस बँड ₹210–₹221 आहे.