शुक्रवारी शेअर बाजार खुला होताच गडगडला. (Pudhari Photo)
अर्थभान

Stock Market Crash Today | सेन्सेक्स १,१०० अंकांनी कोसळला, निफ्टी २४,७०० च्या खाली, नेमकं काय घडलं?

शेअर बाजार खुला होताच गडगडला, कोणत्या शेअर्सवर अधिक दबाव?

दीपक दि. भांदिगरे

Stock Market Crash Today

मध्य पूर्वेतील इराण- इस्रायल तणावाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजार शुक्रवारी (दि.१३ जून) खुला होताच गडगडला. सुरुवातीलाच सेन्सेक्स १,१०० अंकांनी खाली आला. सकाळी ९.४० वाजता सेन्सेक्स ८०० हून अधिक अंकांच्या घसरणीसह ८०,८५० च्या खाली व्यवहार करत होता. तर निफ्टी ५० निर्देशांक २५० अंकांनी घसरून २४,६०० वर व्यवहार करत आहे.

ऑईल आणि गॅस कंपन्यांचे शेअर्स घसरले आहेत. यामुळे निफ्टी ऑईल अँड गॅस निर्देशांक १.३ टक्के खाली आला. निफ्टी बँक, ऑटो, मेटल आणि पीएसयू बँक निर्देशांक १ टक्के घसरले आहेत. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप प्रत्येकी ०.८ टक्के घसरले आहेत.

Sensex Today | कोणते शेअर्स गडगडले?

बीएसई सेन्सेक्सवर टेक महिंद्राचा शेअर्स वगळता इतर सर्व लाल रंगात व्यवहार करत आहेत. अदानी पोर्ट्सचा शेअर्स २ टक्के घसरला आहे. त्याचबरोबर कोटक बँक, एसबीआय, अल्ट्राटेक सिमेंट, रिलायन्स, बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी बँक, पॉवर ग्रिड, नेस्ले इंडिया, एलटी, टायटन हे शेअर्स १ ते २ टक्क्यांपर्यंत घसरले आहेत.

इस्रायलने शुक्रवारी पहाटे इराणवर हल्ला केला. यामुळे आशियाई बाजारात घसरण झाली. याचे पडसाद भारतीय शेअर बाजारातही उमटले. तसेच पुरवठ्याबाबत चिंतेमुळे कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाली आहे. याचाही बाजारात दबाव दिसून येत असल्याचे बाजारातील विश्लेषकांचे म्हणणे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT