आज घसरणीसह खुले झालेले सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक सपाट पातळीवर बंद झाले. (Pudhari Photo)
अर्थभान

सेन्सेक्स हिरव्‍या तर निफ्टी लाल रंगात बंद, आज शेअर बाजारात नेमकं काय घडलं?

Stock Market Closing : सेन्सेक्स १४७ अंकांनी वधारला

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : जोरदार विक्रीनंतर आज सेन्सेक्स १४७ अंकांनी वाढून ७४,६०२ वर तर निफ्टी ६ अंकांनी घसरून २२५४८ वर बंद झाला. बँक निफ्टी देखील ४३ अंकांनी घसरून ४८६०८ वर बंद झाला.

१६१२ कंपन्‍याचे शेअर्स वधारले

आज बाजारात व्‍यवहारांची सुरुवात होताच सेन्सेक्स १४ अंकांनी घसरून ७४,४४० वर आणि निफ्टी ३७ अंकांनी घसरून २२,५१६ वर उघडला. आज सुमारे १६१२ कंपन्‍याचे शेअर्स वधारले तर २१६६ घसरले आणि १२७ जैसे-थे राहिले. निफ्टीमध्ये एम अँड एम, भारती एअरटेल, बजाज फायनान्स, मारुती सुझुकी आणि नेस्ले हे सर्वाधिक वाढलेले शेअर होते. तर हिंडाल्को, डॉ. रेड्डीज लॅब्स, सन फार्मा, हिरो मोटोकॉर्प आणि ट्रेंट हे सर्वात जास्त तोट्यात होते. बाजार बंद होताना निफ्टी लाल तर सेन्सेक्स हिरव्या चिन्हावर बंद झाला.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक प्रत्येकी ०.५ टक्क्यांनी घसरले

आयटी, धातू, तेल-वायू, ऊर्जा, भांडवली वस्तू, सार्वजनिक क्षेत्रातील बँक आणि रिअल्टी ०.५-१ टक्क्यांनी घसरले, तर ऑटो, ग्राहकोपयोगी वस्तू, एफएमसीजी, टेलिकॉम ०.५ टक्क्यांनी वधारले. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक प्रत्येकी ०.५ टक्क्यांनी घसरले. दरम्‍यान, २६ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीनिमित्त शेअर बाजार बंद राहणार आहे.

रुपया ५२ पैशांनी कमकुवत

रुपया ५२ पैशांनी कमकुवत होत ८७.२१ डॉलरवर बंद झाला आहे. आज सकाळी तो १५ पैशांनी कमकुवत होऊन ८६.८५/$ वर उघडला होता. आज निफ्टी ऑटो, एफएमसीजी आणि ऑटो सेक्टरमध्ये वाढ दिसून आली. तर निफ्टी फार्मा, मेटल आणि आयटी क्षेत्रांवर दबाव होता. आज निफ्टीच्या रिअल्टी निर्देशांकात सर्वाधिक विक्री दिसून आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT