अर्थभान

Closing Bell news : शेअर बाजार विक्रमी उच्चांकासह बंद, ‘मिड-स्मॉलकॅप’ सुसाट

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : जागतिक बाजारातील स्‍थिरतेचे सकारात्‍मक परिणाम देशांतर्गत शेअर बाजारावर होताना दिसत आहेत. आठवड्याच्‍या अखेरच्‍या दिवशीही शेअर बाजारात तेजीचे वारे कायम राहिले. आज मिडकॅप निर्देशांक विक्रमी उच्चांक गाठला. निफ्टी पहिल्यांदा 23,490 च्या पातळीवर गेला. नवीन विक्रमी उच्चांक करत बाजार उच्च पातळीवर बंद झाले. निफ्टीने 23,490 चा नवा विक्रम केला. निफ्टी 66 अंकांनी वाढून 23,465 वर बंद झाला. सेन्सेक्स 181 अंकांनी वाढून 76,992 वर st निफ्टी बँकही 155 अंकांनी वाढून 50,002 वर बंद झाला. दुसरीकडे, रुपया 1 पैशांनी कमजोर हाेत 83.56/$ वर बंद झाला आहे.

जागतिक बाजारातील स्थिर संकेतांदरम्यान, शुक्रवारी (१४ जून) देशांतर्गत शेअर बाजारातील व्यवहार तेजीत सुरू झाले आणि बाजार मर्यादित मर्यादेत व्यवहार करताना दिसले. निफ्टी मिडकॅप निर्देशांकाने आज पुन्हा विक्रम केला आणि प्रथमच 54,878 चा स्तर गाठला. सेन्सेक्स 102 अंकांच्या वाढीसह 76,912 वर उघडला. निफ्टी 66 अंकांनी वाढून 23,464 च्या पातळीवर तर बँक निफ्टी 147 अंकांनी वाढून 49,993 वर उघडला.

 'या' शेअर्संनी तेजी अनुभवली

आज निफ्टी बँक, निफ्टी मेटल, निफ्टी आयटी आणि निफ्टी फार्मा यासह सर्व क्षेत्र निर्देशांक हिरव्या रंगात व्यवहार करताना दिसले. सेन्सेक्सवर पॉवरग्रिड, विप्रो, टाटा मोटर्स, टायटन, ॲक्‍सिस बॅक, इन्फोसिस, नेस्ले इंडिया, टाटा स्टील आणि रिलायन्सच्या शेअर्समध्ये किंचित वाढ झाली. तर अल्ट्राटेक सिमेंट, मारुती आणि एचयूएलला सर्वाधिक नुकसान झाले.

निफ्‍टी सर्वकालीन उच्‍चांकीवर

आज दुपारी 3 च्या सुमारास सेन्सेक्स 231.78 अंकांनी किंवा 0.30 टक्क्यांनी वाढून 77,042.68 वर व्यवहार करत होता. निफ्टी 82.70 अंकांनी किंवा 0.35 टक्क्यांनी वाढून 23,481.60 वर दिसला. आजच्‍या व्‍यवहारात सुमारे २१७७ शेअर्स वाढले तर १५९८ शेअर्संनी घसरण अनुभवली. १०६ शेअर्स जैसे थै राहिले.  देशांतर्गत शेअर बाजारातील व्यवहार आज तेजीसह संपले. बाजारात आजही विक्रमी उच्चांक नोंदवण्यात आला. निफ्टी पहिल्यांदा 23,490 च्या पातळीवर गेला. नवीन विक्रमी उच्चांक करत बाजार उच्च पातळीवर बंद झाले. निफ्टीने 23,490 चा नवा विक्रम केला. निफ्टी 66 अंकांनी वाढून 23,465 वर बंद झाला. आणि सेन्सेक्स 181 अंकांनी वाढून 76,992 वर बंद झाला. निफ्टी बँकही 155 अंकांनी वाढून 50,002 वर बंद झाला. दुसरीकडे, रुपया 1 पैशांनी कमजोर झाला आणि 83.56/$ वर बंद झाला.

मिडकॅप निर्देशांक प्रथमच 55,100 च्या पुढे

आज मिडकॅप निर्देशांक विक्रमी उच्चांक गाठला. मिडकॅप निर्देशांक प्रथमच 55,100 च्या पुढे गेला आहे. मिडकॅप निर्देशांकात सलग ८ व्या दिवशी वाढ सुरू आहे. मिडकॅपने सलग पाचव्‍या दिवशी विक्रमी उच्चांक गाठला. मिडकॅप निर्देशांक 8 सत्रांमध्ये जवळपास 12% वाढला आहे.

एलआयसीचे शेअर्स दिवसाच्या उच्चांकावर

LIC ऑफ इंडियाचे शेअर्स दिवसाच्या उच्चांकावर पोहोचले. आरोग्य विमा क्षेत्रात एलआयसीच्या प्रवेशाच्या अहवालानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ झाली. एलआयसीचे शेअर्स 4 टक्क्यांनी वाढून 1043 रुपयांवर पोहोचले.

रेल्वे PSU ला मोठी ऑर्डर मिळाल्‍याने शेअर सुसाट

Railtel Corporation of India (RAILTEL), ब्रॉडबँड आणि VPN सेवा प्रदान करणारी सरकारी रेल्वे कंपनीला शुक्रवारी (14 जून) मोठी ऑर्डर मिळाली आहे. रेल्वे पीएसयूने सांगितले की, त्यांना तामिळनाडू फायबरनेट कॉर्पोरेशन लिमिटेडकडून 24.15 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. या आठवड्यात कंपनीला हा दुसरा करार आहे. मल्टीबॅगर रेल्वे PSU स्टॉकने एका वर्षात गुंतवणूकदारांना सुमारे 220 टक्के परतावा दिला आहे.

मे महिन्यामध्‍ये निर्यात ९.१ टक्‍क्‍यांनी वाढली

मे व्यापार डेटानुसार, मे महिन्यात निर्यात 9.1% वाढली आहे. वार्षिक आधारावर, मे महिन्यात निर्यात $3,495 कोटींवरून 3,813 कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे. आयात $5,748 कोटी वरून $6,191 कोटी झाली. तथापि, वार्षिक आधारावर व्यापार तूट $2,253 कोटी वरून $2,378 कोटी झाली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT