पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आज (दि.४ जून) देशांतर्गत शेअर बाजाराने विक्रमी घसरण अनुभवली. एक्झिट पोलने दाखविल्याप्रमाणे भाजपला एकहाती सत्ता मिळणार नसल्याचे संकेत मिळताच सेन्सेक्स 1.80% घसरला आणि 75,180 च्या आसपास उघडला. निफ्टी देखील 1.70% पेक्षा जास्त घसरणीसह 22,900 च्या वर उघडला. दिवसभर पडझडीचे सत्र कायम राहिले. अखेर आजचे व्यवहार बंद हाेताना सेन्सेक्स 5.7% घसरणीने 72,079 वर बंद झाला. निफ्टी 6% घसरून 21,884 वर बंद झाला आणि निफ्टी बँक 8% घसरून 46,929 वर बंद झाला.
सेन्सेक्स 1.80% घसरला आणि 75,180 च्या आसपास उघडला. निफ्टी देखील 1.70% पेक्षा जास्त घसरणीसह 22,900 च्या वर st निफ्टी बँक 1.90% च्या घसरणीसह 50,000 च्या पातळीवर उघडला. रुपया ९ पैशांनी कमजोर झाला आणि ८३.२३/$ वर उघडला. यानंतर सेन्सेक्स जवळपास 4700 अंकांनी तर निफ्टी जवळपास 1500 अंकांनी पडझड झाली. बँक निफ्टी सुमारे 4200 अंकांनी घसरला, मिडकॅपमध्ये सुमारे 4500 अंकांची तर स्मॉलकॅपने सुमारे 1500 अंकांची घसरण अनुभवली.
निफ्टीने 2024 मध्ये आतापर्यंत मिळवलेला संपूर्ण फायदा गमावला आहे. अदानी पोर्ट्स, अदानी एंटरप्रायझेस, ओएनजीसी, एनटीपीसी आणि कोल इंडियाचे शेअर्स निफ्टीमध्ये सर्वाधिक घसरले.
निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी शेअर बाजारात आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण झाली आहे. निवडणुकीच्या निकालांदरम्यान एनडीए आणि इंडिया आघाडी यांच्यातील निकराच्या लढतीत सेन्सेक्स पहिल्यांदाच 6000 अंकांनी घसरला. दुपारी 12:16 वाजता सेन्सेक्स 5188.93 (6.79%) अंकांनी घसरला आणि 71,279.85 च्या पातळीवर पोहोचला. दुसरीकडे, निफ्टी 1,627.10 (6.99%) अंकांनी घसरला आणि 21,636.80 वर व्यवहार करताना दिसला. आजच्या पडझडीत गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे २९ लाख कोटी रुपयानी घट झाली आहे.