Stock Market | सन 2025-गुंतवणूकदारांना निराश करणारे वर्ष Pudhari File Photo
अर्थभान

Stock Market | सन 2025-गुंतवणूकदारांना निराश करणारे वर्ष

पुढारी वृत्तसेवा

भरत साळोखे, संचालक, अक्षय प्रॉफिट अँड वेल्थ प्रा. लि.

मंगळवार, दिनांक 30 डिसेंबर रोजी 2025 सालातील शेवटची एक्स्पायरी पार पडेल. त्याला केवळ दोनच दिवस बाकी असल्याने शुक्रवार, दिनांक 26 डिसेंबर अखेरचे सन 2025 चे भारतीय शेअर बाजाराचे सिंहावलोकन करण्यास हरकत नाही.

भारतीय बाजाराचा आढावा घेण्यापूर्वी सन 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारांनी कशी कामगिरी केली किंवा जागतिक परिस्थिती काय होती, हे प्रथम पाहूया. त्यासाठी खालील कोष्टक पाहा ः

वरील कोष्टकावरून स्पष्ट दिसते की, प्रमुख जागतिक बाजारांच्या तुलनेत भारतीय शेअर बाजाराने सर्वात कमी परतावा सन 2025 मध्ये दिला. जपानने प्रदीर्घ कालावधीनंतर सर्वाधिक म्हणजे 24 टक्के असा जबरदस्त परतावा दिला. शेअर बाजारात ही तेजी आली त्याचे कारण तीन दशकानंतर प्रथमच बँक ऑफ जपान या मध्यवर्ती बँकेने व्याज दर वाढवण्याचा निर्णय घेतला.

2024 मध्ये जागतिक बाजारांमध्ये आघाडीवर असणार्‍या भारतीय शेअर बाजाराने 2025 मध्ये नांगी का टाकली? सर्व निदेशांकांची वाढलेली व्हॅल्यूएशन्स हे त्याचे प्रमुख कारण! निफ्टी 50 चा Median PIE 2024 मध्ये 32.1 होता तो 2025 मध्ये 33.2 झाला. बीएसई मिड कॅप इंडेक्सचा पीई आणि बीएसई स्मॉल कॅप इंडेक्सचा पीई मात्र अनुक्रमे 48.8 वरून 41.6 वर आणि 45.3 वरून 37.7 वर आले. म्हणजे सन 2025 मध्ये फक्त लार्ज कॅप शेअर्स वाढले, तर मिड कॅप आणि विशेषतः स्मॉल कॅप शेअर्सनी गुंतवणूकदारांना जोरदार दणका दिला.

कॉर्पोरेट अर्निंग्जमधील Slow Down ने मंदीच्या आगीत तेल ओतले. 3 Year CAGR प्रॉफिट ग्रोथ सन 2024 मधील पहिल्या दोन तिमाहींमध्ये अनुक्रमे 47 टक्के आणि 48 टक्के होती, ती सन 2025 मध्ये याच कालावधीमध्ये अनुक्रमे - 1 % आणि - 6 % इतकी चिंताजनक झाली.

वाढलेले Valuations आणि कमी झालेली Corporate earnings ही दोन कारणे FPI Outflow साठी पुरेशी होतात आणि भारतीय शेअर बाजारात तेच झाले. सप्टेंबर 2024 पर्यंत परदेशी गुंतवणूकदारांचा ओघ भारतीय बाजारात होता, तो ऑक्टोबर 2025 पासून आटायला सुरुवात झाली आणि 2025 मध्ये तर FPI Outflow हे सर्वाधिक चिंतेचे कारण ठरले.

तिसर्‍या तिमाहीपासून म्हणजे ऑक्टोबर 2025 पासून परिस्थितीने खूपच सकारात्मक वळण घेतले आहे आणि आता तर 2026 च्या अखेरीस निफ्टीचे संभावित आकडे तीस हजारांच्याही पुढे जाऊ लागले आहेत. त्याचा ऊहापोह आपण नवीन वर्षाच्या पहिल्या लेखात करूच. आज आपण 2025 मध्ये भारतीय शेअर बाजाराने कशी कामगिरी केली, त्याचा आढावा घेऊ.

2025 मध्ये आजअखेर प्रमुख भारतीय निर्देशांकांनी दिलेला परतावा खालीलप्रमाणे :

Nifty 50 - + 9.76%

Sensex - + 8.37%

Nifty Small Cap - - 5.54%

Nifty Mid Cap - + 5.71 %

सेक्टरल निर्देशांकांमधील प्रमुख निफ्टी बँकने सव्वापंधरा टक्के परतावा दिला. त्यातही निफ्टी पीएसयू बँक पंचवीस टक्क्यांहून अधिक वाढला. खासगी बँक अण AU Bank 78% वाढली. सरकारी बँकांमध्ये कॅनरा बँक 49 % वाढली.

PSU Bank नंतर मेटल शेअर्सनी मागील वर्षात चकाकी दाखवली. निफ्टी मेटल इंडेक्स 23 टक्के वाढला. Hind Copper आणि GMPC मधील धुवांधार तेजीमुळे मेटल शेअर्स चमकून उठाले. Silver, Gold आणि Copper या तिन्हींमधील तेजीने बाजाराला अक्षरशः चकित केले आहे.

निफ्टी मेटल्सच्या खालोखाल निफ्टी ऑटोनेही बावीस टक्क्यांच्यावर रिटर्नस् देऊन चांगली कामगिरी केली. फोर्स मोटर्सचा शेअर किती वाढावा? 181

टक्के! हा शेअर 22000 ला धडक देऊन खाली आला आहे. आजचा त्याचा भाव आहे रु. 18,468. इतका वाढूनही त्यांचा पी ई 22.59 आहे. Ashok Leyland, Eicher Motors, Maruti, TVS Motor, Maharashtra Scooter हे सर्व ऑटो शेअर्स पन्नास टक्क्यांची वाढले.

निफ्टी फाइनान्शिअल इंडेन्स

साडेपंधरा टक्के वधारला. Muthoot Finace हा या इंडेक्समधील महत्त्वाचा शेअर. एका वर्षात तो 84 टक्के वाढला.

रु. 3797 हा त्याचा आजचा भाव असून, रु.3890 हा उच्चांक आहे. तो लवकरच पार करून 5000 चा टप्पा गाठण्याचा तो प्रयत्न करील. श्रीराम फाइनान्सनेही 64 टक्के वाढून चांगली कामगिरी केली. चोला फाइनान्स, एसबीआय कार्ड, बीएसई, बजाज फिनसर्व्ह हे या इंडेक्समधील काही वधारलेले शेअर्स.

वरील मुख्य निर्देशांकांबरोबर निफ्टी इन्फ्रा, निफ्टी कमोडीटीज, निफ्टी एमएनसी, निफ्टी सर्व्हिसेस या शेअर्सनी सर्वसाधारण कामगिरी केली.

खराब कामगिरी करणार्‍यांमध्ये निफ्टी मीडिया, निफ्टी रिअ‍ॅल्टी आणि निफ्टी आयटी या इंडायसेसनी बाजाराला खाली खेचले. हे तिन्ही निर्देशांक अनुक्रमे 25 %, 18%, 12 % घसरले.

LT Foods, Laurus labs, AB Capital, Navin Fluorine, Nykaa, Garden Reach, Idea, UPL, Godfrey Philips, Choice International हे सर्व शेअर्स 50 टक्क्यांहून अधिक वाढले.

Tejas Networks, Praj Industries, Manyavar, Whirlpool, Newgen हे शेअर्स 50 टक्क्यांहून अधिक घसरले. हे सर्व शेअर्स फंडामेंटली अतिशय चांगले आहेत. गुंतवणूकदारांनी त्यांच्यावर लक्ष ठेऊन राहावे.

अंदाजपत्रक जवळ येईल तसे रेल्वे, संरक्षण क्षेत्रातील शेअर्स गती दाखवू लागतात. मागील सप्ताहात याची प्रचिती आली. सप्ताहात वाढलेले रेल्वे शेअर्स पाहा :

Jupiter Wagons - Rs. 347.55 - 34% Rise

RVNL - Rs. 387.95 - 22 % Rise

IRFC - Rs. 133.64 - 17 % Rise

Titagarh - Rs. 897.75 -

15 % Rise

Railtel - Rs. 378.25 - 14 % Rise वरील शेअर्समधील तेजी ही अंदाजपत्रक सादर होईपर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे. Ircon, MMTC, Rites, Beml, BDL हे शेअर्सदेखील मोठी तेजी दर्शवण्याच्या मार्गावर आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT