अर्थभान

स्टरलाईट टेक्नॉलॉजी | पुढारी

Pudhari News

या वेळचा 'चकाकता हिरा' म्हणून अनेक दिवसांनंतर  पुन्हा एकदा 'स्टरलाईट टेक्नॉलॉजी'चा विचार केला आहे. मार्च 2019 ला संपलेल्या तिमाहीत तिने 1.6 (165 कोटी रु.) अब्ज कोटी रुपयांचा नफा दाखवला आहे. अपेक्षेपेक्षा तो 10 टक्क्याने वर आहे. गेल्या 8 तिमाहीत कंपनी सतत वाढता नफा दाखवत आहे. ऑप्टीक फायबर केबलच्या किमती काही दिवसांपूर्वी चीनमध्ये घसरल्या होत्या.

अप्रत्यक्षपणे त्याचा परिणाम स्टरलाईट टेक्नॉलॉजीवर झाला. सध्या या शेअरचा भाव 185 रु. आहे.  इथून तो 350 रुपयांपर्यंत जाऊ शकेल.  प्रवर्तकांनी आपले शेअर्स काही दिवसांपूर्वी गहाण ठेवल्यामुळे कंपनीच्या शेअरवर त्याचा परिणाम झाला होता. यावेळच्या चवथ्या तिमाहीत कंपनीचा नफा 47 टक्क्याने वर गेला आहे. विक्रीचे उत्पन्न 112 टक्क्याने वाढले. ढोबळ नफा 43 टक्के वर गेला. 2023 सालापर्यंत अमेरिकेत वाढणार्‍या डेटा सोेल्युशन संधीमुळे जगात ऑप्टीकल प्लायबर केबल्सची मागणी खूप वाढेल. अमेरिकेत डेटा सोल्युशनचा व्यवहार 75 अब्ज डॉलर्स अपेक्षित आहे. स्टरलाईट टेक्नॉलॉजीजकडे सध्या 50 अब्ज रुपयांच्या ऑर्डर्स आहेत. 2019-2020 वर्षासाठी कंपनीचे शेअरगणिक उपार्जन 25 टक्के वाढावे आणि मार्च 2020-021 वर्षासाठी संभाव्य वाढ 16 टक्के असेल. कंपनीची मार्च 2017 पासूनची प्रगती खाली दिली आहे. 

मार्च 2019 चवथ्या तिमाहीसाठी विक्री 1791 कोटी रुपये होती. ढोबळ  नफा 315 कोटी रुपये होता. ढोबळ नफ्याचे प्रमाण 17.6 टक्क्याचे होते.  या तिमाहीचा नक्त नफा 164 कोटी रुपये होता. मार्च 2016 वर्षासाठी ऑप्टीक फायबरचे उत्पादन 7 कि. मी. लांबीचे होते. मार्च 2019 च्या वर्षात ते 14 कि. मी. होते. मार्च 2021 ला ते 23 कि. मी. होईल. 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT