अर्थभान

लक्ष्मीची पावले : गुंतवणूकदारांच्या सकारात्मकतेमुळे लक्षणीय सुधारणा

Pudhari News

गेल्या आठवड्यात सर्वसाधारणपणे बाजारात तेजीचीच भावना होती. गुंतवणूकदारांनी बँकांच्या शेअर्सना पसंती दिली तसेच एफ एम जी सी क्षेत्राकडेही जास्त लक्ष परवले. सकल राष्ट्रीय उत्पादन मोठ्या प्रमाणात सुधारले. उणे 23.9 टक्के जीडीपी उणे 7.5 टक्यांवर आला. ही सुधारणा लक्षणीय आहे. फार्मा, गृहकोपयोगी वस्तू, बँकिंग या क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. गुंतवणूकदारांच्या सध्याच्या सकारात्मक दृष्टीमुळे हे शक्य झाले आहे. तसेच वाहनांच्या विक्रीतही वाढ होत आहे, याचे कारण पंधरा दिवसांनी येत असलेलानाताळाचा सण आणि 2021 या नव्या वर्षाची सुरुवात हे आहे. वास्तू सेवाकराचाही महसूल वेगाने वाढत आहे. त्यामुळे  यावेळी करसंकलन जास्त होईल. पुढील वर्षाचा अर्थसंकल्प मांडण्याचा दिवसही जवळ येत आहे. तो बहुधा सकारात्मक असेल. गुंवतणूकदार सतत नवीन शेअर शोधून त्यात गुंतवणीचा निर्णय घेतात. मिड-कॅप शेअर्सना 2021 मध्ये चांगली मागणी यावी.

नुकतीच इंडिया मोबाईल काँग्रेस 2020 ची परिषद पार पडली. या परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले, माहिती तंत्रज्ञान आणि दूरसंचार क्षेत्राने 7 टक्यांपेक्षा अधिक वाढ दाखवली. नजीकच्या भविष्यात ही वाढ याहूनही जास्त असेल याचे कारण करोनाबाधित गेल्या पाच महिन्यातही निवेशन कमी झाले नव्हते. जगात गुंतवणुकीसाठी भारत, ब्राझील, दक्षिण आफ्रिका असे थोडेच देश उपलब्ध असल्यामुळे भारताला जागतिक मंदीचे चटके कमी बसतात. कोरोनातील लस आता द‍ृष्टिपथात येत असल्यामुळे लोक गुंतवणुकीत माघार घेणार नाहीत.

निर्देशांक शुक्रवारी तारीख 11 रोजी 46,099 वर बंद झाली. तर निफ्टी 13505 वर बंद झाला. मार्च 2021 अखेर निर्देशांक 50000 चा टप्पाही गाठू शकेल. त्यामुळे जागरूक गुंतवणूकदारांनी सध्या निवेशाची संधी सोडू नये.एस.बी.आय. कार्ड सध्या 831 वर आहे. गेल्या बारा महिन्यांतील त्याचा नीचांक 490 रुपये होता. रोज सुमारे 15 लाख शेअर्सचा व्यवहार होतो. पुढील बारा महिन्यात हा शेअर 40 टक्के तरी वर जाता.स्टेट बँक ऑफ इंडियादेखील सध्या 270 रुपयाच्या आसपास आहे. एस बी आय लाईफ 880 रुपयांच्या जवळपास आहे. हे तीनही शेअर्स म्हणजेच स्टेट बँक, एसबीआय कार्ड आणि एसबीआय लाईफ हे तीनही शेअर्स जरूर घेण्यासारखे आहेत. आपल्या गुंतवणुकीपैकी निदान 35 टक्के तरी गुंतवणूक या तीन शेअर्समध्ये हवी. एच.डी.एफ.सी. लाईफपेक्षा एस.बी.आय.लाईफ जास्त फायदेशीर ठरेल.

एस.बी.आय.प्रमाणेच कॅनरा बँक, एच.डी.एफ.सी. बँक, बँक ऑफ इंडिया असे शेअर्स सतत डोळ्यासमोर हवेत. कारण पुढील 8,10 महिन्यात या व अन्य बँकांमध्येही अनार्जिस कर्जांचे आरुडे मोठ्या प्रमाणात कमी होतील. अनेक कंपन्यांकडून थकवले गेलेल हप्ते मोठ्या प्रमाणात कमी होतील. बँकांच्या कर्मचार्‍यांना नुकतीच पगारवाढ दिली गेली असल्यामुळे त्यांचा हुरूप वाढलेला आहे.स्टरलाईट टेक्नॉलॉजी हा शेअरही पुन्हा एकदा अभ्यसनीय आहे. 5 जी नेटवर्कसाठी तिने एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत मल्टी बँड सोल्सुशन विकसित केले आहे. 

खालीलप्रमाणे शेअर्सचे भाव आहेत.

बजाज फायनान्स 4843, फिलिफ्स कार्बन ब्लॅक लि. 167, इंडियन ऑईल 93, लार्सनटुब्रो 1194, लार्सन टुब्रो इन्फोटेक 3268, हिंदुस्थान पेट्रोलियम 317, दिलीप बिल्डकॉन 393.दिलीप बिल्डकॉनच्या सध्याच्या किमतीला किं/गुणोत्तर 14.40 दिसते. नजीकच्या भविष्यात एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. 544 रुपयांना मिळणारा अनुदानित सिलिंडर आता 644 रुपयेंना मिळणार आहे. गॅसच्या किमती जरी वाढल्या गेल्या तरी सरकार अनुदानही वाढवत असते. मात्र हे अनुदान कालांतराने ग्राहकांच्या बँक खात्यात जमा होते. किमती वाढल्याचा फायदा (तात्पुरता) भारत पेट्रोलिम व हिंदुस्थान पेट्रोलियमला जरी दिसला तरी तो तत्कालीन असेल. 

रिलायन्स इंडस्ट्रीजने पुढील वर्षी दुसर्‍या सहामाहीत देशात 'फाईव्ह-जी' टेलिकॉम सेवा सुरू करण्याचे संकेत दिले आहे. यावळेचा 'चमकता हिरा' म्हणून एस.बी.आय.कार्डचा उल्लेख करता येईल. दिवसेदिवस बँक खातेदार बँकेच्या कार्डाचा उपयोग जास्त प्रमाणात करायला लागले आहेत. 

SCROLL FOR NEXT