कोल्हापूर : गडहिंग्लज येथील श्रीमंत बाजार कंपनीत झालेल्या कोट्यवधीच्या घोटाळ्याप्रकरणी मुख्य सूत्रधार फरार महिलेला आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुण्यातील चतु:शृंगी पोलिसांच्या मदतीने रविवारी पहाटे छापा टाकून अटक केली. वैशाली काशिनाथ गुरव (37, रा. हलकर्णी, ता. गडहिंग्लज) असे तिचे नाव आहे. न्यायालयाने तिला पोलिस कोठडी बजावली आहे.
दोन कोटी 95 लाखांच्या घोटाळ्याप्रकरणी श्रीमंत बाजार कंपनीच्या पदाधिकार्यांसह नऊजणांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. वैशाली गुरव हिच्यावरील कारवाईमुळे अटक झालेल्यांची संख्या दहा झाली आहे. मध्य प्रदेश येथील धमेंद्र शेंगर हा अद्याप फरारी आहे. आर्थिक गुन्हे शाखेने एक आठवड्यापूर्वी फरार असलेले संशयित रमेश शिरगावे, रणजित रावण, संतोष भोसले, तुषार चौथे, विठ्ठल जाधव, सदाशिव चव्हाण यांना अटक केली होती.