पुढारी ऑनलाईन डेस्क : दिवसभरातील चढ-उतारनंतर अखेरच्या सत्रात बीएसई सेन्सेक्सच्या जवळपास सर्व क्षेत्र निर्देशांकात वाढ झाली. आज शेअर बाजारात व्यवहार बंद हाेताना सेन्सेक्स 677 अंकांनी वाढून 73,664 वर बंद झाला. तर निफ्टी 203 अंकांनी वाढून 22,404 वर बंद झाला.
सेन्सेक्स आणि निफ्टी ५० निर्देशांकात बुधवारी (दि.१५) चढ-उतार दिसून आला. तीन दिवसांच्या तेजीनंतर आज सेन्सेक्स, निफ्टी सपाट पातळीवर बंद झाले होते. आज आयटी क्षेत्रातील शेअर्संनी बाजरातील सुरुवातीच्या व्यवहारांना उत्साहवर्धक सुरुवात करुन दिली. विप्रो, इन्फोसिस एलटीआय माइंडट्री हे आघाडीवर होते. भारती एअरटेल आजही टॉप गेनर्सपैकी एक राहिले. व्यवहाराच्या सुरूवातीस, सेन्सेक्स सुमारे 330 अंकांच्या वाढीसह 73,300 च्या वर उघडला. निफ्टी 95 अंकांच्या वाढीसह 22,300 च्या आसपास तर निफ्टी बँक 245 अंकांच्या वाढीसह 47,932 च्या आसपास उघडला.
आयटी क्षेत्रातील शेअर्संनी बाजरातील सुरुवातीच्या व्यवहारांना उत्साहवर्धक सुरुवात करुन दिली.सेन्सेक्स 300 अंकांच्या वाढीसह तर निफ्टी 100 अंकांच्या वाढीसह उघडला. मात्र, विप्रो, इन्फोसिस एलटीआय माइंडट्री हे आघाडीवर होते. भारती एअरटेल आजही टॉप गेनर्सपैकी ठरले. व्यवहाराच्या सुरूवातीस, सेन्सेक्स सुमारे 330 अंकांच्या वाढीसह 73,300 च्या वर उघडला. निफ्टी 95 अंकांच्या वाढीसह 22,300 च्या आसपास तर निफ्टी बँक 245 अंकांच्या वाढीसह 47,932 च्या आसपास उघडला.यानंतर बाजारात पुन्हा कमजोरी दिसून आली. बाजार वरच्या पातळीवरून घसरला. सेन्सेक्स 550 अंकांनी तर निफ्टीही जवळपास 180 अंकांनी घसरला. बँक निफ्टीमध्ये 450 अंकांची मोठी घसरण झाली,
भारतीय रुपयाने जोरदार सुरुवात केली आहे. रुपया ३ पैशांनी मजबूत झाला. 83.50/$ च्या तुलनेत रुपया 83.47/$ वर उघडला.रुपया अपरिवर्तित बंद झाला. रुपया ८३.५० च्या पातळीवर बंद झाला .
निफ्टी एक्स्पायरीच्या दिवशी शेवटच्या तासात बाजारात रिकव्हरी दिसून आली. बीएसईच्या जवळपास सर्व क्षेत्र निर्देशांकात वाढ झाली. निफ्टी 203 अंकांनी वाढून 22,404 वर बंद झाला. सेन्सेक्स 677 अंकांनी वाढून 73,664 वर बंद झाला.
टाटा कंज्यूमर प्रोडक्ट्स, एलटीआय माइंडट्री लिमीटेड,एम अँड एम, भारती एअरटेल आणि टेक महिंद्रा हे निफ्टी 50 मध्ये सर्वाधिक वाढले होते. तर मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, SBI, BPCL आणि पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन हे 16 मे रोजी निफ्टी 50 मध्ये प्रमुख पिछाडीवर होते.
हिंदुस्तान एरोनॉटिक्सने गुरुवारी, 16 मे रोजी आर्थिक वर्ष 2024 च्या मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केले. मार्च तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 52 टक्क्यांनी वाढून 4,308 कोटी रुपये झाला आहे. कंपनीचा महसूल 18 टक्क्यांनी वाढून रु. 14,768.70 कोटी झाला आहे, जो मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत रु. 12,494 कोटी होता. तिमाही आधारावर, भारत सरकारच्या मालकीच्या कंपनीच्या नफ्यात दुप्पट वाढ झाली आहे. डिसेंबर तिमाहीत 1,261 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. त्याच वेळी, तिमाही आधारावर महसुलात 140 टक्क्यांची मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे.
आजही बाजारात खरेदीचा मूड कायम राहिल्याचे दिसून आले. निफ्टी 22250 च्या जवळ दिसला. बँक निफ्टीही चमकदार दिसत होता. मात्र, वरच्या स्तरावरूनही काही प्रमाणात दबाव दिसून येत होता. मिडकॅप, स्मॉलकॅप शेअर्स आज पुन्हा बाजी मारली.