Stock Market News
नऊ महिन्यांनी निफ्टीने 25,500 चा आकडा पार केला. आता 25,800 चा एक अशक्त रेझिस्टन्स आहे. तो पार केला की, निफ्टीला आपला पूर्वीचा 26277.35 हा उच्चांक मोडण्याचे वेध लागतील आणि मग बाजाराला प्रतीक्षा असेल, ती निफ्टीने 28000 चा उच्चांक गाठण्याची!
सेन्सेक्सनेही 84000 चा आकडा पार केला आहे. निफ्टी 28000 झाला, तर सेन्सेक्स साधारणतः 91000 पर्यंत जाईल. मध्ये बाजारात एक अशी चर्चा रंगली होती की, सर्वप्रथम एक लाखाचा टप्पा कोण गाठेल? निफ्टी, सोने की चांदी? Clean Energy च्या वैश्विक बोलबाल्यामुळे चांदीला, सोन्यापेक्षा अधिक झळाळी प्राप्त झाली. चांदीचा औद्योगिक वापर 2024 पेक्षा चार टक्क्यांनी वाढला. शिवाय Silver ETF मध्ये गुंतवणुकीचे प्रमाणही वाढले. त्यामुळे एक लाखाचा टप्पा पार करण्याचा बहुमान चांदीला प्रथम मिळाला. पाठोपाठ सोनेही एक लाखांच्या पार गेले. आता सेन्सेक्स लक्षाधीश होण्याची सर्वजण वाट पाहात आहेत.
जून महिन्यामध्ये स्मॉल कॅप शेअर्स सर्वाधिक वाढले. मिडकॅप शेअर्सनीही तेजीला चांगली साथ दिली. रिअॅल्टी इंडेक्समधील तेजी ‘बरकरार’ आहे. ओबेरॉय रिअॅल्टी (रु. 1918.80) दोन हजार पार करून खाली आला आहे. 2343.65 हा त्याचा उच्चांक आहे. प्रेस्टीज रिअॅल्टी इंडेक्समध्ये सर्वात आघाडीवर आहे. डीएलएफ, गोदरेज प्रॉपर्टीज, अनंतराज हे शेअर्सदेखील चांगली वाढ दाखवत आहेत.
मार्च महिन्यापासून सलग चार महिने FIIS भारतीय बाजारात Net Buyers आहेत. जवळपास पंचवीस हजार कोटींची निव्वळ खरेदी FIIS नी या चार महिन्यांत केली आहे. DIIS चा आकडा पाहून तर चक्रावून जाल. ऑगस्ट 2025 मध्ये DIIS नी सलग अव्याहत खरेदी करण्याला दोन वर्षे पूर्ण होतील. भारत- पाकिस्तान संघर्ष, रशिया-युक्रेन संघर्ष आणि आता इस्रायल-इराण संघर्ष मागे पडले आहेत. जिथे क्रूड ऑईलचा संबंध येतो, तिथे भारतीय बाजार हटकून मंदीच्या मूडमध्ये जातो. कारण, कू्रड ऑईल कित्येक सेक्टर्सवर तर परिणाम करतेच, शिवाय देशाच्या वित्तीय शिल्लक तुटीवर पण परिणाम करते.
हे भू-राजकीय तणाव मागे पडले असले, निदान शांततेच्या चर्चा चालू झाल्या असल्या, तरी एका खूप मोठ्या समस्येचे निराकरण अद्याप झालेले नाही आणि ती समस्या म्हणजे ट्रम्पप्रणीत टॅरिफ वाढीची समस्या! टॅरिफ वाढीच्या अंमलबजावणीला ट्रम्प यांनीच दिलेली 90 दिवसांची मुदतवाढ जुलैमध्ये संपेल. कॅनडा बरोबर अमेरिकेचा करार झाला आहे. चीनबरोबरही झाला आहे. भारताबरोबर चर्चेच्या फेर्या सुरू आहेत. समाधानकारक तोडगा काढण्याचे सूतोवाच ट्रम्प यांनी केले आहे. तो निघाला तर चांगला मान्सून, वाढते GST संकलन, चांगले PMI नंबर्स, कमी होणारी महागाई आणि देशांतर्गत म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीचा ओघ यांनी आधीच सुपीक करून ठेवलेल्या जमिनीत रेपो रेट आणि सीआरआर कपातीचे खतपाणी रिझर्व्ह बँकेने घातले आहे. वाहन विक्रीचे आकडे दरमहा वाढत आहेत. पावसाळा संपताच भारतात Festive Season सुरू होईल. Consumption वाढेल. एकूण चित्र हे असे आहे. एका मोठ्या तेजीसाठी भारतीय बाजार सज्ज आहे.
कोणत्याही कंपनीमध्ये Turn-around होत असेल किंवा कंपनीचे Expansion होत असेल, तर त्याची निश्चिती होते ती Promoters Holding वाढण्यामधून! कारण, प्रमोटर्स हेच कंपनीची रेष आणि जाणून असतात.
जून महिन्यात स्मॉल कॅप शेअर्स चांगले वधारले. निफ्टी 50 इंडेक्स अडीच टक्क्यांनी तर BSE Small Cap Index पाच टक्क्यांनी वाढला. या इंडेक्समधील केवळ जूनच्या एका महिन्यात खालील शेअर्स चाळीस टक्क्यांहून अधिक वाढले.
1) Lumax Auto Tech - Current Rate Rs. 1143.55
2) LLoyds Enterprises -
Rs. 88.91
3) Sterlite Technologies -
Rs. 107.55
4) Axiscades Eng. - Rs.1425.30
5) Federal Mogul - Rs. 523.90
6) Comlin Fine Chemicals - Rs. 318.45
शेअर बाजारात तेजी आली की शेअर बाजारात नव्याने प्रवेश करणार्यांची किंवा व्यवहार वाढण्याची संख्या वाढते. हे पूर्वी कितीतरी वेळा लिहिले आहे. अशा वेळी शेअर मार्केटशी संबंधित सेवा देणार्या कंपन्यांचे शेअर्स वधारतात. Kfin Tech., BSE, Cams, CDSL या शेअर्समध्ये जूनमध्ये आलेली तेजी ही गोष्ट सिद्ध करते.
येऊ घातलेल्या तेजीमध्ये फाइनान्शिअल सर्व्हिसेस कंपन्यांचे शेअर महत्त्वाची भूमिका बजावतील, असे वाटते. श्रीराम फाइनान्स, सुंदरम फाइनान्स, चोला इन्हवेस्टमेंट, महिंद्रा & महिंद्रा फाइनान्स यांचे चार्टस् पाहता ही गोष्ट प्रकर्षाने ध्यानात येते. टायटन, मनप्पुरम हे शेअर्स नवी उंची गाठण्यासाठी आतुर आहेत. गुडलक इंडियात अखेर ब्रेक आऊट दिला आहे.
Navin Fluorine, Laurus Labs, SRF हे शेअर्स आगामी काळात गुंतवणूकदारांना भरघोस पैसे मिळवून देतील, असे वाटते. Heg, Aarti Industries, Himadri हे शेअर्स मंदीतून तेजीत येण्याच्या तयारीत आहेत.
Narayan Hridayalaya (NH) चा शेअर आता रु. 3000 ला जाऊन थांबेल, असे वाटते. Max Healthcare, Apollo Hospitals तेजीच्या वारूवर स्वार झाले आहेत Techno Electric, Gravita India,
Grasim Industries, Bayer Cropsciences, या कंपन्यांचे चार्टस् लक्षपूर्वक पाहा. नव्या तेजीचे स्वागत करण्यास सिद्ध व्हावे लागेल.