मंगळवारी सेन्सेक्स ६०९ अंकांनी वाढून ७४,३४० वर बंद झाला. (AI Image)
अर्थभान

Stock Market Closing | बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी! निफ्टी २२,५०० वर बंद

मेटल शेअर्सची दमदार कामगिरी

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : जागतिक सकारात्मक संकेतांदरम्यान भारतीय शेअर बाजार (Stock Market) आज गुरुवारी (दि.६) सलग दुसऱ्या दिवशी तेजीत बंद झाला. सेन्सेक्स ६०९ अंकांनी वाढून ७४,३४० वर बंद झाला. निफ्टी ५० निर्देशांक २०७ अंकांच्या वाढीसह २२,५४४ वर स्थिरावला. आज सर्व क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या रंगात बंद झाले. एफएमसीजी, मेटल, ऑईल अँड गॅस, फार्मा निर्देशांक १ ते २ टक्के वाढले. बीएसई मिडकॅप ०.६ टक्के आणि स्मॉलकॅप १.६ टक्के वाढला.

Sensex Today | कोणते शेअर्स वधारले?

सेन्सेक्सवर एशियन पेंट्स, एनटीपीसी, रिलायन्स, टाटा स्टील, बजाज फिनसर्व्ह, हिंदुस्तान युनिलिव्हर, सन फार्मा हे शेअर्स २ ते ५ टक्क्यांपर्यंत वाढले. तर टेक महिंद्रा, कोटक बँक, झोमॅटो हे शेअर्स घसरले.

रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर्स जवळपास ३ टक्क्यांनी वाढला. तर श्रीराम फायनान्स आणि बजाज फिनसर्व्ह सारख्या फायनान्सियल कंपन्यांचे शेअर्सही प्रत्येकी २ टक्क्यांनी वधारले. पण टेक महिंद्राचा शेअर्स २ टक्क्यांहून अधिक घसरणीसह पिछाडीवर राहिला.

ट्रम्प यांच्या सौम्य भूमिकेनंतर  बाजारात तेजी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिको आणि कॅनडावर लागू केलेल्या नवीन आयात शुल्काबाबत एक महिन्याची सूट दिल्यानंतर बाजारात तेजीचा माहौल राहिला. ट्रम्प यांच्या या सौम्य भूमिकेनंतर अमेरिकेतील शेअर बाजारात तेजी दिसून आली. त्यानंतर आशियाई बाजारातही उत्साहाचे वातावरण राहिले. दक्षिण कोरियाचा कोस्पी निर्देशांक ०.७ टक्क्यांनी वधारला. तर हाँगकाँगचा हँग सेंग सुमारे ३ टक्के वाढला.

कच्च्या तेलाच्या दरात घसरण

तसेच कच्च्या तेलाचे दर सहा महिन्यांच्या निचांकी पातळीवर गेले आहेत. यामुळे बाजारातील भावना उंचावल्या आहेत. या पार्श्वभूमीवर तेल विपणन कंपन्यांच्या (OMCs) शेअर्सनी आज सलग चौथ्या सत्रात वाढ नोंदवली. ब्रेंट क्रूड तेलाचा दर प्रति बॅरल ७० डॉलर्सच्या खाली घसरला आहे.

डॉलर निर्देशांक कमकुवत

अमेरिकन डॉलर निर्देशांक चार महिन्यांच्या निचांकी पातळीवर म्हणजे १०४.३ पर्यंत खाली आला आहे. हे भारतासारख्या उदयोन्मुख बाजारपेठांसाठी फायदेशीर मानला जात असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT