सेन्सेक्स- निफ्टी सोवारी (दि.७) सलग सहाव्या सत्रात घसरून बंद झाले. (file photo)
अर्थभान

सेन्सेक्स- निफ्टी सलग सहाव्या सत्रात धडाम; 'स्मॉलकॅप'ची ३ टक्क्यांनी घसरण

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय शेअर बाजारात (Stock Market) आज सोमवारी (दि.७) अस्थिरता दिसून आली. आज बाजारात विक्रीच्या माऱ्यामुळे सेन्सेक्स (Sensex)- निफ्टी (Nifty) सलग सहाव्या सत्रात घसरून बंद झाले. आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स ९६२ अंकांनी घसरून ८०,७२६ वर तर निफ्टी २५,७०० च्या खाली आला. त्यानंतर त्यात काही प्रमाणात रिकव्हरी दिसून आली. सेन्सेक्स ६३८ अंकांच्या घसरणीसह ८१,०५० वर बंद झाला. तर निफ्टी २१८ अंकांनी घसरून २४,७९५ वर स्थिरावला.

BSE SmallCap : स्मॉलकॅप निर्देशांक गडगडला

इस्रायल- इराण यांच्यातील युद्ध, परदेशी गुंतवणूकदारांचा कमी झालेला ओघ आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीदरम्यान मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकही घसरले. मिडकॅप १.८ टक्क्यांनी घसरला. तर स्मॉलकॅप ३.2 टक्क्यांनी गडगडला. क्षेत्रीय आघाडीवर आयटी वगळता सर्व निर्देशांक लाल रंगात बंद झाले. निफ्टी पीएसयू बँक ३.३ टक्क्यांनी घसरुन बंद झाला. त्याचसोबत हेल्थकेअर, कॅपिटल गुड्स, रियल्टी, मेटल, पॉवर, ऑईल आणि गॅस, मीडिया आणि टेलिकॉम हेही घसरले. निफ्टी आयटी ०.६ टक्क्यांनी वाढला.

निफ्टी २१८ अंकांनी घसरून २४,७९५ वर बंद झाला.

Sensex Today : कोणते शेअर्स घसरले?

सेन्सेक्सवर अदानी पोर्ट्सचा शेअर्स ४ टक्क्यांनी घसरला. त्याचबरोबर एनटीपीसी, एसबीआय, पॉवर ग्रिड, ॲक्सिस बँक, इंडसइंड बँक, एचडीएफसी बँक, टायटन हे शेअर्सही २ ते ३ टक्क्यांनी घसरले. अल्ट्राटेक सिमेंट, टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील, रिलायन्स, नेस्ले इंडिया, कोटक बँक हे शेअर्स प्रत्येकी १ ते २ टक्क्यांपर्यंत घसरले. तर दुसरीकडे एम अँड एम, आयटीसी, भारती एअरटेल, बजाज फायनान्स, इन्फोसिस हे शेअर्स हिरव्या रंगात बंद झाले.

सेन्सेक्सवर अदानी पोर्ट्सचा शेअर्स ४ टक्क्यांनी घसरला.

Stock Market : बाजारात आज नेमकं काय घडलं?

देशांतर्गत बाजारातील (Stock Market Updates) मागील आठवड्यातील विक्रीच्या सपाट्यानंतर आज सोमवारी सेन्सेक्स आणि निफ्टी तेजीत खुले झाले होते. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स २५० अंकांनी वाढून ८१,९०० वर तर निफ्टी २५ हजारांवर गेला होता. पण त्यानंतर दोन्ही निर्देशांक घसरले. सेन्सेक्स ९६२ अंकांनी घसरला. त्यानंतर काही प्रमाणात रिकव्हरी दिसून आली.

Global Market : जागतिक बाजारातील स्थिती काय?

अमेरिकेतील नोकऱ्यांमध्ये सप्टेंबरमध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली. येथील बेरोजगारीचा दर ४.१ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. या पार्श्वभूमीवर डाऊ जोन्स (Dow Jones) आणि नॅस्डॅक कंपोझिट हे निर्देशांक उच्चांकावर बंद झाले होते. आशियाई बाजारातील जपानचा निक्केई निर्देशांक (Nikkei 225) सुमारे २ टक्के वाढला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT